८ आता यहुद्यांसाठी तुम्हाला जे योग्य वाटतं ते राजाच्या नावाने लिहा आणि त्यावर राजमुद्रेच्या अंगठीची मोहर लावा. कारण राजाच्या नावाने लिहिलेलं आणि त्याच्या मुद्रेच्या अंगठीची मोहर असलेलं फर्मान रद्द करता येत नाही.”+
८ म्हणून महाराज, आता हे फर्मान काढा आणि त्यावर सही करा;+ म्हणजे मेद आणि पर्शिया यांच्या कधीही न बदलणाऱ्या कायद्यानुसार, त्यात कोणालाही बदल करता येणार नाही.”+