येशूप्रमाणे दररोज सत्याची घोषणा करणे
१ येशू पृथ्वीवर आला तेव्हा त्याला एक विशिष्ट कार्य साध्य करावयाचे होते. ते उल्लेखनीयरित्या साधेसोपे होते: ‘सत्याविषयी साक्ष देणे.’ (योहा. १८:३७) त्याने आपल्या पित्याचे अद्भुत गुण आणि उद्देश यांविषयीच्या सत्याची घोषणा केली. हे कार्य त्याच्यासाठी अन्नाप्रमाणे होते; त्याचे संपूर्ण जीवन यावर केंद्रित होते. (योहा. ४:३४) येशू “मंदिरात दररोज शिक्षण देत असे,” असा अहवाल लूकने दिला. (तिरपे वळण आमचे.) (लूक १९:४७) येशूने उपलब्ध असलेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग केला. (योहा. ९:४) त्याच्या मृत्यूच्या काही काळाआधीच, तो आपल्या पित्याला असे म्हणू शकला: “जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.”—योहा. १७:४.
२ यहोवाने केलेल्या सर्व गोष्टींसाठी आपले अंतःकरण कृतज्ञतेने भरते तेव्हा आपल्यालाही त्याच्याविषयी दररोज असेच बोलण्यास प्रवृत्त झाल्यासारखे वाटते. आपण येशूच्या शिष्यांप्रमाणेच बनतो ज्यांनी धैर्याने अशी घोषणा केली: “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” (प्रे. कृत्ये ४:२०) ते यहोवाबद्दल निरंतर बोलत होते, कारण त्यांनी असे ‘दररोज करण्याचे सोडले नाही,’ असा अहवाल सांगतो. (प्रे. कृत्ये ५:४२) आपण स्वतःला विचारले पाहिजे, ‘मी माझा शिक्षक येशू याचे अनुकरण करणारा आहे का?’
३ निकडीने प्रचार करणे: राज्याचा संदेश सबंध पृथ्वीवर घोषित केल्यावर “शेवट होईल” असे येशूने भाकीत केले. (मत्त. २४:१४) यामुळे आपल्या कार्याचे महत्त्व आणि निकड यांचा प्रभाव आपल्यावर झाला पाहिजे. लाखो लोकांचे जीव धोक्यात असताना, यापेक्षा इतर कोणतेही कार्य महत्त्वपूर्ण किंवा फायदेकारक असल्याचे आपल्याला आढळू शकत नाही. या व्यवस्थीकरणाचा अंत समीप येत असल्यामुळे, हे कार्य पूर्ण करण्याची वेळ कमी करण्यात आली आहे!
४ यहोवा, मेंढरासमान लोकांच्या एकत्रीकरणाच्या कार्याची गती वाढवत आहे असे अहवाल दाखवतात. (यश. ६०:२२) जगाच्या अनेक भागांत, लोक खरोखर सत्याकडे धाव घेत आहेत व परिणामस्वरूप आनंदाने अशी घोषणा करत आहेत: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे”! (जख. ८:२३) भूतकाळातील इतर कोणत्याही समयापेक्षा आज येशूचे शब्द खरे ठरत आहेत: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. . . . पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३७, ३८) “मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत” असलेल्या येशूच्या शिष्यांप्रमाणे आवेशी असण्यास हे आपल्याला प्रेरित करीत नाही का? (तिरपे वळण आमचे.)—लूक २४:५३.
५ दररोज सत्याची घोषणा करा: इतरांना सत्य सांगण्याचे मार्ग आपण दररोज शोधले पाहिजेत. संधी सहज उपलब्ध असतात. खरेदी करताना दुकानदाराला एखादी पत्रिका सादर करण्याचा विचार तुम्ही केला आहे का? किंवा तुम्हाला घरी न भेटलेल्या व्यक्तीला पत्र लिहिण्याबाबत काय? तुमचा मित्र किंवा परिचित व्यक्ती जी ग्रहणशील असेल असे तुम्हाला वाटते त्यांना एखादा फोन करण्यासाठी काही मिनिटे वेळ काढू शकाल का? संभवतः, इतरांसोबत तुमच्या आशेची सहभागिता करण्यासाठी दररोज तुम्हाला असलेल्या इतर अनेक संधींचा तुम्ही विचार करू शकता. तुम्ही परिश्रम घेतल्यास आणि थोडेसे धैर्य दाखवल्यास, यहोवा तुम्हाला मदत करील.—१ थेस्सलनी. २:२.
६ यास्तव, आपण प्रत्येक दिवसाच्या कार्यहालचाली सुरू करतो, तेव्हा स्वतःला विचारले पाहिजे, ‘आज संधी मिळाल्यास, कोणासोबत तरी माझ्या आशेची सहभागिता करण्यास मी पुढाकार घेईन का?’ येशूच्या मनोवृत्तीचे अनुकरण करा, त्याला पृथ्वीवर का पाठविले होते याचे त्याने स्पष्टीकरण दिले: “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे.” (तिरपे वळण आमचे.) (लूक ४:४३) आपल्याला आपल्या शिक्षकाप्रमाणे व्हावयाचे असल्यास, आपणही तेच करू.—लूक ६:४०.