-
मत्तय १४:२४-३३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ इकडे शिष्यांची नाव किनाऱ्यापासून काही किलोमीटर* दूर गेली होती. ती लाटांमुळे हेलकावे खात होती, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. २५ मग रात्रीच्या चौथ्या प्रहरी,* येशू समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला. २६ शिष्यांनी त्याला समुद्रावर चालताना पाहिलं तेव्हा त्यांना भीती वाटली आणि ते म्हणाले: “आपल्याला काहीतरी भास होतोय!” तेव्हा ते घाबरून ओरडू लागले. २७ पण येशू लगेच त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला: “तुम्ही का घाबरता? भिऊ नका, मी आहे.”+ २८ पेत्रने त्याला उत्तर दिलं: “प्रभू तू असशील तर मला पाण्यावरून तुझ्याजवळ येण्याची आज्ञा दे.” २९ तो म्हणाला: “ये!” तेव्हा पेत्र नावेतून उतरला आणि पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. ३० पण वादळाकडे पाहून तो घाबरला आणि बुडू लागला. तो ओरडून म्हणाला: “प्रभू, मला वाचव!” ३१ येशूने लगेच आपला हात पुढे करून त्याला धरलं आणि तो म्हणाला: “अरे अल्पविश्वासी माणसा,* तू शंका का घेतलीस?”+ ३२ ते नावेत चढल्यावर वादळ शांत झालं. ३३ तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले: “तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस!”
-