वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ३:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ ख्रिस्ताच्या रक्‍तावर विश्‍वास ठेवण्याद्वारे+ प्रायश्‍चित्त* होण्यासाठी देवाने त्याला बलिदान म्हणून अर्पण केलं.+ पूर्वीच्या काळात घडलेल्या पापांची धीराने क्षमा करताना देव नीतिमान होता, हे दाखवण्यासाठी त्याने असं केलं.

  • इफिसकर १:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ त्याच्याच महान अशा अपार कृपेमुळे, आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या रक्‍ताद्वारे खंडणी देऊन मुक्‍त करण्यात आलं आहे.+ म्हणजेच, आपल्या पापांची क्षमा झाली आहे.+

  • इब्री लोकांना ९:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या पवित्र शक्‍तीद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं रक्‍त आपल्याला किती जास्त शुद्ध करू शकतं!+ आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी,+ म्हणून त्याचं रक्‍त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून शुद्ध करतं.+

  • इब्री लोकांना १०:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ आपण सगळे जण प्रामाणिक मनाने आणि पूर्ण विश्‍वासाने देवाजवळ जाऊ या. कारण, आपली मनं रक्‍त शिंपडून दुष्ट विवेकापासून शुद्ध करण्यात आली आहेत+ आणि आपली शरीरं शुद्ध पाण्याने धुण्यात आली आहेत.+

  • प्रकटीकरण १:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ तसंच, जो “विश्‍वासू साक्षीदार,”+ “मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला,”+ आणि “पृथ्वीवरच्या राजांचा शासक” आहे, त्या येशू ख्रिस्ताकडून+ तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.

      ज्याचं आपल्यावर प्रेम आहे+ आणि ज्याने स्वतःच्या रक्‍ताद्वारे आपल्याला पापांपासून मुक्‍त केलं,+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा