वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १०/१ पृ. २६-२९
  • यहोवाचे भय राखा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे भय राखा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुज्ञता ऐका
  • सुज्ञतेचे मोल जाणा
  • सूज्ञता प्रदर्शित करण्याचे मार्ग
  • विचारप्रवर्तक तफावती
  • समानान्तर नीतिसूत्रे
  • सहाय्यक तुलना
  • ‘वजनदार संदेश’
  • नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • ‘बुद्धीमुळे आपले दिवस बहुगुणित होतील’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ईश्‍वरी भय उत्पादित करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १०/१ पृ. २६-२९

पवित्र शास्त्रीय ठळक मुद्दे नीतिसूत्रे १:१–३१:३१

यहोवाचे भय राखा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल

“यहोवाचे भय सुज्ञपणाचा आरंभ होय.” (९:१०) नीतिसूत्रात हे केवढ्या उत्तमपणे दाखविले आहे बरे! पवित्र शास्त्राचे हे पुस्तक सुमारे इ.स.पू. ७१६ मध्ये पूर्ण झाले, जे आम्हास सुज्ञपणा दाखविण्यास, ज्ञानाचा योग्य उपयोग करण्यास मदत करते. या सूज्ञ सुत्रांच्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही सुखी व्हाल.

सुज्ञता ऐका

नीतिसूत्रे १:१–२:२२ वाचा. “यहोवाचे भय” ज्ञानाचे सार आहे. आम्ही शिस्त स्विकारू तर आम्ही दुष्कृत्य करण्यात पापी लोकांचा हात धरणार नाही. यहोवाचे भय धरतात त्यांना तो दुष्कर्मे करणाऱ्‍यापासून सुरक्षित राखण्यास सुज्ञता देतो.

◆ १:७—“यहोवाचे भय” काय आहे?

ते महान, गंभिर भीतीवह आदर व त्याला असंतुष्ट न करण्याविषयीची भीति आहे कारण आम्ही त्याची दया व चांगुलपणाची आवड बाळगतो. “यहोवाचे भय” म्हणजे तो सर्वोच्च न्यायधिश व सर्वसमर्थ आहे तसेच त्याची अवज्ञा करणाऱ्‍यांवर शासन किंवा मृत्यु आणण्याचा हक्क व सामर्थ्य असणारा असे त्यास ओळखणे आहे. त्याचा अर्थ देवाची सेवा विश्‍वासूपणे करणे, त्याजवर पूर्णपणे भाव ठेवणे, व त्याच्या दृष्टीने वाईट त्याचा द्वेष करणे आहे.—स्तोत्रसंहिता २:११; ११५:११; नीतिसूत्रे ८:१३.

◆ २:७—सचोटी काय आहेळ?

सचोटी सोबत संबधीत असणारा इब्री शब्द त्याचा मुलभूत अर्थ “संपूर्ण” किंवा “पूर्णपणे” असा देतो. ती बहुदा नैतिक विश्‍वासुपणा व सात्विकतेकडे निर्देश करते. “सचोटीने चालणारे” यहोवाच्या भक्‍तीत अचल असतात. अशा “सात्विक जनां”साठी ती संरक्षण देणारी “ढाल” आहे कारण ते खरी सुज्ञता दाखवतात व त्याच्या नीतिमान दर्जासोबत जुळवून घेतात.

आम्हासाठी धडा: आम्ही यहोवाचे भय धरू तर आम्ही त्याची शिस्त जी तो त्याचा शब्द व संस्थेमार्फत पुरवितो ती स्विकारू. यात अपयशी होणे आमची गणना “मुर्खात,” नास्तिक पाप्यांच्यामध्ये करील यास्तव, त्याची प्रेमळ शिस्त स्विकारू या.—नीतिसूत्रे १:७; इब्रीकर १२:६.

सुज्ञतेचे मोल जाणा

नीतिसूत्रे ३:१–४:२७ वाचा. चांगल्या अंर्तदृष्टी प्राप्ती साठी, “तुमच्या संपूर्ण हृदयाने यहोवावर भाव ठेवा.” हर्षितपणाचा आनंद जे सुज्ञतेस बहुमान देतात त्यांना मिळतो. त्याचा मार्ग उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या प्रकाशासारखा आहे, पण त्यांनी अंतःकरणास जपले पाहिजे.

◆ ४:१८—‘धार्मिकाचा मार्ग’ प्रकाशमय कसा होतो?

सूर्याचा प्रकाश “दिवसभर” वाढत जातो. याचप्रमाणे, समय जातो तसा यहोवाच्या लोकासाठी आध्यात्मिक प्रकाश वाढत जातो. आम्ही घटनांच्या अति समिप येतो तेव्हा यहोवाच्या उद्देशांच्या कार्यवहनाची आमची समज स्पष्ट होते. इश्‍वरी भविष्यवाद, देवाचा पवित्र आत्मा त्याजवर ते जगात किवा यहोवाच्या लोकांच्या अनुभवात पूर्ण होतात तेव्हा त्याजवर प्रकाशितो व ते आम्हासाठी खुले होतात. अशाप्रकारे त्यांचा ‘मार्ग उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या प्रकाशासारखा’ होतो.

आम्हासाठी धडा: खरी सुज्ञता प्रदर्शित करणे व इश्‍वरी आज्ञा मान्य करून चालणे हे आम्हास अकाली मृत्युकडे निरविणाऱ्‍या मुर्खपणाचा मार्ग अनुसरण्यापासून संरक्षण देईल. उदाहरणार्थ, लैंगिक अनीती विरूद्धचे यहोवाच्या नियमाकडे कानाडोळा करतात ते लैंगिक संसर्गजन्य आजार ओढावून घेतील व त्याचा परिणाम अकाली मृत्युमध्ये होईल. यास्तव, देवाच्या अपेक्षेनुसार वागू या म्हणजे सुज्ञता ही आमच्याबाबत “जीवनरूपी वृक्ष” ठरेल.—नीतिसूत्रे ३:१८.

सूज्ञता प्रदर्शित करण्याचे मार्ग

नीतिसूत्रे ५:१–९:१८ वाचा. अनीती टाळून व “तुझ्या तारूण्यातील पत्नी सोबत आनंद कर” हे करणे सुज्ञतेचे प्रदर्शन आहे. यहोवास न आवडणाऱ्‍या सात गोष्टी व वेश्‍येच्या फुसलावणी विरूद्धचे धोक्याचे इशारे दिले आहेत. सुज्ञतेस देवाच्या “कुशल कारागीर”चे व्यक्‍तिमत्व दिले आहे. “यहोवाचे भय सूज्ञतेचा उगम आहे.”

◆ नीतिसूत्रे ६:१–५—ही सूचना औदार्याच्या आत्म्याविरूद्ध आहे का?

हे नीतिसूत्र औदार्यास नाउमेद करीत नाही तथापि ते इतरासोबतच्या खासकरून अपरिचितासोबतच्या व्यापारी व्यवहारात अंतर्भूत न होण्याविरूद्ध सूचना देते. इस्राएल लोकांना त्यांच्या “कंगाल” अवस्थेत पोहंचलेल्या बंधूस मदत करणे होते. (लेवीय २५:३५–३८) परंतु कांहीजण धोकेदायक व्यापाराच्या स्वरूपात पडले व त्यांच्या साठी इतरापाशी गरज भासल्यास पैसे भागवीतील अशी खात्री देऊन ‘जामीनकी’ भरून आर्थिक पाठींबा प्राप्त केला. एकादी व्यक्‍ती फुशारकीला भाळून अशा बिकट स्थितीत सापडली तर सुज्ञ सल्ला हा आहे की त्याने विनाविलंब त्यातून स्वतःस मोकळे करावे.—नीतिसूत्रे ११:१५.

◆ ८:२२–३१—हे केवळ सुज्ञतेचे वर्णन आहे का?

नाही, सुज्ञता ही अनंतकालीक देवाच्या गुणातील म्हणून सदोदीत अस्तित्वात आहे. (इयोब १२:१३) तथापि येथे, सुज्ञता ही “निर्मिली” होती, व “[यहोवा] पाशी कुशल कारागीर” अशी पृथ्वीच्या निर्मितीवेळेस होती असे म्हटले आहे. सुज्ञतारूपी व्यक्‍तीमत्वाला ओळखण्यात देवाचा पुत्र त्या वास्तविकतेमध्ये अनुरूप ठरतो की त्याजमध्ये “ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.”—कलसैकर १:१५, १६; २:३.

आम्हासाठी धडा: तिच्या “शांत्यर्पणांचा” व “शपथा”चा उल्लेख करून नीतिसूत्रे ७ अध्यायात उल्लेखलेली अनैतिक स्त्री ही तिच्यामध्ये आध्यात्मिकतेची वाण नाही हे सुचविते. शांत्यर्पण यात मांस, सपीठ, तेल व द्राक्षरस यांचा समावेश असे. (लेवीय १९:५, ६; २२:२१; गणना १५:८–१०) यास्तव, ती तिच्या घरी पुष्कळ खाण्यास व पिण्यास आहे हे सुचवित होती व “अंतःकरणात वासनेने भारावलेला तरूण” तेथे मजेत वेळ काढील. हे दुर्वासनेने चेतविलेली व्यक्‍ती अनीतीकडे कशी निरविली जाते याचा नमुना आहे. ही धोक्याची सूचना ऐकणे व देवाचे अपराधी होण्याचे टाळणे केवढे महत्वाचे आहे बरे!—उत्पत्ती ३९:७–१२.

विचारप्रवर्तक तफावती

नीतिसूत्रे १०:१–१५:३३ वाचा. शलमोनाची नीतिसूत्रे भव्यपणे विरोधाभास दाखविण्याने सुरू होतात. “यहोवाचे भय” यावर जोर दिला आहे.—१०:२७; १४:२६, २७; १५:१६, ३३.

◆ १०:२५—“वावटळीचा” संदर्भ का घेतला आहे?

नीतिमान तत्वाच्या पायाच्या कमतरतेमुळे, दुष्ट अस्थिर इमारती सारखा असतो व तो वावटळीत ढासळतो. परंतु धार्मिक हा स्थिर असतो कारण त्याची विचारसरणी दृढपणे इश्‍वरी तत्वावर मुळावलेली असते. खंबीर पाया असणारी इमारत ज्याप्रमाणे आत कोसळत नाही त्याप्रमाणे आहे.—मत्तय ७:२४–२७.

◆ ११:२२—एकादी स्त्री डुकराच्या नाकातील नथी प्रमाणे कशी होवू शकते?

नाकपुडीवर खोवलेली किंवा नाकपुड्याच्या मध्यमेरूतून ओवलेली सोन्याची नथ हे दाखवीत होते की परिधान करणारा सुसंस्कृत आहे. परंतु इस्राएल डुकरास गलीच्छ व घाणेरडा समजत. त्याचप्रमाणे देखणी पण तारतम्य नसणारी स्त्री ही डुकराच्या नाकातील अयोग्य सोन्याच्या नथी प्रमाणे आहे.

◆ १४:१४—विश्‍वास नाही अशाची तृप्ती कशी होते?

“अंत:करणातील विश्‍वासाची कमतरता असणारा” त्याच्या भौतिकवादी जीवनक्रमात तृप्त असतो. (स्तोत्रसंहिता १४४:११–१५अ) देवाच्या दृष्टीने जे चांगले आहे त्याची त्याला शुद्धी नसते, व यहोवाला हिशेब द्यावयाचा आहे याचा तो विचार करीत नाही. (१ पेत्र ४:३–५) परंतु “चांगला मनुष्य” अविश्‍वासू जनाच्या कृत्यांचा धिक्कार करतो व तो “त्याच्या व्यवहाराच्या परिणामात” तृप्त असतो. तो आध्यात्मिक आस्था प्रथम स्थानी ठेवतो. देवाच्या दर्जाना बिलगून राहतो, त्याची सेवा करण्यात अद्वितिय आनंद लुटतो, व इश्‍वरी आशिर्वादाने तृप्त होतो.—स्तोत्रसंहिता १४४:१५ब.

◆ १५:२३ आम्ही ‘मुखाच्या उत्तराने आनंद’ कसा मिळवू शकतो?

आमच्या सुचनेचे पालन केले गेले व चांगली निष्पत्ती मिळाली तर हे घडू शकते. परंतु एकाद्यास मदत करण्यासाठी आम्ही काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. त्याच्या समस्येचा चारही बाजूनी तुलनात्मक विचार केला पाहिजे, व आमच्या सूचना पवित्रशास्त्राधारीत ठेवल्या पाहिजेत. अशाप्रकारचे “समर्पक शब्द केवढे चांगले आहेत!”

आम्हासाठी धडा: “मुर्ख मनुष्य” झटकन “अपमानास” रागाने “त्याच दिवशी” प्रतिसाद देतो. परंतु “धूर्त”—दूरदर्शी—देवाच्या आत्म्यासाठी आत्मसंयम दाखविण्यास व त्याच्या वचनाच्या अनुकरणासाठी प्रार्थना करतो. (नीतिसूत्रे १२:१६) असे करण्याने, आम्ही पुढील तंटा त्याचा परिणाम आम्हा स्वतःस किंवा इतरांस भावनात्मक अगर शारिरिक इजा करण्याचे टाळू शकतो.

समानान्तर नीतिसूत्रे

नीतिसूत्रे १६:१–२४:३४ वाचा. शलमोनाचे हे सुज्ञ बोल बहुतेक सामानान्तर रीतिने मार्गदर्शन देतात. “यहोवाचे भय” यावर पुन्हा जोर दिला आहे.—१६:६; १९:२३; २२:४; २३:१७; २४:२१.

◆ १७:१९—उंच दरवाज्यात काय चूक आहे?

जे त्यांच्या घरांना दरवाजे करीत नाहीत तो घोडेस्वारास आत घेऊन त्यांचा माल घेण्याचा धोका पत्करत नाही. हे नीतिवचन मुखासही लागू करता येवू शकते घमेंडीचे बोल व बढाई करणे उंच दरवाज्याप्रमाणे आहे. अशाप्रकारचे वक्‍तव्य सरतेशेवटी संघर्ष वाढविते.

◆ १९:१७—दरिद्र्‌यास मदत करणे हे यहोवास सहाय्य केल्याप्रमाणे का?

दरिद्री देवाचे आहेत, त्याजसाठी आम्ही काय करतो ते त्यास केल्याप्रमाणे गणले जाते. (नीतिसूत्रे १४:३१) प्रीति व औदार्य हे आम्हास जे दरिद्री आहेत त्यांना कृपादृष्टी दाखविण्याचे किंवा जे गरिब त्यांच्याकडून फेड होईल या अपेक्षेविना मदत करण्यास चालना देते, यहोवा देव असे देणे त्याला कर्ज दिल्याप्रमाणे गणतो व ते तो कृपादृष्टी व आशीर्वादाने परत करतो.—लूक १४:१२–१४.

◆ २०:१—मद्य “चेष्टा करणारे” कसे आहे?

मद्य एकाद्यास चेष्टा व उद्विग्न कृती करेपर्यंत गुरफूटून घेऊ शकते. अति मद्यपान अशी वाईट निष्पत्ती करते तर ख्रिश्‍चनाने ते टाळलेच पाहिजे.—१ तिमथ्य ३:२, ३, ८; १ करिंथकर ६:९, १०; नीतिसूत्रे २३:२०, २१.

◆ २३:२७—वेश्‍या “खाच” व “कूपा” समान कशी आहे?

शिकारी जनावरे ‘खोल खाचे’ मध्ये पकडतो, त्याचप्रमाणे वेश्‍येच्या चाहत्यांना अनैतिकतेत पकडले जाते. “पर स्त्री” दुराचारी स्त्रीची ओळख देते कारण निसंशयीपणे इस्राएलातील वेश्‍या परक्या होत्या. “अरूंद विहीरीतून” पाणी काढणे कठीण परिस्थीतीस सामावून आहे कारण तिच्या भिंतींना आदळून मातीची भांडी सहज फुटतात. त्याचप्रमाणे जे दुराचारी स्त्री सोबत व्यवहार राखतात ते भावनात्मक व शारिरिक इजेचा अनुभव घेतील.—नीतिसूत्रे ७:२१–२७.

आम्हासाठी धडा: “खोटा साक्षी” देवास अनादर दाखवितो व नियम शास्त्राप्रमाणे त्याला मृत्युदंड दिला जाऊ शकत होता. अशाप्रकारे त्याचा “उच्छेद” मानवाच्या किंवा यहोवाच्या हातून केला जात होता. (नीतिसूत्रे २१:२८; अनुवाद ५:२०; १९:१६–२१; प्रे. कृत्ये ५:१–११ तुलना करा.) परंतु लक्षपूर्वक ‘ऐकणारा मनुष्य’ त्याने जे ऐकले होते त्याविषयी खात्री असल्यावरच बोलतो. त्याची साक्ष “चिरंतर” राहते; कांही वेळाने ती खोटी म्हणून धुडकावली जात नाही. याहून अधिक, त्याचा उच्छेद खोटा साक्षी म्हणून केला जात नाही. जे यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यायदान सुनावणीत पारख करतात त्यांनी लक्ष पूर्वक ऐकले पाहिजे की ज्यामुळे अचूक माहिती पुरविता येईल. चूक व खोटी साक्ष आध्यात्मिकरित्या घातक बनू शकते.

सहाय्यक तुलना

नीतिसूत्रे २५:१–२९:२७ वाचा. शलमोनाची नीतिसूत्रे हिज्कीया राजाच्या मनुष्यांनी नक्कल करून लिहीली जी भव्यपणे तुलनात्मकपणे शिकवितात. इतर गोष्टीत यहोवावर विसंबून राहाण्यावर उत्तेजन दिले आहे.

◆ २६:६—“एकाद्याचे पाय कापून” घेणे याजसोबत तुलना का केली आहे?

जी व्यक्‍ती त्याचे पाय कापून घेते तेव्हा ती स्वतःस अपंग बनविते, एकादा “कोणा मुर्खास” कामावर घेतो तो स्वतःच्या फायद्यासाठी अपंगत्वासारखा हिंसाचार करतो. मूर्खाच्या हाती सोपविलेली योजना लयास जाते. मग, मंडळीतील जबाबदार पदासाठी शिफारस करण्यापूर्वी “पुरुषांना त्यांच्या योग्यतेबाबत परिक्षणे” केवढे सुज्ञपणाचे आहे बरे!—१ तीमथ्य ३:१०.

◆ २७:१७—चेहरा कसा ‘पाणीदार’ होतो?

लोखंडाचा तुकडा त्याजपासून बनविलेल्या सूरीस पाणीदार बनविण्यास उपयोगात आणला जावू शकतो, तसाच एक मनुष्य दुसऱ्‍याची आध्यात्मिक स्थीती व बुद्धीमत्ता पाणीदार बनविण्यास यशवंत होऊ शकेल. निराशा व सहानुभूती नसलेल्या व्यक्‍तीचा संबध आम्हास दुखी बनवितो, तेव्हा समविश्‍वासूचा सहानभूतीचा नेत्रकटाक्ष व शास्त्रवचनीय उत्तेजन बरेच दिलासा देणारे ठरू शकते. आमची खिन्‍न मुद्रा चांगल्यात बदलते व आल्हादक अशा नविन कार्यासाठी आम्हास चेतविले जाते.—नीतिसूत्रे १३:१२.

◆ २८:५—“र्सव कांही” यात काय समाविष्ठ आहे?

वाईटाचा सराव करणारे आध्यात्मिकतेत अंध असतात. (नीतिसूत्रे ४:१४–१७; २ करिंथकर ४:४) ते “न्याय जाणत” नाहीत किंवा देवाच्या दर्जानुसर जे योग्य तेही जाणीत नाहीत. अशाप्रकारे ते, प्रकरणाचा न्याय बरोबर, व योग्य निर्णय करू शकत नाहीत. परंतु जे प्रार्थना व त्याच्या शब्दाचा अभ्यास या द्वारे “यहोवास शोधतात” ते त्याची सेवा स्विकृतीने करण्यास “सर्व काही जाणतात.”—इफिसकर ५:१५–१७.

◆ २९:८—बढाई मारणारे “नगराला आग” कशी लावतात?

बढाई मारणारे अधिकाऱ्‍यांचा अवमान करतात व उद्धट बोलतात. ते अशा प्रकारे वादविवादाच्या आगीत रॉकेल घालतात व ज्वालांना वारा इतका घालतात की नगरात राहणारे सर्व पेटतात. परंतु सूज्ञ मनुष्य “राग शमवितो,” मृदु व संवेदनशील बोलतो रागाच्या ज्वालावर पाणी टाकतो व शांती वाढवितो.—नीतिसूत्रे १५:१.

आम्हासाठी धडा: आम्ही गर्विष्ठ घमेंडखोर असू तर त्याचा परिणाम आम्हास नीच बनविण्यात होईल. (नीतिसूत्रे २९:२३) गर्विष्ठ मनुष्य मगरूर प्रमाणे असतो व हे अवमान, अडखळविणे व अधःपात याकडे निरविण्याकडे होतो. (नीतिसूत्रे ११:२; १६:१८; १८:१२) गर्विष्ठ व्यक्‍तीस नीच केले जात आहे, कोणत्यातरी मार्गी खेचले जाते. कदाचित संपूर्ण नाशाप्रत याकडे देव लक्ष देईल. अशाप्रकारचा मनुष्य सन्मानाची हाव धरतो परंतु लोक त्याचा मार्ग किळस आणणारा आहे हे पहातात. तथापि, जी व्यक्‍ती “मनापासून नम्र असते ती [सरतेशेवटी] सन्मान प्राप्त करते”

‘वजनदार संदेश’

नीतिसूत्रे ३०:१–३१:३१ वाचा. अगूरचा “वजनदार संदेश” “देवाचे सर्व शब्द शुद्ध आहेत” हे स्विकारतो. तसेच उल्लेखीत गोष्टी व इतर सर्व समजण्यास विलोभनिय आहेत. (३०:१–३३) लमुवेलला त्याच्या मातेपासून मिळालेला “वजनदार संदेश” मद्याने गुंग होणे न्याय विपरित करू शकते, एकाद्याला न्याय नितिमत्वतेने करण्यास अर्जवितो, सुद्‌र्गिणी पत्नीचे वर्णन करतो.—३१:१–३१.

◆ ३०:१५, १६—या उदाहरणांचा मुद्दा काय आहे?

ते लोभाची अतृप्तता स्पष्ट करतात. जळू स्वतःसाठी अधाशीपणाने रक्‍त पितात, तसाच लोभी मनुष्य अधिक पैसापैसा किंवा सत्तेची लालसा करतो. कबरस्थान [शियोल] ज्याप्रमाणे कधीही तृप्त न हातो नेहमीच मृत्युच्या सावजासाठी आ वासून बसते. वांझ स्त्री लेकरासाठी ‘ओरड करते.’ (उत्पत्ती ३०:१) कोरडी भूमी पावसाचे पाणी फस्त करते व लवकरच सुकून जाते, अग्नी त्यात टाकलेल्या वस्तुंच्या मोबदल्यात इतर ज्वालाग्राही पाठवितो. हेच लोभी मनुष्यांच्या बाबत आहे. परंतु जे इश्‍वरी सुज्ञतेने मार्गदर्शित होतात ते अशा अक्षय स्वार्थीपणावर अंकुश लावतात.

◆ ३१:६, ७—“खिन्‍न मनुष्यास” द्राक्षारस का द्यावा?

गुंगी आणणारी दारू व मद्य हे उपशामक आहे. यास्तव त्यांना ते “एकाद्याला नष्ट” होण्यास किंवा मरण्यास अगर ‘जे खिन्‍न’ त्यांना त्यांच्या वेदना व त्रासाबद्दल कमी संवेदनाशील असावे म्हणून दिले जात होते. पूर्वीची पद्धत ही होती की गुन्हेगारांना त्यांच्या शिक्षेच्या वेदना कमी करण्यास मादक द्रव्य मिश्रित मद्य देत. ही गोष्ट येशू ख्रिस्ताला खिळताना रोमी सैनिकांनी ते का दिले होते हे स्पष्ट करते. अशाप्रकारचे मद्य त्याने नाकारले कारण तो त्या कसोटी समयी त्याच्या क्षमतेने संवेदनाशील राहाण्याची इच्छा करीत होता व अशाप्रकारे त्याने देवासोबतची सचोटी राखली.—मार्क १५:२२–२४.

◆ ३१:१५—“यौवन दासी” कोण आहेत?

घरच्या दासी असा येथे अर्थ आहे. त्यांना अन्‍नाच्या आवश्‍यकतेसाठी किंवा नियुक्‍त कामाबद्दल कोणतीच तक्रार करण्याचे कारण नव्हते. उद्योगी पत्नी तिच्या कुटुंबास अन्‍न देते व या दासींना सेवन करण्यास अन्‍न आहे व काम करण्यास आहे का हे सुद्धा पहाते.

आम्हासाठी धडा: अपूर्ण असण्याने, आम्ही कांही वेळेस स्वतःस अविचारीपणाने ‘ताठ करतो,’ स्व–गौरवासाठी परिश्रम करतो. आम्ही हे रागाने केले असेल तर आम्ही आपले “हात तोंडावर ठेवावेत,” आम्ही दुखावलेल्यास चेतवील असे पुढील शब्दापासून परावृत करणे. लोणी काढण्यास दूध घुसळलेच पाहिजे व नाक पिळल्याने रक्‍त निघते, तसेच लोक रागास मोकाट सोडतात तेव्हा भांडण पेटते. (नीतिसूत्रे ३०:३२, ३३) अशा प्रसंगात निशब्द राहाणे व अधिक त्रासास टाळणे केवढे सुज्ञपणाचे आहे!

आम्ही नीतिसूत्रे पुस्तकातून केवढा फायदा उठवू शकतो! यास्तव या सूज्ञ बोलांना जतन करू, यहोवाचे आदरयुक्‍त भय वाढवू या. त्यांचे अनुसरण करणे आम्हास खात्रीने आनंदीत बनवील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा