प्रश्न पेटी
▪ इतरांच्या वाटपासाठी संस्थेची प्रकाशने पुनःमुद्रित करणे योग्य आहे का?
अनेक वर्षांपासून, संस्थेने मोठ्या प्रमाणात प्रकाशने छापली आहेत ज्यात खासपणे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर पवित्र शास्त्रातील ज्ञानाची चर्चा केली आहे. अलिकडील वर्षात सत्य शिकलेले कदाचित असा विचार करतील की गतकाळात छापलेल्या साहित्याचा फायदा त्यांना मिळाला नाही व ते आता संस्थेकडेही उपलब्ध नाही. जुन्या प्रकाशनांच्या प्रती मिळवण्यासाठी काहींनी अनेक प्रयत्न केले, आणि इतरांनी संस्थेची प्रकाशनांचे मुद्रण करणे त्यांच्याकडे घेतले आणि विविध मार्गांनी उपलब्ध केले आहे. व यात पुनःमुद्रण तसेच संगणकावर पुनःउत्पादन केले आहे. काही बाबतीत हे आर्थिक फायद्यासाठी केले गेले आहे.
विश्वासू “दास” आमच्या आध्यात्मिक गरजा जाणून आहे आणि “योग्य वेळी” ते त्याची व्यवस्था करतात. (मत्तय २४:४५) गतकाळात छापलेल्या साहित्याला पुनःप्राप्त करण्याची गरज भासल्यास संस्थेने त्याच्यासाठी व्यवस्था केली आहे. उदाहरणार्थ, द वॉचटावर चे १९६० पासून ते १९८५ पर्यंतच्या सर्व खंडाचे पुनःमुद्रण करून सर्वांकरता उपलब्ध करून ठेवले आहे. तथापि, एखादा जेव्हा स्वतः होऊन पुनःमुद्रण व वितरण करण्याची प्राथमिकता घेतो तेव्हा त्यामुळे अनावश्यक समस्या येऊ शकतात.
आर्थिक लाभासाठी ह्या साहित्याचे पुनःमुद्रण व वितरण केल्यामुळे गंभीर समस्या उद्भवतात. आमची राज्य सेवा जुलै १९७७ मधील प्रश्न पेटीत असे म्हटले आहेः “राज्यसभागृह, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाच्या ठिकाणी तसेच यहोवाच्या लोकांच्या संमेलनामध्ये आरंभ करण्याद्वारे किंवा कोणत्याही मालाची विक्री करण्याची जाहिरात किंवा व्यापारी फायद्यासाठी केलेल्या कोणत्याही योजनांद्वारे आमच्या ईश्वरशासित संगतीचा स्वार्थासाठी अयोग्य फायदा घेऊ नये. व्यापारी उद्योगाला त्याच्या योग्य ठिकाणी ठेवल्यास आध्यात्मिक आस्था ठेवण्याकडे आमचे पूर्ण लक्ष लागते.” यास्तव, जेव्हा देवाचे वचन किंवा त्याच्या संबंधीत गोष्टीला व्यापाराचा विषय बनतो तेव्हा आम्ही फायदा घेण्याचा दृष्टीकोन टाळणे महत्त्वाचे आहे.