परत भेट घेताना संभाषण सुरु करणे
१ आरंभीच्या भेटीत ज्यांनी आस्था दाखवली आहे अशा कोणाशी संभाषण सुरु करण्यामध्ये प्रभावशाली असण्यासाठी, त्या आधीच्या प्रसंगी ज्या गोष्टीवर चर्चा झाली त्यावर उभारणी करण्यासाठी प्रयत्न करा. यामागील हेतू हा आहे की, मागे घरमालकाला जे प्रकाशन दिले व जे विचार सांगण्यात आले त्याचे मोल जाणण्याची रसिकता वाढविण्यात मदत देणे.
२ पुनर्भेटीची तयारी करण्यासाठी वेळ द्या. ज्या प्रकाशनाची तुम्ही हाताळणी करीत आहात त्यातील आस्था जागृत करणाऱ्या विवेचनांची निवड करा. किती साहित्य हाताळावे व अभ्यास किती वेळ घ्यावा यामध्ये चाणाक्षता वापरा. जोपर्यंत अपूर्व अशी आस्था दिसत नाही, तोपर्यंत एक किंवा दोन मुद्यांवरील त्रोटक चर्चा पुरेशी ठरेल. पुढील विषयांचा विचार करा:
३ पृथ्वी मानवाचे चिरकालिक घर असावे म्हणून कोणत्या भावी परिस्थिती या पृथ्वीवर असण्याची आम्हाला अपेक्षा धरता येईल? ही चर्चा सद्य जीवन पुस्तकाच्या १३९-४० पृष्ठांवर असणाऱ्या यशया ११:६-९ तसेच प्रकटीकरण २१:२-४ वचनांवर आधारलेली आहे.
या संभाषणाची सुरवात अशा प्रकाराने करता येईल:
▪ आपण मागील वेळी भेटलो होतो तेव्हा ही पृथ्वी चिरकाल राहावी म्हणून देवाने काय उद्देशिले आहे याबद्दल चर्चा केली होती. पण मी तुम्हाला विचार करण्यासाठी एक प्रश्न दिला होता: त्यावेळी कोणती परिस्थिती असली पाहिजे? आता परत येऊन, याबद्दल पवित्र शास्त्राचे काय उत्तर आहे, त्याची माहिती देण्यास मला आनंद वाटतो.”
४ देवाच्या राज्याखाली जीवन व्यतित करण्यासाठी आपण काय केले पाहिजे. हा विषय योहान १७:३ व १ तीमथ्य २:४ या वचनांचा वापर करून खुलविता येतो, याची स्पष्टता सत्य पुस्तकाच्या १० व्या पानावर दिली आहे. (सद्य जीवन, पृ. १८३)
आरंभाला तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “देवाने दुष्टतेचा अंत करण्याबद्दल जे अभिवचन दिले आहे त्याबद्दलची चर्चा करण्यात मला खराच आनंद वाटला होता. [घरमालकाला त्याची सत्य पुस्तकाची प्रत आणण्यास सांगा.] आता आम्हा प्रत्येकाला जो प्रश्न महत्त्वाचा वाटावयास हवा तो हा की, या बदलापासून आपला फायदा करून घेण्यासाठी आपल्याला काय करता येईल? येशूने येथे योहान १७:३ मध्ये जे म्हटले आहे व त्याचे विवेचन या पुस्तकाच्या १०व्या पृष्ठावर कसे केले आहे त्याकडे लक्ष द्या.”
५ नंदनवनमय पृथ्वीवर कोणकोणत्या गरजा पूर्ण केल्या जातील? तुम्हाला स्तोत्रसंहिता ७२:१६ व १४५:१६ किंवा प्रकटीकरण २१:४ व २२:२, ३ यांचा उपयोग करता येईल. याबद्दल सुवार्ता पुस्तकात ८ व ९ पृष्ठांवर योग्य विवेचन देण्यात आले आहे.
तुमचे सुरवातीचे बोल असे असू शकतील:
▪ “मी मागे जेव्हा येथे आलो होतो [दिवस सांगा], तेव्हा आपण देवाच्या अभिवचनाबद्दल पाहिले होते. त्याचा पुत्र पृथ्वीवरील नंदनवनमय परिस्थितीत मृत प्रियजनांचे पुनरुत्थान करणार आहे हे आपण बघितले होते. तेव्हा, आम्हाला कोणकोणत्या आशीर्वादांचा लाभ घेता येईल? ते कोणते आशीर्वाद असतील त्यापैकीची काहींची माहिती शास्त्रवचनीयरित्या तुमच्या पुस्तकात दिली आहे.” वर दिलेल्या संदर्भास अनुलक्षून शास्त्रवचनातून एक किंवा दोन वचने काढून वाचा आणि सुवार्ता पुस्तकातील पृष्ठे ८ व ९ वरील ठळक शीर्षके दाखवा व कदाचित ७ व्या परिच्छेदाचे वाचनही करा.
६ आम्ही प्रचार करीत असलेल्या राज्याच्या संदेशाबद्दल बहुतेकांनी आस्था दाखवली आहे. कित्येक घरी आम्ही आमची विविध प्रकाशने दिली आहेत. इतरांच्या बाबतीत आपण आमच्या आधीच्या शास्त्रवचनीय चर्चेबद्दल झालेल्या संभाषणाबद्दल रसिकता हेरली आहे. यासाठी आस्था दाखविलेल्या सर्वांची पुनर्भेट घ्या व त्यांना सत्य शिकवण्याचा प्रयत्न करा.—मत्तय १०:११; २८:१९, २०; योहान २१:१७; प्रक. २२:१७.