नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
भारतात या महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रमाचा विषय, ‘सर्व काही सुवार्तेकरिता करा,’ हा आहे. (१ करिंथ. ९:२३) राज्याची सुवार्ता, आज सर्वश्रुत असलेली सर्वात महत्त्वपूर्ण वार्ता आहे. या विस्मयकारक वार्तेचे वाहक या नात्याने लाभलेल्या या अद्वितीय विशेषाधिकाराची कदर बाळगण्यास हा कार्यक्रम आपल्याला मदत करील. तसेच, अखंडपणे सुवार्तेची घोषणा करत राहण्यासही तो आपल्याला अधिक धैर्यवान करील.—प्रे. कृत्ये ५:४२.
सेवेत जास्तीत जास्त साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या ईश्वरशासित प्रशिक्षणाचा सर्वतोपरी उपयोग कसा करता येईल हेही या कार्यक्रमात दाखविण्यात येईल. आपल्या सेवेचा विस्तार करण्याच्या हेतूने जीवनात फेरबद्दल केलेल्या काहींचे अनुभव आपण ऐकू; यात, सुवार्तेच्या विस्तारासाठी आपले सर्वस्व वाहिलेले युवकही सामील असतील.—पडताळा फिलिप्पैकर २:२२.
पाहुण्या वक्त्याद्वारे देण्यात येणारे मुख्य भाषण, ‘सुवार्ता सोपवण्यास पसंत केलेले,’ असा आपला लौकिक टिकवून ठेवण्याच्या गरजेवर भर देईल. (१ थेस्स. २:४) आपल्याला हे पाहण्यासही मदत केली जाईल, की इतरांना ही सुवार्ता सांगण्याचा आपला विशेषाधिकार आपल्याला जतन करायचा असल्यास आपले आचारविचार नेहमी देवाच्या अपेक्षा व दर्जांच्या अनुरूप असले पाहिजेत. असे केल्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादांवरही प्रकाश टाकला जाईल.
हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम चुकवू नका. खास संमेलन दिवशी बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या नवीन समर्पितांनी याविषयी अध्यक्षीय पर्यवेक्षकांना त्वरित कळवावे. तुम्ही ज्यांच्यासोबत अभ्यास करता त्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण द्या. सर्व काही सुवार्तेकरिता करून हे सर्वात महान कार्य हर्मगिदोनापूर्वी पूर्णत्वास आणावे म्हणून आपण यहोवाला आपणास बलवंत करू देऊ या.