८ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल,+ आणि ठिकठिकाणी भूकंप होतील; तसंच, दुष्काळही पडतील.+ या सगळ्या गोष्टी संकटांची* फक्त सुरुवात असेल.+
१० मग तो त्यांना म्हणाला: “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र+ आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.+११ मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील.+ तसंच, भयानक दृश्यं आणि आकाशात मोठी चिन्हं दिसतील.