तुम्ही कोणत्या प्रकारचा आत्मा प्रदर्शित करता?
१ पौलाने फिलिप्पैमधील मंडळीला लिहिलेल्या पत्राचा समारोप असे आर्जवून केला: “प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.” (फिलिप्पै. ४:२३) सुवार्तेचा प्रचार करण्यात खरी आस्था दाखवल्याबद्दल तसेच एकमेकांच्या हिताबद्दल उबदार व प्रेमळ काळजी राखल्याबद्दल त्याने त्यांची प्रशंसा केली.—फिलिप्पै. १:३-५; ४:१५, १६.
२ आपल्या मंडळीतही त्याचप्रकारचा आत्मा प्रदर्शित करावा ही आमची इच्छा असली पाहिजे. सर्वजण आवेश, दयाळुपणा आणि आदरातिथ्य दाखवतात तेव्हा, पाहणाऱ्यांच्या निदर्शनास येईल असा आत्मा निर्माण होतो. सकारात्मक आणि प्रेमळ आत्मा असल्यामुळे, एकता निर्माण होते त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रगती होते. (१ करिंथ. १:१०) नकारात्मक आत्म्यामुळे नाउमेदी आणि निरुत्साहीपणा उत्पन्न होतो.—प्रकटी. ३:१५, १६.
३ वडिलजन पुढाकार घेतात: वडिलांना आपसात आणि मंडळीत उत्तम व सकारात्मक आत्मा राखण्याची जबाबदारी आहे. का बरे? कारण त्यांची मनोवृत्ती आणि वर्तणूक मंडळीवर प्रभाव पाडू शकते. क्षेत्र सेवेत आवेशी असणारे, आपल्याला उबदार स्मित हास्याने आणि प्रेमळ शब्दाने अभिवादन करणारे आणि सकारात्मक व खाजगीरित्या किंवा व्यासपीठावरून उभारणीकारक सल्ला देणारे वडील आहेत याबद्दल आपण गुणग्राहकता बाळगतो?—इब्री. १३:७.
४ अर्थात, आपण सर्वांनी मंडळीला मैत्रीपूर्ण, आदरातिथ्य करणारे, आवेशी आणि आध्यात्मिक मनोवृत्तीचे होण्यासाठी हातभार लावावा. व्यक्तिगतरित्या आपण इतरांशी सहवास ठेवताना उबदारपणा आणि प्रेम दाखवू शकतो. (१ करिंथ. १६:१४) आपल्यामध्ये वय, जात, शिक्षण किंवा आर्थिक स्थितीबद्दल कोणतेही भेदभाव नसावेत. (पडताळा इफिसकर २:२१.) आपल्या आशेमुळे आपण हर्षाचा, उदार आदरातिथ्याचा आणि सेवेतील आवेशाचा आत्मा प्रदर्शित करू शकतो.—रोम. १२:१३; कलस्सै. ३:२२, २३.
५ आपल्यासोबत सहवास राखणाऱ्या सर्वांसहित नवोदितांना देखील, स्वागत केल्यासारखे वाटू द्यावे आणि बंधुत्वाचे प्रेम आणि भक्तीचा अनुभव घ्यावयास लावावे. आपल्या सेवाकार्याद्वारे आणि उत्तम ख्रिस्ती गुणांना प्रदर्शित केल्याने मंडळी ही “सत्याचा स्तंभ व पाया” असल्याचा पुरावा आपण देतो. (१ तीम. ३:१५) तसेच “देवाने दिलेली शांति” याद्वारे आपण आध्यात्मिक सुरक्षिततेचा अनुभव घेतो व ती आपली अंतःकरणे व विचार राखते. (फिलिप्पै. ४:६, ७) प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाच्या अपात्री कृपेचा अनुभव घेण्याची खात्री देणारा आत्मा प्रदर्शित करण्यास आपण सर्वजण परिश्रमाने झटू या.—२ तीम. ४:२२.