आपल्या प्रकाशनांना तुम्ही मौल्यवान समजता का?
१ हिरे व रत्न त्यांच्या सुंदरतेमुळेच नव्हे तर ते शोधण्यास व खणूण प्राप्त करण्यास अधिक परिश्रम करावे लागत असल्यामुळे मौल्यवान आहेत. यहोवा देव व येशूचे ज्ञान तर ह्याही पेक्षा श्रेष्ठ मोलाचे आहे, व ह्या आध्यात्मिक धनाची खोली व ईश्वरी ज्ञान यांची समज, जगात फक्त आपलीच प्रकाशने देतात. (रोम. ११:३३; फिलि. ३:८) तर मग आपल्या प्रकाशनांबद्दल आम्ही गुणग्राहकता कशी दाखवू शकतो?
२ अनेकजण व कुटुंबातील सदस्य नियमितपणे राज्य सभागृहातील दान पेटीत दान टाकण्यासाठी बाजूला काढून ठेवतात. जे साहित्य आम्ही लोकांना देतो व त्यांची किंमत घेतो, ती प्रकाशने छापण्यासाठी जो खर्च झाला आहे तो खर्च ही सर्व किंमत मिळून भरून काढत नाही. मग जेव्हा काही व्यक्ति किंवा मंडळी राज्य कार्यासाठी संस्थेला देणग्या पाठवतात तेव्हा अधिक साहित्य छापण्यास त्याची मदत होते.
३ आपल्या मौल्यवान प्रकाशनांना गुणग्राहकता दाखवण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे ते मिळाल्याबरोबर वाचणे व त्यांचा अभ्यास करणे. आपल्या पुस्तकांमध्ये व मासिकांमध्ये जीवन देणारे आध्यात्मिक अन्न आहे म्हणून भविष्यात कधीही ते वाचू असा विचार न करता त्याचे होईल तितक्या लवकर सेवन केले पाहिजे. मंडळीतील टेहळणीबुरूज मासिकाच्या अभ्यासाची वेळ येईपर्यंत थांबण्यापेक्षा लवकरात लवकर ते वाचण्याचा प्रयत्न केला जावा. प्रकाशनांसोबत पूर्णपणे परिचित झाल्यावर, आम्ही ते घरमालकाला व्यवस्थिपणे सादर करू शकू. विश्वासू व बुध्दिमान दासाकरवी यहोवाने पुरविलेल्या मासिकांना गुणग्राहकता दाखवण्याचा तिसरा मार्ग आहे, आपल्या घरात त्यांचा योग्य रितीने सांभाळ करणे व क्षेत्रकार्यात जाताना सुव्यवस्थितपणे नेणे. (मत्तय २४:४५) आम्ही आपली प्रकाशने नीटनेटक्याने कपाटात किंवा कोरड्या ठिकाणी ती ठेवतो का? क्षेत्रकार्याला जाण्यापूर्वी आपण आपली मासिके बॅगेत घालताना किंवा बाहेर काढताना, ती फाटू नयेत वा धुळीने माखली जाऊ नयेत याची खबरदारी घेतो का? असे केल्याने आम्ही नेहमी आपली प्रकाशने स्वच्छ व व्यवस्थित ठेऊ शकू आणि आपण यहोवाचे सेवक आहोत हे ह्यावरुन दाखवून देऊ.
४ राज्य सभागृहातील किंवा घरातील कपाटावर प्रकाशने ठेवल्यामुळे त्याचा उद्देश पूर्ण होणार नाही, व त्यांची किंमत जाणली जाणार नाही. मासिकांचे जुने अंक, माहितीपत्रके, पुस्तके, व हस्तपत्रिका यांना चांगल्या कामी वापरले पाहिजे. आपल्याकडे सध्या कोणकोणती प्रकाशने आहेत त्यांची यादी आपण कधी पाहिली होती? ऐवढी प्रकाशने जमलेली पाहून तुम्ही कदाचित चकित व्हाल. ह्या प्रकाशनांची पिवळट रंगाचे, फाटलेले व माखलेले अशी अवस्था झाली नाही ना—का अजूनही ते चांगल्या दशेत आहेत? जर असे आहे तर, त्यांचे वितरण क्षेत्रकार्यात करण्यासाठी आम्ही कसून प्रयत्न करु. खराब झालेली प्रकाशने आपली वैयक्तिक प्रत म्हणून आपण ठेवू शकू किंवा योग्य असल्यास त्यांचा नाश करू शकता. चालु असलेल्या सादरतेचे वितरण करण्यामध्ये आमचे लक्ष असले तरी आम्ही कधी कधी इतर प्रकाशने सुध्दा सादर करू शकतो.
५ वितरणांसाठी तुम्हाला किती प्रकाशने लागतात याकडे नेहमी लक्ष द्या. योग्य निर्णय आवश्यक आहे. जर प्रकाशनांचा साठा पुरेसा असेल, खास करून जर तुम्ही पायनियरींग करत असाल तर, त्यांचा प्रमाणापेक्षा अधिक व्यक्तिगत साठा ठेवण्याची काहीही गरज नाही, कारण सभागृहात सभा चालू होण्याआधी वा झाल्यावर तुम्हाला हवी तेवढी प्रकाशने मिळू शकतील. महिना चालू होण्याआधीच आवश्यक प्रकाशनांचा साठा ठेवा व जसा-जसा तो संपत जाईल, तसतसे आणखीन घ्या.
६ देवाच्या वचनाच्या सत्याबद्दल कृतज्ञता असलेल्या व्यर्क्तिना आपली प्रकाशने अधिक मूल्याची आहेत. ह्यासाठी, जे आम्हासाठी पुरविलेले आहे त्याचा उपयोग समज व बुध्दिने आम्ही करु या व ह्याद्वारे आपल्या प्रकाशनांना उच्च कृतज्ञता दाखवू या.