यहोवाच्या वचनाद्वारे त्याला ओळखणे
“सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
१, २. (अ) शास्त्रवचनात वापरलेल्या “ओळख” आणि “ज्ञान” या शब्दांचा काय अर्थ आहे? (ब) कोणती उदाहरणे याचा अर्थ स्पष्ट करतात?
कोणाची केवळ ओळख असणे, किंवा कशाचे तरी वरकरणी ज्ञान असणे ह्या गोष्टी “ओळख” आणि “ज्ञान” याविषयी शास्त्रवचनात वापरलेल्या शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने उण्या पडतात. पवित्र शास्त्रात “अनुभवाद्वारे ओळखण्याची कृती” याचा समावेश होतो, असे ज्ञान जे “व्यक्तींमध्ये भरवशाचा नातेसंबंध” व्यक्त करते. (द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिऑलॉजी) यामध्ये यहोवाला त्याच्या काही खास कार्याला विचारात घेऊन ओळखण्याचा समावेश आहे, जसे की यहेज्केलाच्या पुस्तकात अनेक घटना आहेत जेथे यहोवाने वाईट कर्मे करणाऱ्यांविरूद्ध न्यायदंड बजावण्याविषयी घोषित करुन म्हटले: ‘तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आहे.’—यहेज्केल ३८:२३.
२ अनेक मार्गाने “ओळख” आणि “ज्ञान” याचा वापर केला जाऊ शकतो ज्याची स्पष्टता काही उदाहरणाद्वारे केली जाऊ शकते. अनेकांनी त्याच्या नावाचा धावा करुन कार्य करण्याचा दावा केला अशांबद्दल, जेव्हा येशूने म्हटले, “मला तुमची कधीच ओळख नव्हती,” तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की त्याला त्यांच्यासोबत कधीच काहीही कर्तव्य नव्हते. (मत्तय ७:२३) दुसरे करिंथकर ५:२१ म्हणते की, येशूला “पाप ठाऊक नव्हते.” याचा अर्थ हा होत नाही की त्याला पापाची जाणीव नव्हती तर उलटपक्षी, त्यात त्याचा वैयक्तिक सहभाग नव्हता. अशाचप्रकारे, येशूने जेव्हा म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे,” तेव्हा देव आणि ख्रिस्ताची नाममात्र ओळख असण्यापेक्षा अधिक काही यात गोवलेले होते.—पडताळा मत्तय ७:२१.
३. यहोवा खऱ्या देवाचे ओळख चिन्ह दाखवित आहे याला काय शाबीत करते?
३ यहोवाचे अनेक गुण त्याचे वचन, पवित्र शास्त्राद्वारे माहीत होतात. त्यातील एक अचूकपणे भविष्यवाणी करण्याची त्याची कुवत हा आहे. ही कुवत खऱ्या देवाचे चिन्ह आहे: “ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हांस कळवा; प्रथम घडणाऱ्या गोष्टी कोणत्या ते सांगा, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करु व त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू; अथवा पुढे होणाऱ्या गोष्टी आम्हास ऐकवा. पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहा असे आम्ही समजू; तुम्ही बरे-वाईट काहीतरी करा म्हणजे आम्ही तात्काळ चकीत होऊन पाहू.” (यशया ४१:२२, २३) त्याच्या वचनात यहोवा पृथ्वीवरील त्याची सृष्टी आणि त्यावरील जीवनाविषयी प्रथम सांगत आहे. अनेक काळाअगोदर होणाऱ्या गोष्टीविषयी व त्या कशाप्रकारे घडून येतील हे त्याने काळाच्या अगोदरच सांगितले आहे. आणि आता सुद्धा तो “पुढे काय होईल ते कळवतो,” खासपणे “शेवटच्या दिवसात” होणाऱ्या गोष्टीविषयी तो कळवतो.—२ तीमथ्य ३:१-५, १३; उत्पत्ती १:१-३०; यशया ५३:१-१२; दानीएल ८:३-१२, २०-२५; मत्तय २४:३-२१; प्रकटीकरण ६:१-८; ११:१८.
४. यहोवाने त्याच्या सामर्थ्याच्या गुणाचा वापर कसा केला होता, आणि तो त्याचा वापर कसा करील?
४ यहोवाचा आणखी एक गुण, सामर्थ्य हा आहे. याचा पुरावा आकाशात दिसत आहे, जेथे तारे प्रकाश आणि उष्णता याचे मिश्रण करून जणू मोठ्या भट्ट्या ओतत आहेत. जेव्हा बंडखोर मनुष्य आणि देवदूत यहोवाच्या सार्वभौमतेला आवाहन करतात, तेव्हा तो त्याच्या सामर्थ्याचा वापर “रणवीरा”प्रमाणे करतो, त्याच्या चांगल्या नावाचे आणि धार्मिक दर्जांचे समर्थन करतो. जसे नोहाच्या दिवसातील जलप्रलय, सदोम व गमोरा नगरांचा नाश, आणि तांबड्या समुद्रातून इस्राएलांची मुक्तता, अशा घटनेत नासधूस करण्यासाठी तो त्याच्या सामर्थ्याला मुक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. (निर्गम १५:३-७; उत्पत्ती ७:११, १२, २४; १९:२४, २५) थोडक्याच अवधीत देव त्याच्या शक्तीचा वापर ‘सैतानाला तुमच्या पायाखाली तुडविण्यासाठी करील.’—रोमकर १६:२०.
५. यहोवाजवळ त्याच्या सामर्थ्याबरोबरच, आणखी कोणता गुण देखील आहे?
५ तथापि, ह्या अमर्यादित सामर्थ्याबरोबर लीनता देखील आहे. स्तोत्रसंहिता १८:३५, ३६ म्हणते: “तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहे.” देवाठायी असलेल्या लीनतेमुळे तो, “आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो, कंगालास धुळीतून उठवितो, दारिद्य्रास उकिरड्यावरुन उचलितो.”—स्तोत्रसंहिता ११३:६, ७.
६. यहोवाचा कोणता गुण जीवन वाचविणारा आहे?
६ मनुष्याबरोबरच्या संबंधात यहोवाची दया जीवन वाचविणारी आहे. मनश्शेने भयानक कृत्य केले असतानाही त्याला क्षमा करून त्याने किती दया दाखविली होती! यहोवा म्हणतो: “मी कोणा दुर्जनास म्हणालो की तू मरशीलच, आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरील, त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत. नीतीने व धार्मिकतेने वागत असल्यामुळे तो जगेलच.” (यहेज्केल ३३:१४, १६; २ इतिहास ३३:१-६, १०-१३) दिवसातून सात वेळा असे ७७ वेळा क्षमा करण्याचे आर्जविण्याद्वारे येशू यहोवाचे अनुकरण करीत होता!—स्तोत्रसंहिता १०३:८-१४; मत्तय १८:२१, २२; लूक १७:४.
भावना असलेला देव
७. यहोवा ग्रीक देवांपासून कसा वेगळा आहे, आणि कोणता मौल्यवान विशेषाधिकार आमच्यासाठी उघडा आहे?
७ एपीक्युरीयन सारखे ग्रीक तत्त्वज्ञानी देवावर विश्वास ठेवत होते परंतु त्यांचा असा दृष्टिकोन होता की ते देव पृथ्वीपासून दूर असल्यामुळे त्यांना मनुष्याबद्दल कसलीही आस्था किंवा त्याच्या भावनेवर कशाचा प्रभाव होत नाही. पण, यहोवा आणि त्याच्या विश्वासू साक्षीदारांमधील नातेसंबंध किती वेगळा आहे! “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.” (स्तोत्रसंहिता १४९:४) जलप्रलयापूर्वी दुष्ट लोकांनी त्याला खेदीत केले आणि यामुळे “त्याला अनुताप झाला.” इस्राएलांनी त्यांच्या अविश्वासूपणामुळे यहोवाला दुःख आणि वेदना दिल्या. ख्रिश्चन त्यांच्या आज्ञाभंगामुळे यहोवाच्या आत्म्याला खेदीत करु शकतात; तथापि, त्यांच्या विश्वासूपणामुळे ते त्याला आनंदित करू शकतात. पृथ्वीवरील क्षुद्र माणूस विश्वाच्या सृष्टिकर्त्याला खेदीत किंवा आनंदी करू शकतो याचा विचार करणे किती आश्चर्यकारक आहे! तो आमच्यासाठी जे करीत आहे ते लक्षात घेऊन, त्याला आनंद देण्याचा किती मौल्यवान विशेषाधिकार आम्हाला आहे!—उत्पत्ति ६:६; स्तोत्रसंहिता ७८:४०, ४१; नीतिसूत्रे २७:११; यशया ६३:१०; इफिसकर ४:३०.
८. अब्राहामाने यहोवासोबत त्याच्या बोलण्यातल्या प्रशस्तपणाचा कसा उपयोग केला?
८ देवाचे वचन दाखविते की यहोवाच्या प्रीतीमुळे आम्हाला “बोलण्यातला प्रशस्तपणा” मिळाला आहे. (१ योहान ४:१७, न्यू.व.) यहोवा सदोमाचा नाश करण्यासाठी आला तेव्हा अब्राहामाच्या घटनेचा विचार करा. अब्राहामाने यहोवाला म्हटले: “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्या प्रकारची कृती तूजपासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” देवाला बोलण्याचे कसले ते शब्द! तथापि, ५० धार्मिक लोक असतील तर यहोवाने सदोमला वाचविण्याची सहमती दिली. अब्राहाम ५० असलेली संख्या २० पर्यंत कमी करीत राहिला. तो जास्त दबाव तर आणीत नाही ना असे त्याला भय वाटले म्हणून पुढे त्याने म्हटले: “प्रभूला [यहोवा, न्यू.व.] राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो: तेथे कदाचित दहाच आढळली तर?” पुन्हा यहोवा ते मान्य करतो: “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”—उत्पत्ति १८:२३-३३.
९. अब्राहामाने यहोवाबरोबर केलेल्या बोलण्याला यहोवाने अनुमती का दिली आणि आम्ही यापासून काय शिकू शकतो?
९ अब्राहामाला अशाप्रकारे बोलण्यातल्या प्रशस्तपणाची अनुमती यहोवाने का दिली? एका गोष्ट ही की, यहोवाला अब्राहामाच्या दुःखी भावनेची कल्पना होती. अब्राहामाचा पुतण्या लोट सदोमात राहात आहे आणि अब्राहाम त्याच्या सुरक्षिततेची काळजी करीत होता हे त्याला माहीत होते. याशिवाय, अब्राहाम देवाचा मित्र होता. (याकोब २:२३) एखादा खासपणे तो मित्र आहे, आणि एखाद्या भावनात्मक दबावात असल्यामुळे जेव्हा आम्हाला तो कठोरपणे बोलतो, तेव्हा त्याच्या बोलण्याच्यामागील भावना समजून आम्ही परिस्थितीला सुसह्य करून विचारात घेतो का? अब्राहामाप्रमाणे, आमच्या बोलण्यातला प्रशस्तपणाचा वापर यहोवा समजून घेईल हे पाहणे सांत्वनदायक नाही का?
१०. बोलण्यातला प्रशस्तपणा प्रार्थनेत आम्हाला कसा मदत करतो?
१० खासपणे आम्ही आमचा ‘प्रार्थना ऐकणारा’ असा त्याचा शोध घेतो, व अतिशय दुःखित आणि भावनात्मकरित्या अस्वस्थ झालो असता आमचा जीव प्रार्थनेत त्याच्यापुढे ओतण्यासाठी बोलण्यातल्या प्रशस्तपणाची काकुळतीने मागणी करीत असतो. (स्तोत्रसंहिता ५१:१७; ६५:२, ३) शब्द अपुरे पडत असतील अशा प्रसंगी देखील, “आत्माही आपल्या अशक्तपणात हातभार लावतो,” आणि ते यहोवा ऐकतो. त्याला आमचे विचार माहीत असू शकतात: “तू दुरून माझे मनोगत समजतोस; हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही.” म्हणूनच आम्ही मागत, शोधत, आणि ठोकत सुद्धा राहू शकतो.—रोमकर ८:२६; स्तोत्रसंहिता १३९:२, ४; मत्तय ७:७, ८.
११. यहोवा खरोखर आमची काळजी घेतो हे कसे दाखविले आहे?
११ यहोवा काळजी घेतो. त्याने निर्माण केलेल्या जीवनाला तो भरवीत असतो. “सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्याचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणीमात्रांची इच्छा पुरी करतोस.” (स्तोत्रसंहिता १४५:१५, १६) झुडपातील पक्ष्यांना तो कसे भरवतो हे पाहण्याचे आम्हाला तो आमंत्रण देतो. रानातील कमळे पाहा, तो त्यांना किती सुंदर वस्त्रांनी सजवतो. येशूने यात भर टाकली की जसे देव यांच्याबाबतीत करीत आहे त्या सर्वांपेक्षा अधिक तो आम्हासाठी करील. मग आम्हाला चिंता का वाटावी बरे? (अनुवाद ३२:१०; मत्तय ६:२६-३२; १०:२९-३१) पहिले पेत्र ५:७ “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो” याचे तुम्हाला आमंत्रण देते.
“त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप”
१२, १३. यहोवाला आम्ही त्याची सृष्टी आणि पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या त्याच्या कृत्याव्यतिरिक्त, आणखी कोठे पाहू आणि ऐकू शकतो?
१२ यहोवाला आम्ही त्याच्या सृष्टीद्वारे पाहू शकतो; पवित्र शास्त्रात त्याची कृत्ये वाचण्याद्वारे आम्ही त्याला पाहू शकतो; येशू ख्रिस्ताविषयी जी वचने आणि कृत्ये उद्धृत केलेली आहेत त्याद्वारे देखील आम्ही त्याला पाहू शकतो. योहान १२:४५ मध्ये स्वतः येशूने असे म्हटले: “जो मला पाहतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो.” पुन्हा योहान १४:९ म्हणते: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” कलस्सैकर १:१५ म्हणते: “[येशू] अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे.” इब्रीयांस १:३ म्हणते: “त्याच्या [देवाच्या] गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरुप [येशू] आहे.”
१३ यहोवाने येशूला केवळ खंडणी भरून देण्यासाठीच नव्हे तर शब्दाने आणि कार्याद्वारे आम्ही त्याचे अनुकरण करावे म्हणून पाठविले होते. येशूने देवाचे वचन सांगितले. योहान १२:५० मध्ये त्याने म्हटले: “जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.” त्याने स्वतःच्याच मनाप्रमाणे केले नाही, तर देवाने सांगितल्याप्रमाणे केले. योहान ५:३० मध्ये त्याने म्हटले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे काहीही करत नाही.”—योहान ६:३८, न्यू.व.
१४. (अ) येशूला कोणते दृश्य पाहून कळवळा आला? (ब) येशूच्या बोलण्याच्या कोणत्या पद्धतीमुळे त्याचे ऐकण्यासाठी लोक आले?
१४ येशूने कोडी, अपंग, बहिरे, अंध आणि भूतग्रस्त व त्यांच्या मृतांसाठी रडणाऱ्या लोकांना पाहिले. त्यांचा त्याला कळवळा येऊन त्याने आजाऱ्यांना बरे केले व मृतांना उठविले. त्याने पाहिले की लोकसमुदाय आध्यात्मिक बाबतीत गांजलेला आणि पांगलेला आहे व तो त्यांना अनेक गोष्टी शिकवू लागला. त्याने त्यांना केवळ उचित शब्दानेच शिकवले नाही तर त्याच्या हृदयातील आल्हाददायक शब्द जे त्यांच्या थेट हृदयाप्रत गेले असे शिकवले. यामुळे त्यांना त्याच्याजवळ नेले गेले, त्याचे ऐकण्यासाठी ते लवकरच सकाळी मंदिरात येत राहिले, याने त्यांना त्याचे अनुकरण करीत राहण्यास व हर्षाने लक्षपूर्वक ऐकत राहण्यास भाग पाडले. त्याचे ऐकण्यासाठी ते त्याच्याजवळ गेले, आणि त्यांनी म्हटले की ‘कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.’ ते त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. (योहान ७:४६; मत्तय ७:२८, २९; मार्क ११:१८; १२:३७; लूक ४:२२; १९:४८; २१:३८) आणि त्याच्या शत्रुंनी त्याला प्रश्नात धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गप्प करण्यासाठी त्यांच्यावरच त्याने बाजू उलटवली.—मत्तय २२:४१-४६; मार्क १२:३४; लूक २०:४०.
१५. येशूच्या प्रचारकार्याचा प्रमुख विषय कोणता होता आणि त्याचा प्रचार करण्यात त्याने इतरांना कोठवर समाविष्ट केले?
१५ “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” अशी त्याने घोषणा केली आणि ऐकणाऱ्यांना “राज्य मिळवण्यास झट”ण्यास आर्जविले. “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” ख्रिस्ताचे साक्षीदार होण्यासाठी “सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य कर”ण्यासाठी त्याने इतरांना “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” याचा प्रचार करण्यासाठी पाठविले. आज, जवळजवळ ४५ लाख यहोवाचे साक्षीदार हे करण्यासाठी, त्याच्या पावलांचे अनुकरण करीत आहेत.—मत्तय ४:१७; ६:३३; १०:७; २८:१९; प्रे. कृत्ये १:८.
१६. यहोवाच्या प्रीती गुणाला कसे खडतर परीक्षेत टाकले गेले, परंतु मानवजातीसाठी त्याने काय साध्य केले?
१६ “देव प्रीती आहे,” असे १ योहान ४:८ मध्ये आम्हांला सांगितले आहे. त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर मरण्यासाठी पाठविले होते, तेव्हा त्याच्या या उल्लेखनीय गुणाला अतियातनाकारक परिक्षेत टाकले होते हे कल्पना करता येण्यासारखे आहे. असह्य परीक्षेत यहोवाला सात्विकता टिकवून ठेवणारे पृथ्वीवर लोक नाहीत ह्या सैतानाच्या आव्हानाला जरी येशूने खोटे शाबीत केले असले तरी या प्रिय मुलाने यातना सहन केल्या व त्याच्या स्वर्गीय पित्याकडे विनंती केली तेव्हा यहोवाला वेदना व दुःख झाले असेल. देवाने त्याला आमच्यासाठी मरावे म्हणून पाठविले यास्तव येशूच्या बलिदानाच्या महत्त्वाची आम्ही गुणग्राहकता बाळगली पाहिजे. (योहान ३:१६) हा सोप्यारितीने लगेच आलेला मृत्यू नव्हता. देव आणि येशूने दिलेल्या मोलाची गुणग्राहकता बाळगण्यासाठी आणि आमच्यासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व समजण्यासाठी, पवित्र शास्त्रातील नमूद केलेल्या घटनेचे आपण परिक्षण करु या.
१७-१९. येशूने त्याच्या पुढे असलेल्या परीक्षेचे वर्णन कसे केले?
१७ येशूने पुढे काय होणार ते कमीत कमी चार वेळा त्याच्या प्रेषितांना सांगितले होते. ते होण्याच्या काही दिवसाआधी त्याने म्हटले: “पाहा आपण वर यरुशलेमेस जात आहो; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवितील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील.”—मार्क १०:३३, ३४.
१८ येशूने रोमन क्लेशाचे भय जाणल्यामुळे पुढे काय होणार आहे, याचे दडपण त्याच्यावर आले होते. मारण्यासाठी, धातु आणि मेंढीच्या हाडाचे लहान तुकडे रोवलेल्या चामड्याच्या चाबकाची वादी वापरली जात होती; पाठ व पायावर सतत मार देत राहिल्याने रक्तस्राव होत असलेले शरीर विद्रुप होत असे. महिन्यांआधी, त्याच्यापुढे असलेली कसोटी त्याला भावनात्मक त्रास देत आहे, जे लूक १२:५० मध्ये आपण वाचतो, असे म्हणत त्याने दर्शविले होते: “मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे व तो होईतोपर्यंत मी मोठ्या पेचांत आहे.”
१९ वेळ जवळ येत असता त्याचे दडपण वाढत होते. त्याने याविषयी त्याच्या स्वर्गीय पित्याला सांगितले: “माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेस आलो आहे.” (योहान १२:२७) त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या ह्या विनंतीमुळे यहोवावर कसा परिणाम झाला असावा! त्याच्या मृत्युच्या काही तास आधी, गेथशेमाने बागेत येशू अतिशय चिंताग्रस्त झाला व त्याने पेत्र, याकोब आणि योहानाला म्हटले: “माझा जीव मरणप्राय, अति खिन्न झाला आहे.” त्याच्या काही मिनिटानंतर त्याने याविषयीची अंतीम प्रार्थना यहोवाला केली: “‘हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.’ मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” (मत्तय २६:३८; लूक २२:४२, ४४) हे वैद्यकिय शास्त्रात माहीत असलेले हिमॅटिड्रोसिस (रक्ताच्या त्वचेतून किंवा रक्त द्रवपदार्थ याद्वारे बाहेर पडले) असावे. असे होण्याची शक्यता कमी असते परंतु अति भावनात्मक परिस्थितीत असे होऊ शकते.
२०. येशूला त्याच्या परीक्षेतून बाहेर पडण्यासाठी कशाने मदत केली?
२० गेथशेमाने बागेतील या प्रसंगाविषयी इब्रीयांस ५:७ म्हणते: “मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली,” त्याला जो “मरणातून तारावयास समर्थ आहे” त्याने मरणापासून त्याला वाचविले नाही तरी, कोणत्या अर्थाने त्याची प्रार्थना अनुकूलरितीने ऐकली गेली? लूक २२:४३ उत्तर देते: “स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिले.” परीक्षा सहन करण्यासाठी देवाने पाठविलेल्या देवदूताने त्याला दृढ करून त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले.
२१. (अ) येशू परीक्षेतून विजयाने बाहेर पडला हे कशाने प्रगट होते? (ब) आमची परीक्षा अधिक वाढत असताना आम्ही बोलण्यासाठी कसे समर्थ होऊ शकतो?
२१ परिणामावरून हे स्पष्ट दिसत होते. आंतरीक झगडणे संपल्यावर, येशू उठला आणि पेत्र, याकोब आणि योहानाकडे परत गेला आणि म्हटले: “उठा, आपण जाऊ.” (मार्क १४:४२) परिणामस्वरूप तो म्हणत होता, ‘चुंबनाद्वारे माझा विश्वासघात होऊ द्या, टोळीकडून पकडले जाऊ द्या, बेकायदेशीरपणे परीक्षा घेतली जाण्यासाठी व अन्यायीपणे दोषी ठरविले जाण्यासाठी, माझी थट्टा होण्यासाठी, मजवर थुंकण्यासाठी, यातना देण्यासाठी आणि वधस्तंभावर खिळण्यासाठी मला जाऊ द्या.’ तीव्र अशा वेदना शेवटपर्यंत सहन करीत त्याला सहा तास तेथे ठेवले होते. तो मरत असतांना विजयानंदाने ओरडला: “पूर्ण झाले” (योहान १९:३०) यहोवाचे सार्वभौमत्त्व उंचावले व दृढ राहून त्याने त्याची सात्विकता शाबीत केली. यहोवाने त्याला पृथ्वीवर ज्या सर्व गोष्टींसाठी पाठविले होते त्या त्याने पूर्ण केल्या. आम्ही जेव्हा मरू किंवा त्याआधीच हर्मगिदोन आले, तर यहोवाकडून आम्हाला मिळालेल्या आज्ञेविषयी “पूर्ण झाले” असे आम्ही म्हणू शकू का?
२२. यहोवाच्या ज्ञानाचा विस्तार कशावरून दिसत आहे?
२२ काहीही असो, यहोवाच्या वेगाने येणाऱ्या नियुक्त समयात, “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” याची खात्री आम्ही बाळगू शकतो.—यशया ११:९.
तुम्हाला आठवते का?
▫ ओळख असणे आणि ज्ञान असणे याचा काय अर्थ होतो?
▫ यहोवाने आम्हाला त्याची दया आणि क्षमा त्याच्या वचनात कशी दाखविली आहे?
▫ यहोवाबरोबर अब्राहामने बोलण्यातल्या प्रशस्तपणाचा वापर कसा केला?
▫ आम्ही येशूकडे, आणि त्याच्यातील यहोवाच्या गुणांना का पाहू शकतो?