सुवार्ता सादरता
नित्याने उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रावर मासिकाद्वारे
१ पेत्र व योहान यांनी शोमरोनात उत्तम साक्ष दिल्याचे आपल्याला प्रे. कृत्ये ८:२५ मध्ये वाचावयास मिळते. त्यांनी यानंतर “पुष्कळशा गावातून सुवार्ता सांगितली.” आज आम्ही देखील, आमच्या मंडळीला नेमून दिलेल्या क्षेत्राचा उरक परिश्रमाने करावयास हवा की ज्याद्वारे उत्तम साक्ष दिली जाईल.
२ मंडळ्यातील प्रचारकांची आता झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पुष्कळ मंडळ्यांना आपले क्षेत्र वारंवार उरकावे लागते आहे असे दिसते. आमचे क्षेत्र वारंवार उरकावे लागत असल्यामुळे आरंभाला आमची प्रतिक्रिया नकारार्थी जरी झाली तरी ती तशी असावयास नको. द वॉचटावर तसेच अवेक! मासिकाच्या प्रत्येक अंकामध्ये नवे व मनोरंजक साहित्य प्रसिद्ध होत असल्यामुळे आमच्या क्षेत्रातील लोकांना देण्याजोगे काही ना काही तरी असतेच. तसेच आपण क्षेत्र वारंवार उरकत असल्यामुळे आपल्याला प्रत्येक घरी अधिक वेळ देण्याची संधि मिळते.
लोकांशी बोला
३ आमचे सर्व क्षेत्र उरकण्यासाठी तसेच आमच्या मासिकांचे विस्तृत वितरण होण्यासाठी आपण खूपच त्रोटक अशी मासिक-सादरता करीत असतो. पण आता, जेथे प्रचारकांना आपले क्षेत्र वारंवार उरकावे लागत आहे अशा ठिकाणी त्यांना घरमालकासोबत बोलण्यासाठी अधिक वेळ देता येईल. मासिकातील एखाद्या लेखामधील ज्या गोष्टी आवडल्या त्या अधिक प्रशस्तपणे मुलेही मांडू शकतील. हे कसे करता येईल? यासाठी मासिकातील लेखांशी परिचित असणे जरुरीचे आहे. याकरता वेळ व पूर्वदृष्टीची गरज आहे. मासिकाचे वाचन करताना आपल्या क्षेत्रातील लोकांना कोणती गोष्ट आकर्षित करील ते निश्चितपणे शोधा. मग, सेवाकार्याला जाण्याआधी पुन्हा मासिक चाळा व जे मुद्दे तुम्ही सादर करणार आहात ते निवडून घ्या. घरोघरी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणते लेख दाखविणार ते आधीच ठरवून टाका. मासिकातील एखादा सुंदर विषय आपल्या प्रस्तावनेचा मुख्य केंद्रबिंदू बनवा. मित्रत्वाच्या संभाषणाद्वारे घरमालकाचा दृष्टीकोण जाणून घ्या आणि मासिक सादर करण्यामध्ये सरळ मनोदय राखा.
आमचा उद्देश ध्यानात असू द्या
४ घरोघरी जाण्यामध्ये आमचा उद्देश, आम्ही किती मासिके वा पुस्तके वितरीत करतो हा नाही. लोकांनी सत्याचे अचूक ज्ञान घेण्यासाठी त्यांना मदत द्यावी ही आमची इच्छा आहे. पेत्र व योहान यांनी शोमरोनामध्ये यहोवाचे वचन सरळ मार्गाने सांगितले, त्याचप्रमाणे आम्हीही आमचा वेळ, आमच्या क्षेत्रातील लोकांनी सत्यास प्रतिसाद द्यावा म्हणून त्यांना संधि देण्यासाठी खर्च करण्याची इच्छा धरावी.
५ आमच्या संभाषणाचा आधार म्हणून आमच्या मासिकांना प्रभावीपणे उपयोगात आणल्यामुळे हा उद्देश साध्य होऊ शकेल. आम्ही स्वतःसाठी व इतरांसाठी ही प्रार्थना करावी की आम्हाला ‘सुवार्तेचे पवित्र रहस्य उघडपणे कळविण्यासाठी बोलता यावे’ म्हणून साहाय्य मिळावे.—इफिस ६:१८-२०.