१६ तेव्हा देवासमोर आपल्या राजासनांवर बसलेल्या २४ वडिलांनी+ देवाला नमन करून त्याची उपासना केली. १७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस+ आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहेस आणि राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहेस.+
६ आणि एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा, तसंच पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा,*+ कारण आपल्या सर्वसमर्थ देवाने, यहोवाने,*+ राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहे!+