युवकहो—तुम्ही कशाचा पाठलाग करीत आहात?
“तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति, शांति ह्यांच्या पाठीस लाग.”—२ तीमथ्यी २:२२.
१. आमच्यामध्ये असणाऱ्या युवकांसाठी आमची कोणती आशा आहे?
“यहोवाचे साक्षीदार, दर वर्षी मोठ्या संख्येने नवीन सदस्यांना मिळवणारा गट बनवतात आणि युवकांचा सर्वात मोठा गट त्यांच्यामध्ये आहे,” असे स्वीडीश पेन्टेकॉस्टलच्या डॅगन (द डे) वृत्तपत्राने म्हटले. कदाचित, तुम्हीसुद्धा ह्या शुद्ध, देवाचे भय राखणाऱ्या युवकांच्या गटातले असाल. तुम्हाला बालपणापासून ख्रिस्ती मार्गात वाढवण्यात आले असेल, किंवा तुम्ही स्वतःहून राज्याच्या संदेशाला ऐकले व त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया दाखवली असेल. काही असो, तुम्हाला आमच्यामध्ये पाहून आम्हाला आनंद होतो. आणि पहिल्या शतकातल्या विश्वासू ख्रिस्ती युवकांप्रमाणेच, तुम्हीसुद्धा नीतिमत्त्वतेचा मार्ग अनुसराल अशी आम्हाला आशा आहे. प्रेषित योहानाचे शब्द तुमचे वर्णन योग्यरितीने करतील: “तुम्ही बलवान आहा. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.”—१ योहान २:१४.
२. “तारूण्याचा बहर [न्यू.व.]” यामध्ये कोणत्या कारणांमुळे नीतीच्या मार्गाचा पाठलाग करण्यास कठीण जाईल?
२ जगीक दबावांना पुष्कळ युवक—होय, बहुसंख्य ख्रिस्ती युवक—तोंड देत आहेत. तथापि, तुम्हाला असे आढळून येईल की अशा मार्गाला धरून राहणे हे सोपे नाही. “तारूण्याचा बहर” यात असताना, तुम्हाला नवीन आणि तीव्र भावनांनी भरून आल्यासारखे वाटू शकते. (१ करिंथकर ७:३६, न्यू.व.) त्याचवेळी शाळेत, घरात आणि मंडळीमध्ये वाढत्या जबाबदारींचे ओझे असल्याचे तुम्हाला जाणवेल. दियाबल सैतानाकडूनही दबाव आहे. एदेन बागेमध्ये केल्याप्रमाणे—भेदनीय लोकांवर हल्ला करून, जास्तीत जास्त जणांना फसवण्याचा त्याचा निश्चय आहे. त्यावेळी, त्याने अनुभवी आणि जास्त माहिती असणाऱ्या आदामावर नव्हे तर, लहान आणि त्याच्याहून कमअनुभवी स्त्रीवर म्हणजेच हव्वेवर त्याचे मन वळवणारे कपट केंद्रित केले. (उत्पत्ति ३:१-५) पुष्कळ शतकांनंतर, करिंथमधल्या प्रगतीशील मंडळीवर सैतानाने तशाच युक्तीचा उपयोग केला. प्रेषित पौल म्हणाला: “तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.”—२ करिंथकर ११:३.
३, ४. युवकांना फसवण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग सैतान करतो, आणि त्याचा कोणता संभवनीय परिणाम आहे?
३ त्याचप्रमाणे आज, तुमचे ख्रिस्ती पालक तुमची चिंता करत असतील. तुम्ही दुष्टपणे प्रवृत्त झाला आहात असा विचार ते करत नाहीत, तर सैतानाच्या “डावपेचां”नी विशेषकरून युवक लोक परिणामित होतात हे त्यांना अनुभवाने माहीत आहे. (इफिसकर ६:११, तळटीप) सैतानाचे डाव अनिष्ट वाटण्याऐवजी, ते आकर्षक व इष्ट वाटण्यासाठी बनवलेले असतात. मनोरंजन म्हणून दूरदर्शन उघड लैंगिकता, वर्णनात्मक हिंसा आणि भूतविद्येला चतुरतेने सादर करते. तरुणांची मने ‘सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध आणि प्रशंसनीय’ नसणाऱ्या गोष्टींनी भरलेली आहेत. (फिलिप्पैकर ४:८) सोबत्यांकडून दबाव, हे सैतानाचे आणखी एक शक्तीशाली साधन आहे. मित्र तुम्हाला त्यांच्या निवडीची जीवन-शैली, पेहराव, केशभूषा स्वीकारण्यासाठी प्रखर दबावाखाली आणतील. (१ पेत्र ४:३, ४) विल्यम ब्राऊन नावाच्या एका वृत्तपत्राच्या स्तंभलेखकाने असे निरीक्षले: “एका नवयौवनाला कोणी ऐहिक देव असलाच तर तो सहमत मिळवणारा देव आहे असे म्हणावे लागेल. मित्रांपासून दूर राहणे हे एखाद्या युवकाच्या दृष्टिकोनातून मृत्युइतकी अत्यंत वाईट गोष्ट आहे.” इटली मधल्या एका साक्षीदार मुलीने असे कबूल केले: “मी एक साक्षीदार होते हे माझ्या शाळासोबत्यांना सांगण्यासाठी मला लाज वाटे. आणि यहोवा माझ्यावर खुश नाही हे मला माहीत असल्यामुळे मी खिन्न व दुःखित होते.”
४ फसू नका—कारण तुम्हाला नाशाकडे घेऊन जाण्यासाठी सैतान इच्छितो. युवकांनी स्वतःला फसवण्यासाठी सैतानाला वाव दिल्यामुळे मोठ्या संकटामध्ये पुष्कळ जगीक युवकांना त्यांचा जीव गमवावा लागेल. (यहेज्केल ९:६) योग्य गोष्टींच्या पाठीस लागणे हाच जीवंत राहण्याचा एकमेव मार्ग आहे.
वाईट संगतीपासून स्वतःचे संरक्षण करा
५, ६. (अ) इफिस शहरात राहात असताना तरुण तीमथ्याने कोणत्या आव्हानांचा सामना केला? (ब) पौलाने तीमथ्याला कोणता सल्ला दिला?
५ प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला दिलेल्या सल्ल्याचा हाच सारांश होता. तीमथ्याने दहा पेक्षा अधिक वर्षे प्रेषित पौलाला त्याच्या सुवार्तिक प्रवासामध्ये सोबत दिली. एकदा, दंडासाठी पौल रोमी तुरूंगामध्ये असताना, तीमथ्य इफिस या मूर्तिपूजक शहरात सेवाकार्य करीत होता. पौलाची मरणाची घटका जवळ आली तशी त्याला तीमथ्याचे पुढे काय होईल याची काळजी लागली होती. इफिस हे शहर त्याच्या संपत्ती, अनैतिकता आणि अवनत होत जाणाऱ्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध असणारे शहर होते आणि यापुढे तीमथ्याला त्याच्या विश्वासू सल्लागाराचा आधार राहणार नव्हता.
६ म्हणूनच पौलाने त्याचा “प्रिय मुलगा” याला असे लिहिले: “मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीहि असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यांपासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति, शांति, ह्यांच्या पाठीस लाग.”—२ तीमथ्य १:२; २:२०-२२.
७. (अ) पौलाने इशारा दिल्याप्रमाणे ‘अवमान होणारी पात्रे’ कोणती होती? (ब) पौलाच्या शब्दांना आज युवक कसे लागू करू शकतात?
७ म्हणूनच सह ख्रिश्चनांमध्ये ‘अवमान होणारी पात्रे’—योग्य रीतीने आचरण न ठेवणाऱ्या व्यक्तींबद्दल पौलाने तीमथ्याला सूचना दिली. जर तेव्हा तीमथ्याला काही विशिष्ट अभिषिक्त ख्रिश्चनांची मैत्री हानीकारक असू शकली असती तर आज एका ख्रिस्ती युवकाला जगीक मित्रांसोबत संगती ठेवणे किती नुकसानकारक असेल! (१ करिंथकर १५:३३) तुमच्या शाळासोबत्यांशी तुम्ही मैत्री ठेवायची नाही असा याचा अर्थ होत नाही. मग, जरी तुम्हाला कधीकधी एकटे रहावे लागत असेल तरी त्यांच्या सोबत फारच गुंतले जाऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ते फारच कठीण असू शकते. ब्राझील मधील एक मुलगी अशी म्हणते: “ते कठीण आहे. ख्रिस्ती युवकांसाठी अनुचित असलेल्या पार्ट्या आणि स्थळे अशा ठिकाणी जाण्यासाठी मला नेहमीच माझ्या शाळासोबत्यांकडून आमंत्रण मिळते. ते मला म्हणतात: “काय! तू येणार नाहीस? तू मूर्ख आहेस!”
८, ९. (अ) चांगले दिसणाऱ्या जगीक सोबत्यांची संगती एखाद्या ख्रिश्चनासाठी धोक्याची कसे असू शकेल? (ब) हितकारक मित्र तुम्हाला कोठे सापडतील?
८ धुम्रपान न केल्यामुळे, घाणेरडी भाषा न वापरल्यामुळे किंवा लैंगिक अनैतिकतेमध्ये न गुंतल्यामुळे काही जगीक युवक चांगले आहेत असे दिसतील. पण जर ते नीतिमत्त्वतेला अनुसरत नाहीत तर सहजपणे त्यांच्या वैषयिक विचारांनी आणि मनोवृत्तींनी तुमच्यावर प्रभाव होऊ शकेल. त्याशिवाय, अविश्वासूंबरोबर किती प्रमाणात तुमच्या आवडी निवडी सारख्या असू शकतील? (२ करिंथकर ६:१४-१६) तुम्हाला प्रिय असणारी आध्यात्मिक मूल्ये त्यांच्याकरता केवळ “मूर्खपणाच्या” आहेत! (१ करिंथकर २:१४) तुमच्या तत्वांशी हातमिळवणी न करता तुम्ही त्यांच्याशी मैत्री ठेवू शकता का?
९ म्हणूनच, अहितकारक सोबत्यांना टाळा. यहोवावर खरोखर प्रेम करणाऱ्या आध्यात्मिक मनाच्या ख्रिश्चनांपर्यंतच तुमची संगत मर्यादीत ठेवा. मंडळीतल्या नकारात्मक किंवा टीकात्मक युवकांपासून सावध रहा. जसजसे आध्यात्मिकतेत तुम्ही वाढत जाता, तसतसे मित्रांबद्दल तुमची आवड बदलत जाते. एक साक्षीदार असलेली युवती अशी म्हणते: “मी वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये नवीन मित्र व मैत्रीणी बनवत असते. त्यामुळे जगीक मित्र किती अनावश्यक आहेत याची जाणीव मला झाली.”
चुकीच्या वासनांपासून दूर पळणे
१०, ११. (अ) “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ” याचा काय अर्थ होतो? (ब) एखादी व्यक्ती “जारकर्माच्या प्रंगापासून पळ” कसा काढू शकते?
१० “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ,” असे पौलाने तीमथ्याला आर्जवून सांगितले. तुम्ही तरुण असताना, लोकप्रिय होण्याची, मौज करण्याची, किंवा लैंगिक वासनांना तृप्त करण्याची इच्छा फारच प्रबळ असू शकते. अशा वासनांना आळा घातला नाही तर त्या तुम्हाला पापाकडे निरवू शकतात. एखाद्याचा जीव धोक्यात असल्यावर तो जसा पळतो त्याप्रमाणेच अपायकारक वासनांपासून पळून जाण्यासाठी पौलाने सांगितले.a
११ उदाहरणार्थ, लैंगिक वासनाने पुष्कळ ख्रिस्ती युवकांना आध्यात्मिक नाशाकडे निरवले आहे. म्हणूनच, चांगल्या कारणास्तव “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा,” असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. (१ करिंथकर ६:१८) जर एक जोडपे भेटीगाठी करत असेल किंवा प्रणयाराधना करत असेल तर घरात किंवा उभ्या केलेल्या कारमध्ये एकटे असणे अशा मोहविणाऱ्या परिस्थितींना टाळून ते ह्या तत्वाला लागू करू शकतात. तुमच्या बरोबर एखाद्या प्रौढ व्यक्तीला घेणे जुन्यापद्धतीचे वाटेल परंतु, ते एक खरोखरचे संरक्षण असू शकते. आणि जरी प्रेम व्यक्त करण्यासाठी काही भावना उचित असतील तरी अशुद्ध वर्तणूक टाळण्यासाठी योग्य मर्यादा ठेवल्या पाहिजेत. (१ थेस्सलनीकाकर ४:७) जारकर्माच्या प्रसंगापासून पळून जाणे यामध्ये अनैतिक वासना उत्पन्न करणाऱ्या चित्रपटांना किंवा दूरदर्शनाच्या कार्यक्रमांना टाळण्याचाही समावेश आहे. (याकोब १:१४, १५) अनैतिक विचार सहजपणे तुमच्या मनात आले तर मानसिकरित्या विषय बदला. कोठेतरी फिरायला जा; काही वाचन करा; किंवा घरातले एखादे काम करा. ह्या बाबतीत विशेषकरून प्रार्थना एक शक्तीशाली साधन आहे.—स्तोत्रसंहिता ६२:८.b
१२. वाईटाचा द्वेष करण्यास तुम्ही कसे शिकता? स्पष्टीकरण द्या.
१२ अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाईट गोष्टींचा द्वेष, वीट आणि तिरस्कार करावयास तुम्ही शिकले पाहिजे. (स्तोत्रसंहिता ९७:१०) आधी उपभोग्य किंवा मौजेच्या वाटणाऱ्या गोष्टीचा तुम्ही कसा द्वेष कराल? त्याच्या परिणामांचा विचार करून! “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही परितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.” (गलतीकर ६:७, ८) वासनाच्या स्वाधीन होण्यासाठी मोह झाल्यावर यहोवा देवाला ते कसे दुखवेल या मोठ्या परिणामाचा विचार करा. (स्तोत्रसंहिता ७८:४१ पडताळा) नको असलेल्या गरोदरपणाच्या शक्यतेचा, किंवा एड्स सारखा रोग होण्याच्या शक्यतेचाही विचार करा. तुम्हाला होणारी भावनात्मक हानी आणि मानहानीचा विचार करा. दीर्घ-काळचे परिणामही असतीलच. एक ख्रिस्ती स्त्री असे कबूल करते: “आम्ही एकमेकांना भेटण्याआधी, मी आणि माझ्या पतीने इतर लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवले होते. आज आम्ही ख्रिस्ती आहोत तरी, आमच्या संसारात आमचे मागील जीवन भांडण आणि मत्सराचे मूळ बनले आहे.” तुमच्या ईश्वरशासित विशेषाधिकारांना गमावणे किंवा ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत होण्याच्या शक्यतेकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये! (१ करिंथकर ५:९-१३) क्षणिक सुख मिळविण्यासाठी एवढी मोठी किंमत द्यावी लागेल का?
यहोवासोबत निकटचा संबंध कायम ठेवणे
१३, १४. (अ) वाईटापासून पळून जाणे एवढेच पुरेसे का नाही? (ब) “परमेश्वराचे [यहोवा न्यू.व.] ज्ञान मिळवण्यास” एखादा कसा झटू शकतो?
१३ तथापि, वाईटापासून दूर पळून जाणे एवढेच पुरेसे नाही. “नीतिमत्व, विश्वास, प्रीति, शांति ह्यांच्या पाठीस लाग,” असे तीमथ्याला आर्जवले गेले. ते जोमदार क्रियेला सुचवते. होशेय संदेष्ट्याने अशाचप्रकारे इस्राएलाच्या अविश्वासू राष्ट्राला विनंती करून म्हटले: “चला, आपण परमेश्वराकडे [यहोवा, न्यू.व.] परत जाऊ . . . आपण परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] ज्ञान मिळवण्यास झटू.” (होशेय ६:१-३) तुम्ही स्वतःहून असा प्रयत्न केला आहे का? त्यात सभांना उपस्थित राहणे आणि पालकांच्या बरोबर क्षेत्र सेवेला जाणे यापेक्षाही जास्त गोवलेले आहे. एका ख्रिस्ती स्त्रीने असे कबूल केले: “माझ्या पालकांनी मला सत्यामध्ये वाढवले, आणि लहान वयातच माझा बाप्तिस्मा झाला. . . . मी क्वचितच सभा किंवा सेवा कार्याचा महिना चुकवत होते, पण तरी यहोवा बरोबर जवळचा व्यक्तिगत नातेसंबंध मी कधीच उत्पन्न केला नाही.”
१४ एक दुसरी युवती असे कबूल करते की यहोवाला एक कल्पित आत्मा या दृष्टिकोनाने तिने पाहिल्यामुळे, त्याला ती मित्र आणि पिता या नात्याने जाणून घेण्यास अपयशी ठरली. ती अनैतिक कामात गुंतली गेली आणि वयाच्या १८ व्या वर्षी एक अविवाहित माता बनली. तीच चूक करू नका! होशेयाने अर्जविल्याप्रमाणे, “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] ज्ञान मिळवण्यास” झटा. प्रार्थनेद्वारे आणि यहोवाशी निकटचा संबंध ठेवण्याद्वारे तुम्ही यहोवाला तुमचा विश्वासू मित्र बनवू शकता. (मीखा ६:८; यिर्मया ३:४ पडताळा.) आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर “तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कृत्ये १७:२७) म्हणूनच नियमित व्यक्तिगत पवित्रशास्त्र अभ्यासाचा कार्यक्रम आवश्यक आहे. असा नित्यक्रम तपशीलवार तयारी करण्यासाठी किंवा गुंतागुंतीचा असण्याची गरज नाही. मेलडी नावाची युवती अशी म्हणते की, “प्रत्येक दिवशी मी सुमारे पंधरा मिनिटांसाठी पवित्र शास्त्र वाचते.” द वॉचटावर आणि अवेकचा प्रत्येक अंक वाचण्यासाठी वेळ बाजूला काढून ठेवा! मंडळीच्या सभांसाठी तयारीत असा म्हणजे तुम्ही “[इतरांना] प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देऊ शकाल.—इब्रीकर १०:२४, २५.
तुमच्या पालकांना तुमचे मन द्या
१५. (अ) कधीकधी एखाद्याला त्याच्या पालकांच्या अधीन राहण्यास कठीण का वाटेल? (ब) आज्ञापालन हे नेहमीच एखाद्या युवकाच्या हितासाठी का असते?
१५ देवाचे भय राखणारे पालक खरी मदत व आधाराचे उगमस्थान असू शकतात. पण, तुम्हाला ज्या भूमिकेला पार पाडायचे आहे त्याकडे लक्ष द्या: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत रहा, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आई ह्यांचा मान राख; ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’ अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.” (इफिसकर ६:१-३) तुम्ही प्रौढ होत आहात आणि त्याप्रमाणे तुम्हाला अधिक स्वातंत्र्याची इच्छा होते हे खरे आहे. तुमच्या पालकांच्या मर्यादांबद्दल तुम्हाला अधिक जाणीव असेल. प्रेषित पौलाने असे कबूल केले: “आपल्या वडिलांनी . . . त्यांना योग्य दिसेल, त्याप्रमाणे आपल्यासाठी उत्तम ते करण्याची त्यांनी शिकस्त केली.” (इब्रीकर १२:१०, सुबोध भाषांतर) तरीसुद्धा, सगळ्या फायद्यांचा विचार करून असे दिसते की, त्यांच्या अधीन राहणे हे तुमच्या लाभासाठी आहे. तुमच्या पालकांचे तुमच्यावर प्रेम आहे आणि इतरांपेक्षा ते तुम्हाला चांगले जाणतात. तेव्हा जरी तुम्ही त्यांच्याशी कधीकधी सहमत दर्शवणारे नसाल तरी त्यांना तुमच्याबद्दल नेहमीच चांगल्या भावना वाटत असतात हे लक्षात असू द्या. मग “प्रभूच्या [यहोवा, न्यू.व.] शिस्तीत व शिक्षणांत” वाढवण्याच्या त्यांच्या परिश्रमांचा विरोध का करावा बरे? (इफिसकर ६:४) खरोखरच, एक मूर्ख व्यक्तीच “आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानितो.” (नीतिसूत्रे १५:५) एक बुद्धिमान युवक त्याच्या पालकांच्या अधिकाराला जाणून घेईल आणि त्यांना योग्य आदर दाखवेल.—नीतिसूत्रे १:८.
१६. (अ) पालकांपासून समस्या लपवणे हे युवकांसाठी असंमजसपणाचे का आहे? (ब) पालकांसोबत युवकांचे दळणवळण सुधारण्याकरता ते काय करू शकतात?
१६ त्यामध्ये तुमच्या पालकांशी सत्य बोलणे, सत्याबद्दल भेडसावणाऱ्या शंका किंवा संशयास्पद वर्तणुकीत परत समाविष्ट होणे या समस्यांची त्यांना जाणीव करून देणे ह्या गोष्टींचा समावेश आहे. (इफिसकर ४:२५) तुमच्या पालकांपासून क्षुब्धविणाऱ्या परिस्थिती लपवून ठेवल्याने आणखी जास्त समस्या उद्भवतात. (स्तोत्रसंहिता २६:४) काही पालक दळणवळण ठेवण्यासाठी खूपच कमी परिश्रम घेतात ही गोष्ट खरी आहे. एक युवती अशी तक्रार करते की, “माझी आई बसून कधीही माझ्या बरोबर चर्चा करीत नाही. ती माझी टीका करेल याचे भय मला असल्यामुळे मला काय वाटते हे सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही.” तुम्ही जर अशाच स्थितीत असाल तर, तुमच्या पालकांना तुम्हाला काय वाटते ते समजून देण्यासाठी संमजसपणे एखादी योग्य वेळ निवडा. नीतिसूत्रे २३:२६ आम्हाला आर्जवून सांगते, “माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे.” गंभीर समस्या उद्भवण्याआधीच तुमच्या दृष्टिने महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींची त्यांच्यासोबत नियमितपणे चर्चा करण्याचा प्रयत्न करा.
नीतिमत्वतेचा पाठलाग करा!
१७, १८. नीतिमत्वतेचा पाठलाग चालू ठेवण्यात एखाद्या युवकाला कशामुळे मदत मिळेल?
१७ पौलाच्या दुसऱ्या पत्राच्या शेवटी त्याने तीमथ्याला असे आग्रहाने सांगितले: “तू तर त्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून रहा.” (२ तीमथ्य ३:१४) तुम्हीसुद्धा असेच करावयास हवे. तुमच्या नीतिमत्वतेच्या ध्येयापासून तुम्हाला खेचण्यासाठी कोणालाही किंवा कोणत्याही गोष्टीला तुम्ही अनुमती देऊ नका. सैतानाचे जग त्याच्या आकर्षणासोबत दुष्टाईने भरलेले आहे. लवकरच त्याचा आणि त्याच्यात भाग असलेल्या सगळ्यांचा संपूर्ण नाश होईल. (स्तोत्रसंहिता ९२:७) सैतानाच्या गटासोबत तुमचा नाश न होण्यासाठी तुम्ही निश्चयी असा.
१८ ह्या ध्येयाला लक्षात ठेवून, तुम्ही सतत तुमची ध्येये, इच्छा आणि तुमच्या आवडीनिवडींचे परीक्षण करावे. स्वतःला विचारा, ‘माझे पालक आणि मंडळी मला पाहू शकत नाही तेव्हा भाषा आणि वर्तणुकीचे उच्च दर्जे मी बाळगतो का? मी कोणत्या प्रकारचे सोबती निवडतो? माझ्या पेहरावावर आणि केशरचनेवर जगीक मित्रांचे वर्चस्व आहे का? मी स्वतःसाठी कोणती ध्येये निवडली आहेत? सैतानाच्या मरत असलेल्या व्यवस्थीकरणात ध्येय निवडण्यासाठी पूर्ण-वेळ सेवा करण्यासाठी माझी तीव्र इच्छा आहे का?’
१९, २०. (अ) यहोवाच्या अपेक्षांनी एखाद्या युवकाला भारावून गेल्यासारखे का वाटू नये? (ब) युवक स्वतःसाठी कोणत्या तरतुदींचा उपयोग करून घेऊ शकतात?
१९ कदाचित तुमच्या विचारसरणीत काही बदल करण्याची गरज तुम्हाला भासेल. (२ करिंथकर १३:११) भारावून जाऊ नका. हे ध्यानात ठेवा की योग्य गोष्टीपेक्षा जास्त असे यहोवा तुमच्याकडून अपेक्षा करणार नाही. मीखा संदेष्ट्याने असे विचारले: “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] तुजजवळ काय मागतो?” (मीखा ६:८) तुमच्या मदतीसाठी यहोवाच्या तरतुदींचा उपयोग करून घेतल्यास ते फार कठीण नसणार. तुमच्या पालकांसोबत जवळीक ठेवा. ख्रिस्ती मंडळीबरोबर नियमितपणे संबंध ठेवा. विशेषतः मंडळीच्या वडिलांशी परिचय करून घेण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या हितासंबंधी काळजी घेतात आणि ते आधार व सांत्वनाचे उगमस्थान असू शकतात. (यशया ३२:२) पण, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, यहोवा देवासोबत घनिष्ठ व उबदार नातेसंबंध उत्पन्न करा. योग्य गोष्टीचा पाठलाग करण्यासाठी तो तुम्हाला शक्ती व इच्छा देईल!
२० तरी अहितकारक संगीताला ऐकून काही युवक, आध्यात्मिकतेत वाढण्याच्या त्यांच्या परिश्रमांना क्षीण करतात. पुढील लेखात या विषयावर विशेष लक्ष दिले जाईल.
[तळटीपा]
a मत्तय २:१३ मध्येसुद्धा “पळून जा” याच्यासाठी ग्रीक शब्दाचा उपयोग केला आहे, जेथे हेरोदाच्या प्राणघातक कटापासून वाचण्यासाठी मरीयेला आणि योसेफाला “मिसर देशास पळून जा” असे सांगण्यात आले.—मत्तय १०:२३.
b वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या क्वशन्स् यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क या पुस्तकाच्या २६ अध्यायामध्ये लैंगिक वासनांना काबूत ठेवण्यासाठी तुम्हाला बरेच सहाय्यकारी सल्ले मिळतील.
तुम्हाला आठवते का?
▫ सैतानाचे “डावपेच” यांना विशेषकरून युवक भेदनीय का आहेत?
▫ जगीक युवकांसोबत घनिष्ट संबंध ठेवणे धोक्याचे का आहे?
▫ तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून कसे दूर पळू शकता?
▫ यहोवाबरोबरील जवळचा नातेसंबंध ठेवण्यासाठी तुम्ही कसे झटू शकता?
▫ तुमच्या पालकांशी दळणवळण राखणे महत्त्वाचे का आहे?
[चित्र]
इतर लोकांपासून अलिप्त होता येत नाही अशा वातावरणातील स्केटींग सारख्या एकत्र खेळात भेटीगाठी घेणाऱ्या जोड्या आपसातील ओळख वाढवू शकतात