परिणामकारक असल्यास तिचा उपयोग करा!
१ सेवेत उपयोग करण्यासाठी, आमची राज्य सेवा आपल्याला सतत निरनिराळ्या प्रस्तुती सुचवत असते. यामुळे राज्य संदेशाविषयी आस्था निर्माण करण्याच्या नवनवीन कल्पना आपल्याला मिळतात. प्रत्येक महिन्याला, यांपैकी कदाचित एखाददोन प्रस्तुती शिकण्याचा तुम्ही प्रयास करत असाल. तथापि, काही प्रचारकांच्या लक्षात येईल, की यांपैकी एखाद्या प्रस्तुतीचा एकदा दोनदा उपयोग करतो ना करतो तोच आमची राज्य सेवा याच्या पुढील अंकात आणखीन नवीन प्रस्तुती पुरवल्या जातात. स्पष्टतः, आधीच्या प्रस्तुतीचा उपयोग करण्यात निपुण होण्याआधी नवीन प्रस्तुती शिकणे सर्वांनाच शक्य होते असे नाही.
२ तथापि, क्षेत्र सेवेत बराच वेळ घालवणारे हजारो पायनियर व प्रचारक देखील आहेत. शिवाय, अनेक मंडळ्या दर काही आठवड्यांनी आपले क्षेत्र उरकत असतात. अशा परिस्थितींत, संदेश देण्यासाठी नवनवीन प्रस्तावना व कल्पना असल्यास प्रचारकांना ते आवडते. यामुळे कौशल्यांत तरबेज होण्यासाठी त्यांना मदत होते. शिवाय, त्यांची सेवा अधिक रोचक व फलदायी होण्यास, तसेच समोर आलेली आव्हाने पेलण्यास त्यांना मदत मिळते.
३ परिस्थिती कोणतीही असो, तुम्ही तयार केलेली एखादी प्रस्तुती आस्था विकसित करण्यात प्रभावकारी ठरली असल्यास सर्वार्थाने तिचा उपयोग करत राहा! एखादी प्रस्तुती परिणामकारक ठरत असताना तिचा उपयोग करण्याचे सोडून देण्याची गरज नाही. केवळ चालू महिन्याच्या साहित्य सादरतेशी प्रस्तुती जुळवून घ्या. आमची राज्य सेवा यात दिलेल्या सूचनांची तुम्ही उजळणी करता तेव्हा तुमच्या प्रस्तुतीत तुम्हाला कदाचित समाविष्ट करण्यास आवडतील असे काही रोचक मुद्दे शोधा.
४ तर मग, आमची राज्य सेवा याचा नवीन अंक हाती येतो तेव्हा लक्षात ठेवा, त्यात दिलेल्या प्रस्तुती निव्वळ सुचविलेल्या आहेत. तुम्हाला जर त्यांचा उपयोग करता आला तर उत्तमच. पण, तुमच्या क्षेत्रात परिणामकारक ठरलेली एखादी प्रस्तुती तुम्हाला आधीच आढळली असल्यास, तिचा उपयोग करा! ‘सोपविलेली सेवा’ सर्वोत्तमपणे ‘पूर्ण करणे,’ योग्य मनोवृत्ती असणाऱ्यांना शोधणे आणि त्यांना शिष्य बनण्यास मदत करणे ही महत्त्वाची बाब आहे.—२ तीम. ४:५.