प्रश्न पेटी
◼ आपण प्रत्येक महिन्यातील आपला क्षेत्र सेवेचा अहवाल तत्परतेने का दिला पाहिजे?
राज्याच्या संदेशाच्या प्रचारात होत असलेल्या चांगल्या गोष्टी आपण ऐकतो तेव्हा आपल्या सर्वांना आनंद होतो. (पाहा नीतिसूत्रे २५:२५.) प्रेषितांची कृत्ये २:४१ अहवाल देते, की पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने दिलेल्या प्रभावी भाषणानंतर “सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.” काही काळानंतर ही संख्या “सुमारे पाच हजार झाली.” (प्रे. कृत्ये ४:४) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांकरता हे अहवाल किती रोमहर्षक ठरले असतील! आज आपण देखील उत्तेजनात्मक अहवालांप्रती अशाच प्रकारची प्रतिक्रिया दाखवतो. जगभरात सुवार्तेच्या प्रचारातील आपल्या बांधवांची यशोगाथा ऐकूण आपण रोमांचित होतो.
अशा प्रकारचे अहवाल तयार करण्यासाठी पुष्कळ वेळ आणि प्रयत्न लागतो त्यामुळे प्रत्येक राज्य प्रचारकाने साहाय्य करणे आवश्यक आहे. दर महिन्याचा अहवाल तत्परतेने देण्यात तुम्ही कर्तव्यनिष्ठ आहात का?
प्रगतीच्या अहवालामुळे मन आनंदित होते. शिवाय, जगव्याप्त कार्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास अहवालांमुळे संस्थेला मदत होते. कोठे अधिक मदतीची आवश्यकता आहे किंवा साहित्याचा प्रकार आणि त्याच्या उत्पादनाचे प्रमाण यांबाबतीत निर्णय घ्यावे लागतात. कोठे सुधारणा केली जाऊ शकते हे ठरविण्यासाठी प्रत्येक मंडळीचे वडील क्षेत्र कार्याच्या अहवालांचा उपयोग करतात. चांगले अहवाल उभारणीकारक असतात आणि आपणा सर्वांना संभाव्य सुधारणांसाठी स्वतःच्या सेवाकार्याचे परीक्षण करण्यासाठी प्रेरित करतात.
सर्व प्रकाशकांनी प्रत्येक महिन्याला तत्परतेने क्षेत्र कार्याचा अहवाल देण्याच्या आपल्या व्यक्तिगत जबाबदारीला ओळखले पाहिजे. प्रचारकांना या जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक चांगल्या स्थितीत असतात कारण प्रत्येक महिन्याला नियमितपणे प्रचारकार्यात भाग घेण्यात काही घडचण असणाऱ्यांना ते व्यक्तिगत साहाय्य देण्यासाठी देखील दक्ष असतात. प्रत्येक महिन्याच्या शेवटल्या पुस्तक अभ्यासात अथवा इतर योग्य समयी याचे स्मरण देता येऊ शकते. राज्य सभागृहामध्ये क्षेत्र कार्याचा अहवाल देणे शक्य नसल्यास मंडळीचा पुस्तक अभ्यास संचालक हे अहवाल जमा करू शकतो आणि ते सचिवाला वेळेवर दिले किंवा नाही हे तो पाहू शकतो जेणेकरून ते अहवाल संस्थेला पाठविण्यात येणाऱ्या मंडळीच्या नियमित मासिक अहवालात समाविष्ठ करण्यात येतील.
तत्परतेने आपला क्षेत्र कार्याचा अहवाल देण्याच्या विश्वासूपणातील परिश्रमामुळे आपल्या आध्यात्मिक भल्यासाठी जबाबदार असलेल्यांचे ओझे हलके होते.