२५ माझ्या लोकांपैकी तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणत्याही गरीब* माणसाला तुम्ही पैसे उसने दिले, तर त्याच्यासोबत सावकारासारखं* वागू नका. त्याच्याकडून व्याज घेऊ नका.+
२० तुम्ही विदेश्याकडून व्याज घेऊ शकता,+ पण आपल्या भावाकडून व्याज घेऊ नका;+ म्हणजे तुम्ही ज्या देशाचा ताबा घेणार आहात, त्यात तुमचा देव यहोवा तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला आशीर्वाद देईल.+