आस्था दाखवलेल्या सर्वांच्या लाभास्तव त्यांचा मागोवा घ्या
१ आपण कोणा व्यक्तीला भेट द्यावी की नाही हे ठरवण्यासाठी कोणते मुख्य कारण आपल्याला मदत करते? आस्था! एखाद्याने राज्य संदेशाबद्दल क्वचित आस्था दाखवली, तरी त्या व्यक्तीला लाभ मिळावा म्हणून आपण होता होईल तितका प्रायत्न केला पाहिजे. यास्तव, त्या व्यक्तीमधील आस्था विकसित करण्याच्या व गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने आपण पुनर्भेटी देतो. आपण साहित्य देऊन जात नाही तेव्हासुद्धा हेच आपले ध्येय असते. हे कसे केले जाऊ शकते?
२ तुमचे पूर्वीचे संभाषण, आज सर्वत्र आढळणाऱ्या वैवाहिक समस्यांविषयी होते व तुम्ही “अनंतकाल जगू शकाल” पुस्तक दिले असल्यास, तुम्ही तुमचे संभाषण अशा प्राकारे पुढे सुरू करू शकता:
▪ “माझ्या मागील भेटीत, आपण विवाहाविषयी व अधिक आनंद मिळवण्यात आपल्याला मदत करू शकणाऱ्या व्यावहारिक बायबल सल्ल्याविषयी चर्चा केली होती. सर्वात चांगल्या कुटुंबांमध्ये देखील, वेळोवेळी समस्या उद्भवतात हे खरे नाही का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] कौटुंबिक नातेसंबंधांमधील समस्या सोडवण्यासाठी बायबल आपल्याला मदत करू शकणारा उत्तम सल्ला देते. बायबलचा एकत्र मिळून अभ्यास केल्याने कुटुंब आशीर्वादित होऊ शकते.” पृष्ठ २४६ काढा व परिच्छेद २३ ची चर्चा करा. योहान १७:३ वाचा, व घरामध्ये बायबलचा अभ्यास सुरू करण्यास कुटुंबाला मदत करण्याकरता तुमचे साहाय्य पुरवा.
३ तुम्ही मुलांविषयी व प्राशिक्षण देण्याच्या त्यांच्या गरजेविषयी बोलला असल्यास, या प्राकारे चर्चा पुढे चालू ठेवू शकता:
▪ “मुलांना आवश्यक असणारे आध्यात्मिक प्राशिक्षण व पालक त्यांची मदत कशी करू शकतात याविषयी आपण बोललो होतो. मी ज्यांच्याशी बोललो आहे असे बहुतांश पालक आजच्या तरुणांच्या वाईट वर्तणुकीने भयभीत झाले आहेत. त्याबद्दल तुमचा काय विचार आहे . . . ? [तुमच्या समाजात तरुणांमध्ये बहुतेकवेळा आढळणाऱ्या गैरवर्तणुकीचे उदाहरण सांगा. प्रातिसादासाठी वाव द्या.] मी बायबलमध्ये दिलेला काही व्यावहारिक सल्ला तुम्हाला दाखवतो.” अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या २४६ पृष्ठावरील २२ परिच्छेद पाहा, मुख्य मुद्याची चर्चा करा व इफिसकर ६:४ वाचा. बहुतांश मुलांना शिस्त व मार्गदर्शनाची प्रात्यक्षात गरज आहे हे दर्शवा. ते पुरवण्यात पालक प्रायत्नपूर्वक असतात तेव्हा मुले अधिक आनंदी असतात व त्यांची वर्तणूक अधिक आदरणीय असते. आपण आपल्या मुलांसोबत बायबलचा अभ्यास कसा करतो हे स्पष्ट करा.
४ परादीस पृथ्वी हा तुमच्या संभाषणाचा विषय असता, तर आस्था पुन्हा निर्माण करण्यासाठी तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “देव पृथ्वीला परादीस करील त्या वेळी ती कशी असेल हे दाखवणारी या पुस्तकातील काही चित्र आपण पाहिली होती. आपल्या प्रिय जनांसोबत आपण त्याचा आनंद घेऊ शकलो नाही, तर त्याचा आपल्याकरता इतका अर्थ राहणार नाही. याजशी तुम्ही सहमत होणार नाही का?” प्रातिसादासाठी वाव द्या. त्यानंतर अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ १६२ काढा. प्राकटीकरण २१:३, ४ वाचा व आपले प्रियजन नेहमी आपल्यासोबत कसे असू शकतात हे स्पष्ट करा. चांगला प्रातिसाद असल्यास, मृत पुन्हा जिवंत होतील हे दाखवण्यासाठी योहान ५:२८, २९ वाचा. पुस्तकाचे पृष्ठ दाखवून असे म्हणा: “हे खरेच सत्य आहे—आपण पृथ्वीवर परादीसमध्ये सर्वकाळ जगू शकतो!” ते समीप का आहे याची चर्चा करण्यासाठी दुसऱ्या भेटीची योजना करा.
५ पुनर्भेटीचा मुख्य उद्देश म्हणजे, राज्य संदेशापासून लाभ मिळवण्याकरता आस्थेवाईक व्यक्तींची मदत करणे होय. अनेक लोकांना आध्यात्मिक गोष्टींविषयीची त्यांची भूक वाढवण्यास उद्दीपनाची गरज असते. साहित्यामधील व्यावहारिक मूल्याच्या विशिष्ट मुद्यांकडे त्यांचे लक्ष वेधवा व ते, बायबलला चांगल्यारितीने समजण्यात त्यांची मदत कसे करू शकते यावर जोर द्या. ही ध्येये साध्य करणाऱ्या पुनर्भेटी इतरांना स्वतःचा लाभ शक्य त्या उत्तम प्राकारे करण्यात मदत करतील.