-
नहेम्या ९:१९, २०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ पण तरीसुद्धा, तू त्यांना ओसाड रानात सोडून दिलं नाहीस कारण तू खूप दयाळू आहेस.+ तू दिवसा ढगाच्या खांबाने त्यांना मार्ग दाखवत राहिलास आणि रात्री आगीच्या खांबाने प्रकाश देऊन, तू त्यांना वाट दाखवायचं सोडलं नाहीस.+ २० त्यांनी समजदार व्हावं म्हणून तू त्यांना आपली पवित्र शक्ती* दिलीस.+ तू त्यांना मान्ना खायला द्यायचं सोडलं नाहीस+ आणि त्यांना तहान लागली, तेव्हा तू त्यांना पाणी दिलंस.+
-