प्रश्न पेटी
● आमच्या प्रकाशनांचा वापर चांगल्या फायद्यास्तव केला जावा अशी आमची इच्छा असल्यामुळे रस्त्यावरील साक्षीकार्य करतेवेळी कोणती पद्धत अत्यंत उपयुक्त ठरु शकेल?
रस्त्यावरील साक्षीकार्य करतेवेळी आपण आपल्या हातात मासिके किंवा प्रकाशन घेऊन लोकांकडे जाणे उचित आहे. लोकांशी थोडे संभाषण करावे असे आमचे ध्येय असू द्यावे. यामुळे आम्हाला भेटलेली व्यक्ती ही आस्थेवाईक आहे का तसेच तो आम्ही दिलेली मासिके वाचील का हे ठरविता येऊ शकते. मासिकातील एखाद्या लेखाची चर्चा करता आली तर फारच बरे. आम्हाला आमच्या कार्याची रुपरेखा दाखवून सांगता येईल की, हे स्वयंसेवकाद्वारे केले जाणारे असून ते व्यापारी किंवा व्यावसायिक नाही. काही वेळेस मासिकातील अनुक्रमणिका व मासिकाकडून मिळणारे लाभ याविषयीची माहिती देत असताना प्रचारकाला त्या व्यक्तीसोबत थोडे लांब चालत जावे लागेल.
तथापि, आपण निरिक्षण करणारे व विचारशील असण्यास हवे. आपण ज्यांना रस्त्यावर भेटतो ते कधीकधी घाईत असतात की त्यांच्यामध्ये आस्था आहे की नाही हे समजत नाही. अशावेळी त्यांना एखादी हस्तपत्रिका, ते आम्हाला पुन्हा भेटेपर्यंत आमच्या प्रकाशनांविषयी अधिक आस्था जागृत करण्यासाठी देणे हे उचित ठरेल. ते पुन्हा भेटल्यावर कदाचित आपल्याशी बोलण्यासाठी थांबू शकतील.
रस्त्यावरील साक्षीकार्य विशिष्ट ठिकाणी व विशिष्ट वेळेला केल्यामुळे लोकांना आमचा परिचय होतो, त्यामुळे त्यांना संधि मिळेल तेव्हा आपल्याशी चर्चा करण्यासाठी ते सामोरे येऊ शकतील व याद्वारे आम्हाला त्यांची आस्था कळू शकेल.
आम्ही आमच्या प्रकाशनांचा सूज्ञपणे वापर केला पाहिजे. यासाठी आमची प्रकाशने सादर करण्यासाठी आपण योग्य वेळ निवडली पाहिजे. असे केल्यामुळे भेटणाऱ्या आस्थेवाईक लोकांचा मागोवा राखता येईल व आमच्या कामाचे स्वरुप त्यांना स्पष्ट करता येईल.