काहींना वाचवण्यासाठी पुन्हा भेटी द्या
१ देवाची इच्छा ही आहे, की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीम. २:४) आपण मदत करण्यासाठी काय करू शकतो? सत्य शिकवण्याच्या हेतूने पुनर्भेटी करा. तुम्ही काय म्हणाल? पुढील सूचना तुम्हाला कदाचित मदत करतील.
२ “तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता” हे पुस्तक स्वीकारलेल्या व्यक्तीला भेट देताना तुम्ही पृष्ठ ४ वरील चित्र पुन्हा दाखवू शकता आणि घरमालकाला विचारा:
▪ “तुम्हाला दिलेल्या पुस्तकाचे पुढील परीक्षण केल्यावर व परादीस पृथ्वीसंबंधी देवाच्या अभिवचनाचा विचार केल्यावर, देवाने मानवजातीसाठी केलेल्या या अद्भुत अभिवचनांविषयी तुम्हाला कसे वाटते?” घरमालकाचा प्रतिसाद मान्य केल्यावर व त्यावर संक्षिप्त विवेचन मांडल्यावर, तुम्ही २ ऱ्या अध्यायाकडे लक्ष वेधवू शकता आणि ही अभिवचने आपल्याला विश्वसनीयरित्या कशी देण्यात आली आहेत यावर विचार करण्यास सुचवू शकता. पुन्हा भेट देण्यासाठी वेळ ठरवा.
३ “सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?” हे पुस्तक तुम्ही दिले असल्यास, तुम्ही असे म्हणून संभाषण पुन्हा सुरू करू शकता:
▪ “मी येथे पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा मृत्यू नसेल असे शांतीमय नवीन जग निर्माण करण्याच्या देवाच्या उद्देशाविषयी आपण चर्चा केली होती. अशा प्रकारची आशा आपल्या जीवनात खरा उद्देश आणि अर्थ कशी आणू शकते याचा आपण विचार केला होता. आता प्रश्न असा आहे, की हे आशीर्वाद मिळवण्यासाठी पात्र ठरण्याकरता आपण काय केले पाहिजे? तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर कसे द्याल?” प्रतिसादासाठी वाव द्या. पृष्ठ १८९ काढा आणि परिच्छेद २ मधील विचारांची चर्चा करा, व देवाच्या वचनाच्या अभ्यासाकरवी दृढ विश्वास निर्माण करण्याच्या गरजेवर जोर द्या. आपल्या बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमाचा फायदा घेऊन हे कसे केले जाऊ शकते हे समजावून सांगा.
४ “तुझे राज्य येवो” या पुस्तकाच्या वाटपाचा मागोवा या प्रस्तावनेने घेऊ शकता:
▪ “जगातील दुःख आणि हिंसा यांचा अंत आपल्या राज्याकरवी करण्याच्या देवाच्या अभिवचनाकडे मी तुमचे लक्ष सुरवातीला वेधले होते. आज मानवजातीला इतक्या दुःखित करणाऱ्या धार्मिक आणि राजनैतिक संघटनांचा देव अंत करील असे तुम्हाला वाटते का? कदाचित तुम्ही, ‘राजा हर्मगिद्दोनात युद्ध करतो,’ हा १७ वा अध्याय वाचला असेल. तुमच्यासोबत काही मिनिटे त्या अध्यायात उल्लेखिलेल्या काही शास्त्रवचनांचा विचार करावा असे मला वाटते.” ती व्यक्ती सर्वकाही मान्य करत असल्यास, तुम्ही पृष्ठे १७०-३ वरील १७-२४ परिच्छेदांमधील शास्त्रवचने पाहू शकता व साहित्य वाचू शकता.
५ “तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे” या पुस्तकाच्या वाटपाचा असे म्हणून तुम्ही मागोवा घेऊ शकता:
▪ “तुम्ही अनंतकालिक भवितव्यासाठी तुमच्या कुटुंबाला कसे तयार करू शकता हे दाखवण्यास मला पुन्हा यायचे होते.” पृष्ठ १८९ वरील चित्र काढा, पृष्ठ १८८ वरील परिच्छेद १५-१७ वाचा आणि मग देवाचे राज्य या अभिवचनाला कसे पूर्ण करील याचे संक्षिप्त रूपात स्पष्टीकरण द्या. मोफत गृह बायबल अभ्यास सादर करा.
६ बायबल अभ्यास सुरू करणे हे पुनर्भेटी करण्याचे ध्येय आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही नंदनवनात पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक खासकरून अभ्यास चालवण्याकरता तयार करण्यात आले आहे. आपण जुन्या पुस्तकांच्या वाटपांचा मागोवा घेतो व प्रत्यक्षात बायबल अभ्यास सुरू करतो, तेव्हा या पुस्तकाकडे लक्ष आकर्षित करणे चांगले असेल. जे लोक अभ्यास करतात ते तारणासाठी यहोवाचा धावा करतात तेव्हा आपल्याला अधिक आनंद प्राप्त होईल.—प्रे. कृत्ये २:२१.