ईश्वरशासित वृत
◆ ऑस्ट्रेलियास हा अहवाल देण्यास आनंद वाटतो की, ऑक्टोबरमध्ये त्यांनी ५१,१५२ प्रचारकांचा एक नवा उच्चांक गाठला, जी गतवर्षीय याच महिन्यापेक्षा ५.३ टक्के वाढ आहे. ५,४२२ वर्गण्या मिळविण्यात आल्या जी, एकूण संख्या गेल्या ऑक्टोबरमधील २,९८१ पेक्षा कितीतरी अधिक आहे.
◆ हाँगकाँग आक्टोबरकरिता २,०३२ प्रचारकांच्या उच्चांकाचा अहवाल देते. ज्या ४,५११ वर्गण्या मिळविल्या त्या आतापर्यंतच्या सर्व वर्गणी मोहिमेतील सर्वोत्तम आकड्याच्या ठरतात. एका महिन्यात याच्या दुप्पटही मिळविलेल्या आहेत.
◆ जमेकामध्ये ऑक्टोबर महिन्यात ८,७०१ प्रचारकांचा उच्चांक होता.
◆ ऑक्टोबरमध्ये, नायजेरियामध्ये १,३९,१५० प्रचारकांनी अहवाल दिला. नव्या सेवा वर्षातील हा त्यांचा दुसरा उच्चांक होता. याशिवाय ९,२४४ नियमित पायनियर्स व १,८३,७०१ घरगुती शास्त्राभ्यास हेही त्यांचे नवे उच्चांक आहेत.
◆ सालोमन बेटावरील प्रांतिय अधिवेशनांना २,३३९ उपस्थिती होती तर ३७ जणांनी बाप्तिस्मा घेतला. प्रचारकातील उच्चांक ७७७ होता.
◆ ताईवानने सेवा वर्षांत ऑक्टोबरमध्ये १,५९४ प्रचारकांचा अहवाल देऊन ७ टक्के वाढ दिली. यात नियमित व साहाय्यक पायनियरातील उच्चांक आहे. तास, परत भेटी, वर्गण्या आणि मासिक खपातही उच्चांक होते. मंडळ प्रचारकांनी १२.२ तासांची सरासरी राखली. हाही नवा उच्चांक होता.