स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. यदूथून* याच्या चालीवर गायलं जावं.
६२ मी* शांतपणे देवाची वाट पाहीन.
तो माझं तारण करेल.+
३ एखाद्या माणसाचा जीव घेण्यासाठी तुम्ही कधीपर्यंत त्याच्यावर हल्ला करत राहाल?+
तुम्ही सर्व जण झुकलेल्या भिंतीसारखे; पडायला आलेल्या भिंतीसारखे धोकादायक आहात.*
४ कारण हे लोक त्याला त्याच्या उच्च स्थानावरून खाली पाडण्यासाठी एकत्र मिळून कट रचतात.
त्यांना खोटं बोलायला आवडतं.
तोंडाने तर ते आशीर्वाद देतात, पण मनातल्या मनात ते शाप देत असतात.+ (सेला )
५ मी शांतपणे देवाची वाट पाहीन.*+
कारण माझी आशा त्याच्यावर आहे.+
६ तो माझा खडक, माझं तारण आणि माझा सुरक्षित आश्रय आहे;
मी कधीच डळमळणार नाही.+
७ माझं तारण आणि माझा गौरव देवावर अवलंबून आहे.
तोच माझा मजबूत खडक, माझा आश्रय आहे.+
८ अहो लोकांनो, तुम्ही नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवा.
त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा.+
देवच आपला आश्रय आहे.+ (सेला )
९ मानव म्हणजे फक्त एक श्वास!
मानव म्हणजे नुसताच एक भ्रम!+
तराजूमध्ये ठेवलं, तर ते सर्व वाफेपेक्षाही हलके भरतील.+
१० लुबाडणूक करून आपण यशस्वी होऊ, असा विचार करू नका;
चोरीने मिळवलेल्या संपत्तीवर खोटी आशा लावू नका.
तुमचं वैभव वाढलं, तरी त्यावर भरवसा ठेवू नका.+
११ मी दोनदा देवाला असं म्हणताना ऐकलं:
सामर्थ्य देवाचं आहे.+