ईश्वरशासित वृत्त
बोलिव्हिया: शाखेने, ऑक्टोबरसाठी ९,५८८ प्रचारकांच्या नव्या उच्चांकाचा अहवाल दिला. त्यांनी गृह पवित्र शास्त्र अभ्यास, पुनर्भेटी, मंडळीचे प्रचारक आणि नियमित पायनियरांमध्ये देखील नवे उच्चांक गाठले आहेत. मंडळीच्या प्रचारकांनी सरासरी १४ तास क्षेत्र कार्यात खर्च केले.
एस्टोनिया: सप्टेंबरच्या सेवेसाठी १,७५३ प्रचारकांनी अहवाल दिला. ही मागील वर्षाच्या मासिक सरासरीपेक्षा २४-टक्क्यांची वाढ होती.
भारत: डिसेंबर १९९३ च्या शेवटाला, त्या देशातील सर्वात मोठे प्रांतीय अधिवेशन, कोट्टायम येथे भरविण्यात आले होते व त्याच्या उपस्थितीचा उच्चांक ६,९६७ होता आणि ३१४ जणांनी बाप्तिस्मा घेतला. हा आकडा, आधीच्या एकाच प्रसंगी घेतलेल्या बाप्तिस्म्याच्या आकड्यापेक्षा ६६ टक्क्यांनी मोठा होता.
एकूण २१,३२० जण, १९९३ च्या १६ “ईश्वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनांसाठी उपस्थित होते, आणि त्यामध्ये ८२५ व्यक्तींचा बाप्तिस्मा झाला. उपस्थिती हे दाखवते की, भारतातील १९९२ च्या “ज्योती वाहक” प्रांतीय अधिवेशनांमध्ये उपस्थित राहिलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा ही तीन टक्क्यांची वाढ आहे, परंतु बाप्तिस्म्याचा आकडा, मागील वर्षी बाप्तिस्मा घेतलेल्या एकूण संख्येपेक्षा १५ टक्क्यांची फारच उत्तेजनदायक वाढ दाखवतो.
लिथुआनिया: ऑक्टोबरचा अहवाल ८७१ प्रचारकांचा नवीन उच्चांक दाखवतो व ऑक्टोबर १९९२ पेक्षा ती ३९-टक्क्यांची वाढ आहे.
तुर्कस्तान: “ईश्वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनासाठी १,५१० जण उपस्थित राहिले, आणि ४४ जणांनी त्यांच्या समर्पणाला चिन्हांकित केले. स्थानिक दूरदर्शनवर अधिवेशनाचा एक उत्तम अहवाल प्रस्तुत केला गेला.