अनंतकाल जगू शकाल पुस्तक परिणामकारकपणे प्रस्तुत करणे
१ प्रस्तावनांचा उपयोग करण्यात येशूचा हातखंडा होता. आस्था उद्दीपित करण्यासाठी काय बोलावे हे त्याला माहीत होते. एके प्रसंगी शोमरोनी स्त्रीला पिण्यासाठी केवळ पाणी मागून त्याने तिच्यासोबत संभाषण सुरु केले. या गोष्टीने तत्काळ तिचे लक्ष आकर्षित केले कारण ‘यहूद्यांचे शोमरोनी लोकांबरोबर काहीच संबंध नव्हते.’ परिणामतः, जे संभाषण सुरु झाले त्यामुळे शेवटी तिला तसेच इतरांना विश्वास बाळगणारे बनण्यास मदत मिळाली. (योहा. ४:७-९, ४१) त्याच्या उदाहरणावरून आपण शिकू शकतो.
२ अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करण्याची तयारी करताना स्वतःला विचारा, ‘आपल्या क्षेत्रात लोकांना कोणत्या गोष्टींबद्दल अधिक चिंता वाटते? एखाद्या युवकाला, वृद्ध व्यक्तीला, पतीला किंवा पत्नीला कोणती गोष्ट अपीलकारक ठरेल?’ तुम्ही एकापेक्षा अधिक प्रस्तावना तयार करू शकता आणि परिस्थितीला सर्वात साजेशी वाटणारी प्रस्तावना वापरण्याचे ठरवू शकता.
३ कौटुंबिक जीवनाच्या ऱ्हासाबद्दल पुष्कळांना चिंता वाटत असल्यामुळे तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
▪ “जीवनातील दैनिक दबावांनी आज कुटुंबांवर पुष्कळ तणाव आणले आहेत. त्यांना साहाय्य कोठे मिळू शकते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल आपल्यासाठी खरी मदत ठरू शकते. [२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.] शास्त्रवचने कुटुंबांना निभावण्यास मदत करण्यासाठी लाभदायक मार्गदर्शन सादर करतात. तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल या प्रकाशनाच्या पृष्ठ २३८ वरील ३ ऱ्या परिच्छेदात काय सांगितले आहे त्याकडे लक्ष द्या.” परिच्छेद ३ वाचा आणि सादर करा.
४ तुम्ही एखादी स्थानिक बातमी सांगत असाल, तर कदाचित असे म्हणू शकता:
▪ “तुम्ही [स्थानिकरित्या विचाराधीन असणाऱ्या चिंतेच्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख करा] याबद्दलची बातमी ऐकली का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटले? [प्रतिसादासाठी वाव द्या.] या जगाचे काय होणार याचे नवल तुम्हाला वाटू लागते, नाही का? आपण शेवटल्या काळात जगत आहोत याचा पुरावा म्हणून बायबलने या गोष्टींना भाकीत केले आहे.” त्यानंतर, अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील १५०-३ पृष्ठांवरील माहिती विचारात घ्या.
५ वाढत्या गुन्हेगारीच्या समस्येबद्दल पुष्कळांना चिंता वाटते. तुम्ही “पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या” या पुस्तिकेच्या पृष्ठ ३ वरील “गुन्हेगारी/सुरक्षितता” या शीर्षकाखालील पहिली प्रस्तावना वापरू शकता:
▪ “आम्ही लोकांसोबत व्यक्तिगत सुरक्षिततेबद्दल बोलत आहोत. आपल्याभोवती पुष्कळ गुन्हेगारी आहे आणि तिचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. तुमच्या आणि माझ्यासारख्यांना रात्रीच्या वेळी रस्त्यांवर सुरक्षित वाटण्यासाठी काय करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते?” तुम्ही स्तोत्र ३७:१०, ११ वाचून आणि अनंतकाल जगू शकाल पुस्तकाची १५६-८ पृष्ठे वापरून देवाचे राज्य जे आशीर्वाद आणील त्याकडे निर्देश करू शकता.
६ तुम्हाला याहूनही सोपी प्रस्तुती हवी असल्यास, “पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या” पुस्तिकेच्या पृष्ठ ४ परिच्छेद ६ मध्ये आढळणाऱ्या प्रस्तावनेसारखीच एखादी तुम्ही कदाचित वापरू शकता:
▪ “आपल्यासाठी बायबल जे अप्रतिम भवितव्य पुरवते त्यावर विचार करण्यासाठी आम्ही आमच्या शेजाऱ्यांना उत्तेजन देत आहोत. [प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] हे तुम्हाला ऐकावयास बरे वाटते का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] या प्रकाशनाच्या १९ व्या अध्यायात देवाच्या राज्यामध्ये आज्ञाधारक मानवजातीला अनुभवण्यास मिळतील त्या इतर आशीर्वादांबद्दल ठळकपणे सांगितले आहे.” त्यानंतर अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करा.
७ परिणामकारी प्रस्तावना तयार केल्याने नीतीमत्वासाठी भुकेलेल्या आणि तान्हेलेल्यांप्रत पोहंचण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.—मत्त. ५:६.