देवाच्या संघटनेशी सहवास ठेवण्यासाठी पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना मदत करणे
यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालणारी अद्वितीय आणि जगाच्या राजनैतिक, धार्मिक आणि वाणिज्य संघटनांपासून संपूर्णतः वेगळी अशी त्याची एकच संघटना आहे. ही संघटना, पवित्र शास्त्राचे ज्ञान मिळवण्यात आणि देवाच्या उद्देशांबाबत सूक्ष्म-दृष्टी मिळवण्याचेच केवळ महत्त्वपूर्ण काम करत नाही तर, प्रत्येक विद्यार्थ्याला, यहोवा देवाच्या पार्थिव संघटनेबद्दल व तिच्या कामाबद्दल समजवण्यात, तसेच त्यांना त्याकडे मार्गदर्शित करण्यात मदत करण्याची देखील तिची जबाबदारी आहे.
२ अर्थात, ख्रिस्ती धर्माशी परिचित नसलेल्यांना आणि देवाच्या संघटनेबद्दल “संघटनेचा” भाग बनत असताना एक मोठा दबाव आणि जबाबदारी वाटणाऱ्या लोकांना शिकवणे सोपी गोष्ट नाही. शिवाय, पुष्कळ लोक इतर नवीन धर्मांना पाहतात त्याप्रमाणेच यहोवाच्या साक्षीदारांकडे पाहत असल्यामुळे आणि साक्षीदारांच्या रक्ताच्या विषयाबद्दल तसेच इतर तत्त्वांबद्दल कलुषितपणा असल्यामुळे, काही प्रचारकांना संघटनेविषयी स्पष्टीकरण देण्यास जड जात असेल. याच कारणास्तव, अशीही परिस्थिती निर्माण होते जेव्हा, संघटनेविषयी पुष्कळ समजावले गेल्यावरही, ते प्रभावी ठरत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी सभांना येणार नाही आणि त्याबद्दल काही पाऊल उचलणार नाही.
३ विद्यार्थ्याची प्रगती आणि पार्श्वभूमी लक्षात घ्या: पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांपैकी असे पुष्कळ जण आहेत ज्यांना, पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ती धर्माबद्दल शिकण्याच्या इच्छेऐवजी, मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि कौटुंबिक जीवनाबद्दल शिकण्यामध्ये आस्था असल्यामुळे त्यांनी गृह पवित्र शास्त्र अभ्यासासाठी प्रतिसाद दिला. अशांसाठी, लगेचच इस्राएल राष्ट्राच्या इतिहासापासून सुरवात करणाऱ्या यहोवाचे साक्षीदार-देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत या माहितीपत्रकाचा उपयोग केल्याने परिणामांच्या अपेक्षेची अधिक आशा करणे असे होईल. अशावेळी, ज्या देवाने मानवाला, त्यांचे आनंदी कौटुंबिक जीवन असावे या हेतूने निर्माण केले त्याच्याबद्दल आणि यहोवाने मानवासाठी “मार्गदर्शनाचे पुस्तक” म्हणून पवित्र शास्त्र दिले आहे, याविषयी पहिल्यांदा स्पष्टीकरण देण्यात काही वेळ घालवणे अधिक प्रभावकारी ठरेल. दुसऱ्या बाजूला पाहता, खिस्ती धर्माच्या चर्चमधील एखाद्या व्यक्तीला, यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेची तुलना त्यांच्या चर्चसोबत करून, कोणती संघटना अधिककरून पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीसारखी आहे याचा निश्चय करण्यास तिची मदत केली जाऊ शकते.
४ यास्तव, विद्यार्थ्याची पार्श्वभूमी पाहून, यहोवाचे साक्षीदार-देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत या माहितीपत्रकाचा उपयोग अगदी सुरवातीपासून करावा किंवा अभ्यास सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एखादी योग्य वेळ निवडून माहितीपत्राकाचा अभ्यास करावा, हे चालक ठरवू शकेल.
५ किंवा जेहोवाज विटनेसेस इन द ट्वेंटियत सेंचुरी या माहितीपत्रकाचा किंवा रिझनिंग पुस्तकातील “यहोवाचे साक्षीदार,” या उपशिर्षकाखालील भागाचा उपयोग करावयास तुम्हाला आवडेल. यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य, एक जगव्याप्त पवित्र शास्त्राचे शैक्षणिक कार्य आहे. हा गट भेसळ न केलेले पवित्र शास्त्र शिकवण्यात लोकांची मदत करत आहे असे इतरांना आत्मविश्वासाने सांगू शकेल अशाप्रकारे तुमच्या विद्यार्थ्याची मदत करा.
६ विविध सभांना आणि संमेलनांना उपस्थित राहण्याचा उद्देश, त्यात समाविष्ट असलेल्या गोष्टी आणि उपस्थितांसाठी त्यांचा काय लाभ आहे हे तुमच्या विद्यार्थ्याला लगेच समजेल अशाप्रकारे त्याचे स्पष्टीकरण देणे, ही तुम्हाला करावयाची दुसरी गोष्ट आहे. तुमचा विद्यार्थी शिकत असलेल्या गोष्टी, देव वचनावर आधारित असलेले सत्य आहे आणि ते कोणत्याही जगिक पुस्तकांमधून मिळवले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, पवित्र शास्त्रात आस्था असणाऱ्या लोकांसाठी सभा या यहोवा देवाकडून, खास पवित्र शास्त्राचे शैक्षणिक कार्यक्रम आहेत. या कारणास्तव, सभांच्या साहित्याचा एकदाच वरवरचा अभ्यास केल्याने संतुष्ट होऊ नका, परंतु उपस्थित असणारे लोक, व सभांमधून कोणते लाभ मिळतात या विविध कोनातून, सभांना पाहा. तुम्ही आतापर्यंत जे शिकलात आणि अनुभवले आहे त्याविषयी अर्थपूर्ण चर्चा करा.
७ दृश्य आकर्षण: माहितीपत्रकावरील आणि मासिकांवरील चित्रांकडे विद्यार्थ्याचे लक्ष आकर्षित करा, आणि तुम्ही सांगू इच्छिणाऱ्या मुद्याचा खोल प्रभाव व्हावा असा प्रयत्न करा. चित्रांकडे पाहिल्यावर विद्यार्थ्याला जे काही वाटते ते व्यक्त करावयास त्याला उत्तेजन द्या. यहोवाच्या संघटनेकडे, ज्यांनी अनेकांना निरवले असे पुष्कळ फलदायी प्रचारक, या उद्देशास्तव बनवलेल्या अल्बम्चा उपयोग करतात.
८ होईल तितक्या लवकर, विद्यार्थ्याला व्यक्तिगतपणे यहोवाच्या लोकांना पहायला मिळेल यासाठी व्यवस्था करा. राज्य सभागृहांमध्ये किंवा संमेलनात तो यहोवाच्या लोकांच्या संपर्कात येईल अशी व्यवस्था करा आणि यहोवाचे साक्षीदार केवळ सामान्य लोक आहेत परंतु, पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे आणि यहोवाच्या मार्गांबद्दल गुणग्राहकता दाखवून त्याप्रमाणे चालणारे आहेत हे पाहावयास त्याला मदत करा. राज्य सभागृहामध्ये सभा नसेल तेव्हा त्याला दाखवून ती कोणत्या प्रकारची जागा आहे याचे स्पष्टीकरण देणे देखील अतिशय प्रभावकारी आहे. शक्य असल्यास, बेथेलला भेट देण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या.
९ त्याशिवाय, यहोवाचे लोक ज्या आनंदाचा अनुभव घेतात त्याबद्दल सांगण्यास तुम्ही योग्य सोबत्यांना तुमच्यासोबत अभ्यासाला येण्यासाठी, आमंत्रण द्या. उदाहरणार्थ, तुम्ही एका युवक प्रचारकाला यहोवाच्या संघटनेद्वारे पुरवलेल्या शैक्षणिक कार्यक्रमाचा काय लाभ झाला ते कथन करण्यास सांगू शकता. एका ख्रिस्ती कुटुंब मस्तकाला, साक्षीदार बनण्याच्या आधीच्या तुलनेत तो पिता आणि पती या नात्याने कसा बदलला हे कथन करण्यास सांगा, ज्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांशी आणि त्यांच्या संघटनेशी अधिक जवळ असल्याचे विद्यार्थ्याला वाटेल.
१० आतापर्यंत करत आला आहात त्याप्रमाणे, अभ्यासाच्या आधी किंवा नंतर १०-१५ मिनिटांची सुखकर चर्चा करा, आणि यहोवाच्या संघटनेचे एक संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करा. त्याशिवाय, यहोवाची संघटना पाहण्यात आणि तिच्याबद्दलची भावना निर्माण करण्यात, विद्यार्थ्याची मदत करण्यासाठी यहोवाच्या लोकांशी सहवास राखण्याकरता हळूहळू अशा प्रसंगांना वाढवण्यासाठी विविध संधींचा उपयोग करा. तुम्ही अशा गोष्टी केल्यास, तो विद्यार्थी यहोवाच्या पार्थिव संघटनेबद्दल आणि तिच्या कार्यांविषयी समजू शकेल व आम्हासोबत देवाची स्तुती करणारा असा बनेल.