२४ ‘हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू तुझ्या या सेवकाला तुझा महिमा आणि तुझी ताकद दाखवायला सुरुवात केली आहेस.+ आकाशात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखी महान कार्यं करणारा दुसरा कोण देव आहे?+
११ हे यहोवा! महानता,+ सामर्थ्य,+ वैभव, ऐश्वर्य आणि सन्मान* हे सर्व तुझं आहे.+ कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेलं सगळं काही तुझंच आहे.+ हे यहोवा! राज्यही तुझंच आहे+ आणि तूच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस.