मासिक कार्यासाठी वेळ राखून ठेवा
१ यहोवाच्या मार्गांचे अनुकरण करणाऱ्यांना ‘शांती, भविष्य आणि एक आशा’ असेल, असे त्याने ठरवले आहे. (यिर्म. २९:११, न्यू.व.) या भवितव्याबद्दलची माहिती, द वॉचटावर व अवेक! यामध्ये अगदी वेळेवर सादर केली जाते. ही मासिके प्रत्येक परिस्थितीतील सर्व प्रकारच्या लोकांना लाभदायक ठरू शकतात. (१ तीम. २:४) तुम्ही तसेच तुमचे कुटुंब, मासिक वितरणासाठी नियमितपणे वेळ राखून ठेवता का?
२ तुमच्या मासिकांची प्रस्तुती कमी होत असेल तर, या प्रवृत्तीवर कसा उपाय केला जाऊ शकतो? आपल्या मासिकांतील विषयांबद्दल आमची गुणग्राहकता सजीव ठेवणे ही एक आवश्यक गोष्ट आहे. एका गृहस्थाने लिहिले: “तुमची मासिके वाचणे म्हणजे खरोखरीच एक आनंददायक अनुभव आहे. ती, कमी दर्जांचे, हलक्या प्रतीचे ‘सांत्वनदाते’ नसून, जीवन कसे अर्थपूर्ण बनवावे याबद्दल त्यात मार्गदर्शन आणि सूचना असतात.” द वॉचटावर व अवेक! काळजीपूर्वक संशोधनाची फळे आहेत, आणि ती “विश्वासू व बुद्धिमान दास” यांची तरतूद आहे. (मत्त. २४:४५) लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोंचण्यासाठी ती प्रभावकारी साधने आहेत.
३ तुम्ही सादर करत असलेल्या मासिकांतील लेखांशी सुपरिचित असा. तुमच्या समाजात, चालू समस्यांशी संबंधीत असलेले मुद्दे शोधा. दारावर किंवा रस्त्यावर भेटणारे पुरुष, स्त्रिया तसेच युवक यांच्याशी बोलण्यासाठी तयारी करणे उत्तम आहे. वैयक्तिकांना तसेच कुटुंब या नात्याने, त्या मासिकांचा त्यांच्याशी काय संबंध आहे, ते दाखवण्यास तयारीत असा.
४ मासिकांबद्दल जाणीवपूर्वक असा: तुमच्या क्षेत्र सेवेच्या आराखड्यात, मासिक साक्षकार्याचा महत्त्वपूर्ण वाटा असला पाहिजे. तुमच्यासाठी, मासिके सादर करण्याची कोणती उत्तम वेळ आहे? दुपारनंतर किंवा मंडळीच्या पुस्तक अभ्यासाआधीच्या सायंकाळी, एका तासासाठी वगैरे, घरोघरचे कार्य करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? काही भागांमध्ये संध्याकाळचे साक्षकार्य अतिशय फलदायी ठरले आहे. विविध मार्गांनी मासिकांच्या वितरणासाठी, शनिवारचा दिवस चांगला आहे, परंतु या कार्यासाठी इतर दिवसांचा देखील, उपयोग केला जाऊ शकतो. घरोघरचे तसेच दुकानातून दुकानातले कार्य, मासिक कार्याच्या दिवसाचा नियमित भाग असावयास हवा.
५ मासिकांच्या प्रत्येक अंकाच्या वितरण प्रतीची, नियमित मागणी प्रत्येकाकडे असायला हवी. काही वेळा, तुम्हाजवळ जुने अंक असतील तर, घरमालकांना, मासिकातील विविध विषय दाखवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. वेळोवेळी, अनुमती असेल तेथे, निवृत्त लोकांसाठी असलेल्या गृहांमध्ये, शुश्रूषा गृहांमध्ये आणि इस्पितळांमध्ये जुन्या अंकांचा एक संच ठेवून जाता येईल. ही सर्व मासिके प्रस्तुती म्हणून मोजली जाऊ शकतात, तसेच तुमच्या क्षेत्र सेवा अहवालाच्या स्लीपमध्ये त्याची प्रत्येक महिन्याला नोंद केली पाहिजे.
६ वरील सूचनांना लागू केल्याने, तुमच्या मासिकांच्या प्रस्तुती संख्येत तुम्हाला, निश्चितच वाढ झालेली दिसेल. सद्य दुष्ट व्यवस्थीकरणातील जीवनाने दबून गेलेले प्रामाणिक अंतःकरणाचे लोक, द वॉचटावर व अवेक! या मासिकांतील उत्साहवर्धक माहितीची गुणग्राहकता बाळगतात. ही मासिके खरोखरीच, यहोवाची मान्यता मिळवण्यास झटणाऱ्यांना आवश्यक आध्यात्मिक अन्न पुरवतात. यास्तव, मासिकांबद्दल जाणीवपूर्वक असा, आणि तुमच्या क्षेत्रात, या मूल्यवान प्रकाशनांचे वितरण वाढवण्यासाठी मार्ग शोधा.