वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ११/१ पृ. २०-२५
  • शक्‍ती संपादीत करणे, गळून न जाणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शक्‍ती संपादीत करणे, गळून न जाणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा—प्रचंड शक्‍तीचा उगम
  • यहोवा तुम्हाला ताकद देऊ शकतो
  • आध्यात्मिक थकव्यासोबत लढत द्या
  • वडीलांनो—‘बळकटी देणारे उपकरण‘ बना
  • पायनियरांना आपली शक्‍ती कशी संपादता येईल?
  • यहोवा थकलेल्यांना बळ देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा थकलेल्यांस सामर्थ्य देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ताऱ्‍यांच्या निर्मितीवरून दिसणारी देवाची शक्‍ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ११/१ पृ. २०-२५

शक्‍ती संपादीत करणे, गळून न जाणे

“तो भागलेल्यांस जोर देतो; निर्बलास विपुल बल देतो.” —यशया ४०:२९.

१, २. मॅरेथॉन स्पर्धकांप्रमाणेच ख्रिश्‍चनांनाही कशाचा अनुभव येतो ते तुम्ही कसे विदारीत करणार?

१९८४च्या ऑक्टोबर मधील एके सकाळी न्यूयॉर्क शहरात १६,००० स्पर्धक मॅरेथॉन या धावण्याच्या शर्यतीत बाहेर पडले. ही शर्यत २६.२ मैल (४२.२ कि.मी.) लांबीची होती. शरद ऋतुतील त्या उष्ण दिवशी हवेत बराच उकाडा व दमटपणा होता. त्याने धावणाऱ्‍यांची ताकद आणि सहनशीलता यावर मोठा ताण आणला. यामुळे ही शर्यत उत्तमोत्तम खेळांडूकरता फारच कसोटीची ठरली. धावणारे कित्येक जण थकून गळून पडले. सुमारे २,००० जाणांनी शर्यत संपविली नाही. ज्यांनी ती पूर्ण के ली त्यांना खूप अडचणींचा सामना द्यावा लागला.

२ ख्रिश्‍चन सुद्धा एका शर्यतीत आहेत. याचे बक्षीस? सार्वकालिक जीवन. मॅरेथॉन शर्यतीप्रमाणेच त्यांनाही येथे सुरवातीपासून शेवटपर्यंत झटायचे आहे. सहनशीलतेची जरूरी आहे. आपली ताकद राखायची आहे, थकवा टाळला पाहिजे. जीवनाकरता असणारी ही शर्यत थोड्या पल्लयाची नसून लांब अंतराची आहे. पौलाने करिंथमधील आपल्या सहख्रिश्‍चनांना म्हटले: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हास ते मिळेल असे धावा.” (१ करिंथकर ९:२४) जोराचा यत्न करून नेटाने या शर्यतीत ख्रिश्‍चन धावत असतात.—लूक १३:२४.

३. शर्यत संपेपर्यंत ख्रिश्‍चनांना उत्साह व गति केवळ कशी टिकविता येईल?

३ तरीपण तुम्हाला याचे आश्‍चर्य वाटले की, ‘या शर्यतीत सुरवातीपासून शेवटपर्यंत तीच गति कोण ठेऊ शकेल?’ आपल्या शक्‍तीनुसार आपणापैकी कोणालाही हे जमणे साध्य नाही. बक्षीस मिळविण्यासाठी आपण प्रचंड शक्‍तीचा थोर उगम यहोवा देव याच्याकडून ती शक्‍ती प्राप्त केली पाहिजे.—इयोब ३६:२२; स्तोत्रसंहिता १०८:१३.

यहोवा—प्रचंड शक्‍तीचा उगम

४. यशया संदेष्ट्यानुसार, यहोवाला त्याच्या सेवकांना शक्‍ती देण्याची क्षमता आहे याविषयी आपला आत्मविश्‍वास का राखता येईल?

४ यहोवा निसंशये आपल्या सेवकांना शक्‍ती देऊ शकतो. यशया संदेष्टयामार्फत सर्वसमर्थ देवाने आपणाठायी असणाऱ्‍या क्षमतेची विपुलता आणि शक्‍तीमान कृत्यांची अतुलनीयता वदविली. “आपले डोळे वर करून पाहा” असे त्याने म्हटले. “ह्‍या सर्वांना कोणी उत्पन्‍न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो. तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो. त्याच्याठायी प्रचंड शक्‍तीची विपुलता आहे व तो प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही . . . तुला हे कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? यहोवा हा सनातन देव, दिगंत पृथ्वीचा उत्पन्‍नकर्ता आहे. तो थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे.”—यशया ४०:२६–२८.

५, ६. यहोवाठायीच्या प्रचंड शक्‍तीच्या पुराव्याची उदाहरणे द्या.

५ समर्यादेपासून ते अमर्यादित गोष्टीपर्यंत यहोवाचे निर्मिती सामर्थ्य मोठे अगाध आहे! उदाहरणार्थ, ज्यापासून सर्व गोष्टी व आपलीही रचना झाली त्या अणुचा विचार करा. ते इतके लहान आहेत की पाण्याच्या एक थेंबात शेकडो महापद्‌म अणु आढळतील. शिवाय हे आश्‍चर्य आहे की अणुच्या केंद्राभोवती प्रचंड शक्‍ती आहे जी एका प्रकरणात इतका प्रचंड स्फोट जमिनीत घडवून आणू शकते ज्यामुळे ३२ मजली खोल व पाव मैलभरचा खोल खड्डा तयार होईल.

६ आता दुसऱ्‍या बाजुला सूर्याचा विचार करा. अणुशक्‍तीची ही प्रचंड भट्टी जी कित्येक अब्ज टनाची आहे ती आमच्या सौर व्यवस्थेला प्रज्वलित करते. ती छोट्या छोट्या अणुपासून उद्‌भवणाऱ्‍या शक्‍तीमुळे पेटत राहते. पृथ्वीवरील वनस्पति, प्राणी व मानव यांचे जीवन त्या प्रचंड, महाप्रतापी शक्‍तीसामग्रीवर अवलंबून असले तरी खरे पाहता सूर्याची फारच कमी शक्‍ती पृथ्वीपर्यंत पोहोचते. वास्तविकरित्या जीवनाकरता इतकीच शक्‍ती पुरेशी आहे. ॲस्ट्रॉनॉमी या पुस्तकात खगोल शास्त्रज्ञ फ्रेड होयले लिहितात: “पृथ्वीवर पडणारा सूर्याच्या शक्‍तीचा फारच अल्प भाग—ज्याचे निदान शेकडो लाखो लाख भागातील पाचवा हिस्सा एवढे केले जाते तो—जगातील सर्व औद्योगिक केंद्रात एकंदर जी उर्जानिर्मिती होते तिच्या लाख पटीने मोठा आहे.”

७. या सृष्टीत जे सामर्थ्य दिसते त्यावर विचार केल्यावर आम्हाला यहोवाबद्दल कसे वाटावे?

७ तरीपण आमचा हा सूर्य आमच्या दुधाळ आकाश गंगेतील कित्येक महापद्‌म ताऱ्‍यांतील एक आहे. खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की ज्ञात असणाऱ्‍या विश्‍वात जवळपास १,००,००,००,००,००० इतक्या आकाशगंगा आहेत. हे विचाराला चक्रावून सोडते, हो ना? यहोवाने स्वतः कसे ‘आकाश पसरिले’ त्याविषयीचा विचारविनिमय केल्यावर इयोब स्वतः म्हणाला की देव “अतर्क्य महत्कृत्ये, अगणित अद्‌र्भित कृत्ये करतो.”—इयोब ९:८–१०.

यहोवा तुम्हाला ताकद देऊ शकतो

८. (अ) यहोवाच्या शक्‍तीपासून केवळ कोण मुक्‍तपणे घेऊ शकतो व का? (ब) यशया ४०:२९–३१ मधील अभिवचन विश्‍वासाला कसे उभारक ठरते?

८ ज्याने हे विश्‍व निर्मिले व राखले त्या प्रचंड शक्‍तीच्या झऱ्‍यापासून यहोवाच्या खऱ्‍या उपासकांना मुक्‍तपणे शक्‍ती मिळविता येते. यहोवाच्या सेवकांना ‘पवित्र आत्म्याच्या द्वारे बलसंपन्‍न’ होता येते. ही शक्‍ती अपुरी पडेल याचे भय वाटण्याचे कारण नाही. (इफिसकर ३:१६; स्तोत्रसंहिता ८४:४, ५) देवाचा प्रबळ हात आम्हाला शर्यतीच्या शेवटच्या खुणेच्या पार नेऊ शकतो हा अटळ आत्मविश्‍वास आपल्याला जीवनाच्या शर्यतीत यशप्राप्ती देऊ शकतो. तो आम्हाला ताकद देऊ शकतो. यशया संदेष्टा यहोवाबद्दल म्हणतो: ‘तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरूण थकतात, भागतात, भरज्वानीतले ठेचा खातात. तरी यहोवाची आशा धरून राहणारे नवीन शक्‍ती संपादन करतील. ते गरूडांप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाही.” (यशया ४०:२९–३१) हे शब्दच नुसते वाचले तर आम्हाठायी केवढे स्फुरण येते बरे!

९. तुमच्या ‘डोंगरा’समान समस्येबाबत यहोवा तुम्हाला कशी मदत करू शकतो?

९ खऱ्‍या उपासनेचा आवेश मंदावण्याची भीती घालणाऱ्‍या प्रचंड समस्या तुम्हापुढे उभ्या ठाकल्यातर तुम्हाला स्वतःबाबतीत खूपच लहान व क्षुद्र वाटायला लागते. पण यामुळे गोंधळू नका. आपल्या सर्वशक्‍तीमान स्वर्गीय पित्याकडे वळा. ‘त्याची आशा धरणाऱ्‍या सर्वांना’ तो बळ दतो. अणुचा निर्माता आपल्या लोकात पुरेशी शक्‍ती उत्पादित करू शकणार नाही का की ज्यामुळे ‘डोंगर’ ढळतील.? निश्‍चयाने!—मार्क ११:२३.

१०. (अ) ख्रिस्ती धावकांना कोणत्या गोष्टी निराश करतात? (ब) तुम्हाला काय करावे अशी शैतानाची इच्छा असते?

१० दुसऱ्‍या बाजूस बघता, ख्रिस्ती तत्वांचा अनादर करणाऱ्‍या या जगाच्या दबावाला प्रतिदिवशी तोंड देत राहण्यामुळे काही ख्रिश्‍चनांना एवढे गळून गेल्यासारखे वाटते की त्यांना आपली गति कमी करावी वा जीवनाची शर्यत थांबवावी असे वाटायला लागते. आजार, आर्थिक तणाव, कौटुंबिक समस्या, एकटेपणा व इतर अडचणी नैराश्‍य निर्माण करतात. उकाडा जसा मॅरेथॉन स्पर्धकांची शक्‍ती गळवितो त्याप्रमाणे हे नैराश्‍य ख्रिश्‍चनांची ताकद कमी करते. थोर प्रतिस्पर्धी दियाबल सैतान अशा गोष्टींचा वापर करून यहोवाचा सेवक या नात्याने तुमची सचोटी भंगविण्याचा प्रयत्न करतो. (१ पेत्र ५:८) दियाबलाला हे करू देऊ नका! आपली आध्यात्मिक शक्‍ती पुननिर्मित व्हावी याकरता अगणित अशा आकाशगंगेच्या निर्मात्याकडे बघा. यहोवा तुम्हाला बळ देईल.—स्तोत्रसंहिता ३७:१७; ५४:४.

११. अडखळणांचा सामना दावीदाने ज्या पद्धतीने केला त्यावरून आम्ही काय शिकू शकतो?

११ समस्या उभी राहिली तेव्हा दावीदाला नेहमी यहोवा नव्या शक्‍तीचा उगम आहे असे आढळले. पवित्र आत्म्याकरवी नवी शक्‍ती संपादित करून दाविदाने विरोधावर ‘मात केली.’ त्याने म्हटले: “तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो. माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.” दावीदाने आणखी म्हटले: “देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू. तोच आमच्या शत्रूस तुडवून टाकील.” (स्तोत्रसंहिता १८:२९, ६०:१२) हेच यहोवा तुम्हासाठीही करू शकतो.

आध्यात्मिक थकव्यासोबत लढत द्या

१२. (अ) आध्यात्मिक थकव्यापासून लगेच सुटका का करावी? (ब) आध्यायित्मक थकव्याची कोणती लक्षणे आहेत? (क) आध्यात्मिकदृष्टया थकलेल्यांनी नवी शक्‍ती मिळवावी याकरता यहोवाने कोणत्या तरतूदी केल्या आहेत?

१२ आध्यात्मिक थकवा येत असल्याची लक्षणे आम्ही त्वरित ओळखण्यास हवीत व तितक्याच त्वरेने त्याजशी सामना करण्यास तयार राहिले पाहिजे. ते का बरे? कारण ‘अरूंद दरवाजाने आत जाण्याचा जोराने यत्न करणारे’ किंवा जे शर्यतीतील शेवटीची खूण ओलांडून पार जातात आणि चिरकालिक जीवनाचे बक्षीस मिळवितात ते थोडके आहेत. (लूक १३:२४; फिलिप्पैकर ३:१२, १३) सोबतचा “आध्यात्मिक थकव्यासोबत लढत देण्याचे काही मार्ग” या तक्त्याचे परीक्षण करा. त्यातील काही लक्षणे तुम्हामध्ये किंवा तुमच्या कौटुंबिक सदस्यात दिसतात का? तर मग सुधारणा घडवून आणण्यासाठी त्वरित पावले उचला. यहोवाकडील तरतूदींचा जो आलेख तेथे दाखविण्यात आला आहे त्याद्वारे बळ प्राप्त करून आपल्या आध्यात्मिकतेस नवा उजाळा द्या.

१३, १४. (अ) आमच्या आध्यात्मिक शक्‍तीला नवी करण्यात कोणती उदाहरणे साहाय्यक ठरू शकतील? (ब) यहोवाचा दीर्घकाळ सेवक असणाऱ्‍या कडील सल्ला आम्हाला शर्यतीत टिकून राहण्यात कशी मदत देतो?

१३ पवित्र शास्त्रात देण्यात आलेल्या देवाच्या विजयी सेवकांच्या उदाहरणाचे अनुकरण करून थकवा निर्माण करणाऱ्‍या प्रवृत्तीचा तुम्हाला प्रतिकार करता येईल. ही उदाहरणे पुष्कळ पुरुष, स्त्रीया, तरूण व वृद्ध यांची आहेत ते शेवटपर्यंत टिकून राहिले. याविषयीचे वाचन शास्त्रवचनात इब्रीयांस पत्र ११:४–४० मध्ये करा. याजप्रमाणे आजच्या काळात आम्हाला पुष्कळ प्रिय बंधू भगिनी आहेत जे अविश्रांतपणे यहोवाची सेवा करीत आहेत.

१४ अमेरिकेच्या दक्षिण भागात राहणारे जॉर्ज हे त्या ख्रिस्ती धावकांपैकी आहेत जे थकले नाहीत. सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत ५० पेक्षा अधिक वर्षांची दौड केल्यानंतरही ते अजूनही बळकट आहेत. ते आम्हाला कोणता सल्ला देतात?

“मी हे जोर देऊन सांगेल की संस्थेस जडून राहा. यहोवाकरवी नियुक्‍त असणारा येशू ख्रिस्त ही संस्था चालवीत आहे हे लक्षात घ्या. त्यामुळेच तुमच्यानिकटचा कोणी अविश्‍वासू झाला तर निराश होऊ नका. तुम्हाला पुर्णपणे आकलन होत नाही अशी काही गोष्ट असली किंवा तिचा स्विकार करणे तुम्हाला कठीण वाटते तर याची खात्री बाळगा की काही काळानंतर ती तुम्हाला स्पष्ट होईल. यहोवाच्या संस्थेनेच आपल्याला येथपर्यंत आणले आहे. त्यामुळे तीच आपल्याला नव्या व्यवस्थेत घेऊन जाईल याचा विश्‍वास बाळगा.”—योहान ६:६६–६८.

१५. उत्तम उदाहरणाकडून आमचा आत्मा उत्साही व्हावयाचा आहे तर आम्ही काय करावे?

१५ तुमच्या मंडळीतही असे काही मोलवान लोक असतील किंवा अशांना तुम्ही विभागीय संमेलनात भेटू शकाल. त्यांच्याबरोबर बोला. त्यांच्याकडून शिका. अशा लोकांची आणखी उदाहरणे वार्षिक अहवाल पुस्तक, दी वॉचटॉवर मासिक आणि वॉचटॉवर संस्थेच्या इतर प्रकाशनात आढळतील. त्यांचे अहवाल वाचा. या अनुभवांकडून तुम्हाला कसे बळ मिळते ते पहा.

वडीलांनो—‘बळकटी देणारे उपकरण‘ बना

१६. (अ) वडील सहख्रिश्‍चनांना परत शक्‍ती प्राप्त होण्यासाठी कशी मदत देऊ शकतात? (ब) उत्तेजन व सूचना देते वेळी वडिलांनी कोणती दक्षता बाळगावी?

१६ मंडळीत अडखळण्याची चिन्हे दाखविणाऱ्‍या सदस्यांना साहाय्य करण्यासाठी मंडळीच्या वडीलांनी खासपणे दक्ष असण्यास हवे. यशया ३५:३ याबद्दल उत्तम सूचना देऊन म्हणते: “गलित हस्त दृढ करा. लटपटणारे गुडघे बळकट करा.” पण तुम्हा वडीलांना तुमचा कार्यभाग कसा पूर्ण करता येईल? एक गोष्ट म्हणजे निरीक्षक असा. मंदपणाचे खरे कारण शोधून काढा. त्या व्यक्‍तिला सुयुक्‍त ठरणारा व्यावहारिक शास्त्र वचनीय प्रस्ताव मांडा. पण सावध असा. तुम्ही तुमच्या बंधूला प्रोत्साहन द्यावे निराशित करू नये.a याकरताच इतरांवर आपला विवेक लादू नका वा तुम्ही सुचविलेला उपाय अनुसरण्यास कोणाला भाग पाडू नका किंवा त्याने तुमचा व्यक्‍तिगत दृष्टीकोण अनुसरला नाही तर त्याला अप्रौढ ख्रिस्ती अशी खूणचिठ्ठी लावू नका. खरे म्हणजे वडीलांनी त्यांची सूचना व ते देत असलेले उत्तेजन पवित्र शास्त्रावर आधारलेले द्यावे. अनावश्‍यक अशी मंडळीची नियमावली त्यांजवर लादून त्यांची धाव मंदावण्याची त्यांनी इच्छा करू नये.—मतय ११:२८, २९चा फरक मत्तय २३:२–४ बरोबर पडताळून पहा.

१७. सह ख्रिश्‍चनांनी मंद व्हावे या सैतानाच्या कुयुक्‍तिचा प्रतिकार वडिल कसा करू शकतात?

१७ मंडळीच्या सदस्यांची त्वरेने प्रशंसा करण्यात वडीलांनी ख्रिस्ताचे अनुयायी या अर्थी चांगले उदाहरण राखावे. ते हवेहवेसे वाटतात व त्यांची गरज आहे असे त्यांना प्रांजळपणे वाटू द्यावे! सैतानाचे व्यवस्थीकरण ख्रिश्‍चनांच्या बाबतीत तिरस्करणीय वृत्ति अगदीच कटाक्षाने दाखवून आहे. जीवनाच्या शर्यतीच्या आत्ताच्या वेळी आमच्या बांधवांना कोणा टीकाकाराची नव्हे तर विजय प्राप्त करा असे प्रोत्साहन देणाऱ्‍या मित्रांची गरज आहे. उदाहरणार्थ, एका मध्यम वयील भगिनीस पायनियरींग थांबवावे लागले तेव्हा तिच्या अंतःकरणी या पूर्ण वेळेच्चा कार्यात परत येण्याची इच्छा प्रज्वलित राहिली होती. तरीपण तिला ते आर्थिक अडचणीमुळे जमूशकले नाही. एका वडीलांचा मनोदय तसा चांगला होता पण त्यांनी तिला साधारण टिकात्मकपणे विचारले: “तुम्ही पुनः पायनियरींग कधी सुरु करणार?” “जेव्हा माझ्या पतीला भाडे भरता येईल.” अशा या तिच्या मुद्देसूद उत्तराने वडील चकित झाले. येथे वडील जी जाणीव राखण्यात अपयशी ठरले व ज्याबाबतीत त्यांना नंतर शिकायला मिळाले ते हे होते की तिचा पायनियरींग खासपणे तिच्यापतीच्या आर्थिक प्राप्तीवर अवलंबून होती. पण जेव्हा त्याच्या मालकाने त्याला अधिकाधिक काम करायला लावले ज्यात ख्रिश्‍चनासाठी आक्षेपार्ह असणाऱ्‍या गोष्टीचा समावेश होता तेव्हा तिच्या पतीला दुसरा व्यवसाय धरावा ही विवेकपूर्ण जाणीव झाली. त्याला आपल्या वयात नोकऱ्‍या सहजपणे मिळू शकल्या नाहीत. याकरता त्याला कमी अर्थप्राप्तीची नोकरी पत्करावी लागली. या कारणामुळेच बायकोलाही पूर्ण वेळेच्या नोकरीचा शोध घ्यावा लागला.

१८. वडील ‘बळकटी देणारे उपकरण’ कसे ठेरू शकतात?

१८ वरील अनुभवाद्वारे आम्ही हा निष्कर्ष घ्यावा का की वडीलांनी सह ख्रिश्‍चनांना सूचना पुरविण्यात टाळाटाळ करावी? नाही. तर सूचना व उत्तेजन देताना वडीलांनी आपल्या बांधवांची खरी परिस्थिती लक्षात घ्यावी, नुसत्या वरवर दिणाऱ्‍या स्थितीचा विचार करू नये. (याकोब २:१५, १६) याद्वारे वडीलांना आपल्या मंडळीकरता ‘बळकटी देणारे उपकरण’ होता येईल.—कलस्सैकर ४:११.

१९. पायनियरांनी थकू नये म्हणून तुम्हाला कोणती मदत देता येईल?

१९ राज्य प्रचारकांच्या वाढत्या संख्येने आपली गति वाढवली आहे व ते आता नियमित पायनियर बनले आहेत. जमावा कडील प्रतिसाद मॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्‍यांना शक्‍ती देण्यात प्रोत्साहन पुरवितो. तर मग, तुमच्या मंडळीतील पायनियरांच्या बाबतीत तुम्ही कशाप्रकारे प्रोत्साहनाचा सूर काढता? डग व जोआन्‍ना यांनी आपल्या जीवनात पूर्ण वेळेचे ध्येय ठेवले आहे. जेव्हा त्यांना काहीजण विचारतात की, “तुम्हाला कधी मुले होणार?” किंवा “तुम्ही कधी संसारात रममाण होणार?” तेव्हा त्यांना ते निराशेचे वाटते. पण तेच जेव्हा त्यांचे सोबतीचे साक्षीदार त्यांना नैतिक बळ देऊन म्हणतात की, “हे चांगले काम सोडू नका, आमच्या मंडळीत तुम्ही पायनियर आहात याचा आम्हाला खूप आनंद होतो” तेव्हा काय घडते बरे? यामुळे आध्यात्मिक थकवा तर टळतोच पण ते पायनियर कार्यात गरुडाप्रमाणेची भरारी घेतात!—पडताळा यशया ४०:३१.

पायनियरांना आपली शक्‍ती कशी संपादता येईल?

२०, २१. पूर्ण वेळेच्या कार्यातील काहींनी आपली शक्‍ती कशी संपादिली?

२० फ्रेडरीक व मारीयन या विवाहीत जोडप्याचे ऐका ह्‍यांना शक्‍ती कशी संपादावी हे ठाऊक आहे. हे दोघेही मध्य अमेरिकन देशात मिशनरी आहेत. ते दोघेही ७०रीचे आहेत. त्यांनी १९४६ मध्ये तर तिने १९५० मध्ये मिशनरी कार्य आरंभिले. पण कशाने ते यहोवाच्या कार्यात पुढे जात आहेत! फ्रेडरीक म्हणतात: “यहोवावरील प्रेम व इतर लोकांना मदत देण्याच्या इच्छे सोबत आम्ही आपल्या मनात सार्वकालिक जीवनाचे ध्येय ठेवले आहे.” त्यांची बायको म्हणते की, ‘देवच आम्हाला पुढे नेण्याचे आभिवचन देऊन आहे’ त्यांना यात कंटाळा कसा वाटत नाही? “तुमची कोणतीही नेमणूक असली,” ते म्हणतात, “तरी त्यात स्वतःला मग्न ठेवा.” त्या म्हणतात की, “इश्‍वरशासित कार्यात सातत्य ठेवा.” पुढे त्या सांगतात, “तुम्ही वयाने मोठे होता त्यावेळी तुमची इच्छा असते तेवढे तुम्हाला करवत नाही. यामुळे मला चीडचीड वाटते पण ही गोष्ट मी प्रार्थनेत करतो व यहोवाला आमची मदत करायला विनंती करतो.”—१ पेत्र ४:७.

२१ लवोनिया ६७ वर्षांच्या आहेत व त्या २० वर्षांपासून नियमित पायनियर आहेत. गेल्या वर्षी सुमारे १५ दिवस त्या इस्पितळात होत्या व आता त्या हृदयावर इलाज करीत आहेत. त्यांच्या कित्येक कौटुंबिक सदस्यांचा, खासपणे पतीचा व वडीलांचा मृत्यु त्यांना भावनिक हादरा देणारा ठकरला. तरीपण त्या आपला आवेश टिकवून आहेत. त्यांनी आपली शक्‍ती कशी संपादिली? “क्षेत्रकार्यात अधिकपणे भाग घेणे हे खरेच साहाय्यक ठरते” असे त्या म्हणतात, “कारण जेव्हा मी लोकांसोबत यहोवाबद्दल बोलत राहत्ये तेव्हा माझे मन माझ्या समस्यांपासून दूर होते आणि मला मनाची शांती व आनंद मिळतो. यामुळेच जीवन जगण्याचा आनंद वाटतो.” त्यांचाहि पायनियरींग सोडून देण्याच्या विचार नाही. पण उलट त्या सांगतात: “दुसरे लोक यहोवा देव व त्याचे उद्देश याविषयीचे शिक्षण घेत आहेत हे पाहायला मिळणेच माझा आनंद इतका द्विगुणित करते की, पायनियर कार्य थांबवावे असा विचारच मुळी माझ्या मनी येत नाही.”—प्रे. कृत्ये २०:३५.

२२. सार्वकालिक जीवनाची शर्यत जिंकणे आहे तर आम्ही काय करण्याचे चालू ठेवावे?

२२ आम्हाला सध्या पायनियर या नात्याने जोराचा यत्न करता येत असला वा नसला तरी आम्ही सर्वजण प्रचंड शक्‍तीचा उगम यहोवा व त्याच्या संस्थेशी निकटपणे टिकून राहू शकतो. आमच्या देवाची निष्ठावंतपणे सेवा करण्याने आपण शक्‍ती संपादित करू या. तरच आम्हाला हबक्कुक प्रमाणे म्हणता येईल: “सेनाधीश प्रभु यहोवा माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरिणाच्या पायासारखे चपळ करील.” (हबक्कुक ३:१९) अशाप्रकारे आम्ही थकणार किंवा गळणार नाही. शर्यत ही जवळजवळ संपतच आली आहे हे ध्यानात घ्या. आम्ही आपल्या ध्येयासमीप आलो आहोत!

[तळटीपा]

a फिलिप्पैकर २:१ व इब्रीकर ६:१८ येथे उत्तेजन याकरता असणारा शब्द अशा ग्रीक क्रियापदाकडून आहे ज्याचा अर्थ “शब्दाकरवी सौम्य स्वरूपाचे वर्चस्वव्यक्‍त करणे” किंवा “कोणास सरळ, सदिच्छेने बोलणे” असा आहे.

उजळणीचे प्रश्‍न

◻ यहोवाच्या प्रचंड शक्‍तीमधून केवळ कोण मुक्‍तपणे घेऊ शकतो?

◻ आध्यात्मिक थकवा दिसून येण्याची काही लक्षणे कोणती?

◻ यहोवा कडिल कोणत्या तरतुदी आम्हाला शक्‍ती संपादित करण्यास मदत देऊ शकतात?

◻ मंडळीतील वडील इतर पायनियरांना त्यांच्या ‘शर्यती’त टिकून राहण्यासाठी कशी मदत देऊ शकतात?

[२४ पानावरील चौकट]

आध्यात्मिक थकव्यासोबत लढत देण्याचे काही मार्ग

थकव्याची लक्षणे

◻ खाणे, पिणे व मनोरंजन यातील असंयम

◻ सत्याविषयीचा निरुत्साह आणि तक्रारीचा आत्मा

◻ गंभीर व रेंगाळणारे संशय राखणे

◻ मंडळीच्या सभातील सहवासाकडे दुर्लक्ष

◻ क्षेत्रकार्यात आवेश व आनंदाची उणीव

◻ वडील व संस्था यांजविरूद्ध आवास्तव टीका करीत राहणे

सहनशीलतेची साधने

◻ पवित्र आत्म्याकरवी मदतीसाठी प्रार्थना—लूक ११:१३; गलतीकर ५:२२, २३; १ पेत्र ४:७.

◻ व्यक्‍तिगत अभ्यास—स्तोत्रसंहिता १:१, २.

◻ शास्त्रवचनीय गोष्टींवर मनन स्तोत्रसंहिता ७७:१२.

◻ सभा व संमेलने यांना नियमित उपस्थिति—नेहम्या ८:१–३, ८, १०; इब्रीयांस १०:२३–२५

◻ क्षेत्रकार्यात नियमित सहभाग—प्रे. कृत्ये २०:१८–२१

◻ मंडळींचे वडील फिरते देखरेखे यांजकडून आध्यात्मिक मदत—रोमकर १:११, १२; इब्रीयांस १३:१७

[२२ पानांवरील चित्रं]

विश्‍वाचा निर्माता यहोवा, आपल्या साक्षीदारांना शक्‍ती संपादीत करण्यास मदत करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा