यशया
५७ नीतिमान माणूस नाहीसा झाला आहे,
पण कोणालाही याची पर्वा नाही.
एकनिष्ठ माणसांना नेण्यात आलं आहे.*+
पण नीतिमान माणसाला संकटामुळे* नेण्यात आलं आहे, हे मात्र कोणालाही कळत नाही.
२ त्याला शांती लाभते.
सरळ मार्गाने चालणारे सर्व जण आपल्या पलंगावर* विसावा घेतात.
३ “जादूटोणा करणाऱ्या स्त्रीच्या मुलांनो, इकडे या.
हे व्यभिचार करणाऱ्या पुरुषाच्या मुलांनो;
हे वेश्येच्या मुलांनो, इकडे या.
४ तुम्ही कोणाची थट्टा करताय?
तुम्ही कोणाविरुद्ध तोंड उघडताय? कोणाला जीभ काढून दाखवताय?
तुम्ही पाप करणाऱ्यांची आणि फसवणूक करणाऱ्यांचीच मुलं आहात ना?+
५ मोठमोठ्या झाडांखाली+ आणि प्रत्येक
हिरव्यागार वृक्षाखाली कामवासनेने उत्तेजित होणारे तुम्हीच ना?+
खोऱ्यांमध्ये* आणि खडकांच्या कपारींमध्ये
आपल्या मुलांची कत्तल करणारे ते तुम्हीच ना?+
६ खोऱ्यातले गुळगुळीत दगड हाच तुझा* वाटा आहे.+
हो, हाच तुझा हिस्सा आहे.
त्यांच्यासाठी तू अर्पणं आणि पेयार्पणं देतेस.+
या असल्या गोष्टींनी मला आनंद होईल का?*
७ तू एका मोठ्या आणि उंच डोंगरावर आपला पलंग सजवलास.+
तिथे तू बलिदान अर्पण करायला गेलीस.+
८ तू दरवाजाच्या आड, चौकटीच्या मागे आपलं स्मारक-चिन्ह स्थापन केलंस.
तू मला सोडून दिलंस, आपले कपडे काढलेस;
तू वर गेलीस आणि आपला बिछाना आणखी पसरवलास.
तू तुझ्या प्रियकरांसोबत करार केलास.
तुला त्यांच्यासोबत झोपायला आवडायचं+
आणि तू पुरुष-लिंगं पाहिलीस.*
९ तू तेल आणि भरपूर अत्तर घेऊन मेलेखकडे* गेलीस.
आपल्या दूतांना दूर-दूर पाठवून तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस, की तू पार कबर* गाठलीस.
१० तू प्रवास करून-करून थकलीस,
पण तरी तू असं म्हणाली नाहीस, की ‘हे सगळं व्यर्थ आहे!’
तुझ्यात नवा जोम आला,
आणि म्हणून तू तुझे प्रयत्न सोडले नाहीस.*
११ तू कोणाच्या भीतीने आणि कोणाला घाबरून खोटं बोलायला लागलीस?+
तू मला विसरून गेलीस.+
तू कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाहीस.+
१२ मी तुझ्या ‘नीतिमत्त्वाचं’+ आणि तुझ्या सगळ्या कामांचं भांडं फोडीन,+
त्यांचा तुला काहीच फायदा होणार नाही.+
१३ तू जेव्हा मदतीसाठी धावा करशील,
तेव्हा तू गोळा केलेल्या मूर्ती तुला वाचवू शकणार नाहीत.+
त्या सगळ्या वाऱ्याने उडून जातील;
फक्त एका फुंकरेने त्या उडून जातील.
पण जो माझा आश्रय घेतो, त्याला देशात वारसा मिळेल,
आणि माझ्या पवित्र पर्वताचा त्याला ताबा मिळेल.+
१४ असं म्हटलं जाईल, ‘एक रस्ता बांधा! मार्ग तयार करा!+
माझ्या लोकांच्या मार्गातला प्रत्येक अडथळा दूर करा.’”
१५ कारण जो सर्वोच्च आणि महान देव आहे,
जो सदासर्वकाळ जिवंत राहतो+ आणि ज्याचं नाव पवित्र आहे,+ तो असं म्हणतो:
“मी एका उंच आणि पवित्र ठिकाणी राहत असलो,+
तरी मी दुःखी आणि खचून गेलेल्यांसोबतही असतो;
खचून गेलेल्यांना नवी उमेद देण्यासाठी,
आणि दुःखी असलेल्यांना नवजीवन देण्यासाठी,
मी त्यांच्यासोबत असतो.+
१६ मी कायम त्यांचा विरोध करत राहणार नाही,
किंवा कायम त्यांच्याबद्दल मनात राग बाळगणार नाही;+
कारण मी जर तसं केलं, तर प्रत्येक माणूस आणि मी घडवलेला प्रत्येक प्राणी कमजोर होईल.+
१७ त्याच्या* पापामुळे, बेइमानीच्या त्याच्या कमाईमुळे माझा राग त्याच्यावर भडकला होता,+
म्हणून मी त्याला शिक्षा केली, त्याच्यापासून आपलं तोंड फिरवलं आणि त्याच्यावर संतापलो.
पण तो मात्र बंडखोरपणेच वागत राहिला,+ मनाला वाटेल तसं करत राहिला.
मी त्याचं आणि शोक करणाऱ्या त्याच्या लोकांचं+ सांत्वन करीन.”+
१९ यहोवा म्हणतो: “मी ओठांचं फळ निर्माण करतोय.
जो दूर आहे आणि जो जवळ आहे अशा दोघांनाही मी कायम टिकणारी शांती देईन.+ आणि मी त्याला बरं करीन.”
२० “पण दुष्ट लोक अशा खवळलेल्या समुद्रासारखे आहेत जो शांत होत नाही,
आणि ज्याच्या उसळणाऱ्या लाटा समुद्री शेवाळ आणि गाळ बाहेर फेकत राहतात.