पूर्णपणे साक्ष देण्यात आनंद माना
१ आपल्याला जे काम चांगल्या प्रकारे येते ते काम करण्यात आपल्याला आनंद मिळतो. मार्क ७:३७ म्हणते, की येशूबद्दल लोकांनी असे घोषित केले: “त्याने सर्व काही चांगले केले आहे.” यामध्ये कोणतेही आश्चर्य नाही, की येशूने यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यात आनंद मानला होता. (पडताळा स्तोत्र ४०:८.) खालील सूचनांकडे लक्ष दिल्याने आपण ‘लोकांना उपदेश करण्याच्या आणि [“पूर्णपणे,” Nw] साक्ष’ देण्याच्या येशूच्या आज्ञेचे पालन करतो तेव्हा आपल्यालाही त्याप्रमाणे आनंद मिळेल. (प्रे. कृत्ये १०:४२) जानेवारीमध्ये आपण निम्म्या किंमतीच्या यादीतील किंवा खास दरातील १९२-पृष्ठांची जुनी पुस्तके सादर करत आहोत. जेथे स्थानिक भाषेत ही पुस्तके उपलब्ध नाहीत तेथे आपण २०.०० रुपये प्रती पुस्तक या दराने ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद पुस्तक सादर करू. ही प्रकाशने पूर्णपणे साक्ष देण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे उपयोगात आणता येतील?
२. लोकांना बहुतेक वेळा आरोग्यासंबंधी चिंता भेडसावत असते त्यामुळे तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
◼ “औषधोपचार क्षेत्रात उत्तुंग यश मिळून देखील आजारामुळे होणाऱ्या पीडेने आपला पिच्छा सोडलेला नाही. असं का व्हावं, तुम्हाला काय वाटतं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मऱ्या, शेवटल्या काळाचे लक्षण असेल, असे येशूने म्हटले. (लूक २१:११) तरी देखील, आजार नसतील अशा काळाचे बायबल वर्णन करते. [वाचा यशया ३३:२४.] याकडे लक्ष द्या, की कशा प्रकारे हे हस्तपुस्तक त्या मूलभूत बायबल शिक्षणावर आशा ठेवण्यास प्रेरित करते.” तुम्ही ज्या विषयावर बोलत आहात त्याविषयी पुस्तकातील उचित विवेचने दाखवा आणि पुस्तक सादर करा.
३ दुकानांच्या आसपास अनौपचारिक साक्षकार्य करताना तुम्ही अभिवादन करून असे विचारू शकता:
◼ “आकाशाला भिडणारे वस्तूंचे भाव पाहून, चरितार्थ चालवताना तारेवरची कसरत करावी लागते, असं तुम्हाला वाटत नाही का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] खऱ्या आर्थिक सुरक्षिततेचा काळ येईल, असा तुम्ही विचार करता का?” प्रतिसादासाठी वाव द्या. त्यानंतर तुम्ही सादर करत असलेल्या पुस्तकातील उचित शास्त्रवचनीय अवतरण काढून दाखवा. नंतर असे म्हणा: “हे पुस्तक दाखवून देतं, की देव त्याच्या राज्याद्वारे अशा समस्या काढून टाकील ज्यांमुळे आजचं जीवन इतकं कठीण झालं आहे.” पुस्तक सादर करा. संभाषण करण्यात तुम्हाला किती आनंद मिळाला ते सांगा आणि त्यानंतर तुम्ही विचारू शकता: “आपलं हे संभाषण पुढे चालू ठेवण्याचा काही मार्ग आहे का?” अशा प्रकारे तुम्हाला सदर व्यक्तीचा टेलिफोन नंबर किंवा घरचा पत्ता मिळू शकेल.
४ “ज्ञान” पुस्तकाचा उपयोग करून जागतिक शांतीविषयी पुढील प्रस्तुती वापरण्याची तुम्हाला कदाचित संधी मिळेल:
◼ “जागतिक शांती प्रस्थापित करणं इतकं दुष्कर का झालं आहे, असं तुम्हाला वाटतं? [प्रतिसादासाठी वाव द्या, त्यानंतर पृष्ठे १८८-९ वरील चित्र दाखवा.] हे चित्र बायबलमधील वर्णनांवरून काढलंय. [वाचा यशया ६५:२१.] आज जगात शांतीची जी उणीव दिसून येते ती देवाच्या आणि त्याच्या उद्देशांच्या खऱ्या ज्ञानाच्या अभावामुळे आहे. या ज्ञानाने पृथ्वी लवकरच भरली जाईल. [वाचा यशया ११:९.] हे पुस्तक आता ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुमची मदत करील त्यामुळे आपण हे पुस्तक घ्यावं असं मला वाटतं.” पुस्तक सादर करा.—ज्ञान आणि कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके सादर करण्याच्या उपयुक्त पद्धती पाहण्यासाठी आमची राज्य सेवा सप्टेंबर १९९७, जून १९९७, मार्च १९९७, नोव्हेंबर १९९६ आणि जून १९९६ या अंकांतील शेवटले पृष्ठ पाहा.
५ आस्था दाखवलेल्या लोकांकडे परत जातेवेळी बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्ही कदाचित पुढील प्रकारे म्हणू शकता:
◼ “आपण मागे बोललो तेव्हा तुम्ही एक फार आस्थेची गोष्ट बोलला होता. [सदर व्यक्तीने मांडलेल्या विवेचनाचा उल्लेख करा.] मी त्याविषयी पुष्कळ वेळ विचार केला आणि त्या विषयावर मी गोळा केलेली माहिती तुम्हाला सांगावी असं मला वाटतं. [एखादे उचित शास्त्रवचन दाखवा.] आम्ही एक मोफत बायबल अभ्यासाचा कोर्स चालवतो ज्याद्वारे कोट्यवधी लोकांना कमी कालावधीत बायबलच्या मूलभूत शिकवणींचा शोध घेणं शक्य झालं आहे. अशा प्रकारच्या परीक्षणामुळे देवाच्या अभिवचनांच्या खात्रीशीर पूर्णतेवरील तुमचा विश्वास दृढ होऊ शकतो.” काही प्रश्नांचा उल्लेख करा ज्यांची उत्तरे देण्यात येतील. बायबल अभ्यास एखाद्याने नाकारल्यास त्यास असे सांगा, की आपल्याकडे कमी कालावधीत पूर्ण होणारा एक खास कोर्स आहे जो केवळ १५ मिनिटे प्रती सप्ताह या प्रमाणात १६ आठवड्यांत पूर्ण होतो. अपेक्षा माहितीपत्रक दाखवा, अध्याय १ उघडा आणि तुम्ही त्यांना पहिल्या अध्यायाचे प्रात्यक्षिक दाखवू शकता का, ते विचारा.
६ हस्तपत्रिकांचा उपयोग करण्याचे विसरू नका: आध्यात्मिक गोष्टींत आस्था जागृत करण्यासाठी तुमच्या प्रस्तावनेत प्रभावीपणे त्यांचा उपयोग करता येऊ शकतो किंवा एखाद्याने साहित्य न घेतल्यास त्याला हस्तपत्रिका देता येऊ शकते. जेथे आस्था दाखवण्यात येते तेथे गृह बायबल अभ्यास स्वीकारण्याचे आणि आपल्या सभांना येण्याचे उत्तेजन देण्यासाठी हस्तपत्रिकेच्या मागील बाजूस छापलेल्या संदेशाचा उपयोग करा.
७ तुमच्या कार्यातील कसब पणाला लावा आणि मग तुम्हाला हर्षाची प्रचिती येईल. पूर्णपणे साक्ष देण्याकडे निरंतर लक्ष द्या आणि सेवाकार्याचे सर्व पैलू चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आनंद माना.—१ तीम. ४:१६.