युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा
१ योग्य मार्गाने एखाद्याने त्याची शक्ती आणि तारुण्याच्या जोमाचा उपयोग केला तर, जीवन खरोखरीच आनंदमय असू शकेल. सुज्ञ शलमोन राजाने लिहिले: “हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्लास देवो.” (उप. ११:९) तुम्ही तरुण लोक तुमच्या कार्यहालचालींसाठी यहोवाला जबाबदार आहात.
२ तुम्ही तुमचे जीवन कशाप्रकारे जगता याचा केवळ तुमच्यावरच नव्हे तर, तुमच्या पालकांवरही परिणाम होतो. नीतीसूत्रे १०:१ म्हणते: “मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी.” परंतु, त्याहून महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, तुम्ही ज्याप्रकारे जीवन जगता त्याचा, तुमच्या निर्माणकर्त्यावर, यहोवा देवावर परिणाम होतो. याच कारणास्तव, नीतीसूत्रे २७:११ येथे, यहोवा तरुणांना प्रोत्साहन देतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” आज तुम्ही युवकांनो, यहोवाचे हृदय कशाप्रकारे आनंदित करू शकता? हे पुष्कळ मार्गांद्वारे साध्य केले जाऊ शकते.
३ योग्य उदाहरणाद्वारे: तुम्ही तरुण लोक, देवाच्या वचनात भाकीत केलेल्या “कठीण दिवस” यांचा अनुभव घेत आहात. (२ तीम. ३:१) अविश्वासू सोबत्यांकडून तसेच तुमच्या पवित्र शास्त्रावर आधारित दृष्टिकोनांचा उपहास करणाऱ्या शिक्षकांकडून तुम्हावर दबाव येत असतील. उदाहरणार्थ, एका शिक्षकाने उत्क्रांतीच्या सिद्धांताला वास्तविकता आणि पवित्र शास्त्राला खोटी कल्पना म्हणून सादर केले. परंतु, वर्गातील एका तरुण प्रचारकाने निष्ठेने पवित्र शास्त्राची बाजू घेतली. परिणामतः, पुष्कळ पवित्र शास्त्राभ्यास चालू झाले. आस्थेवाईकांपैकी काही, सभांना उपस्थित राहू लागले. तुम्हा तरुण बंधू व बहिणींचा विश्वास, या अधार्मिक जगाचा धिक्कार करतो आणि प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आकर्षित करतो.—पडताळा इब्री. ११:७.
४ वाईटाला वश न होण्यासाठी, मंडळीतील तुमच्या सोबत्यांना तुम्ही उत्तेजन देता का? शाळेत, घरी आणि मंडळीत चांगले उदाहरण राखून, तुम्ही इतर युवक प्रचारकांचा विश्वास खंबीर करू शकता. (रोम. १:१२) इतरांसाठी स्वतःचे उदाहरण ठेवून यहोवाचे हृदय आनंदित करा.
५ वेशभूषा तसेच केशभूषेद्वारे: एका तरुण बहिणीच्या विनयशील पोषाखामुळे तिला चिडवले आणि उपहास केला जाई व तिला “शुद्ध” या नावाने बोलवले जाई. परंतु, या गोष्टीमुळे घाबरून, जगाचे अधार्मिक मार्ग तिने स्वीकारले नाहीत. त्याउलट, ती एक यहोवाची साक्षीदार असून साक्षीदारांचा उच्च दर्जा राखत होती, असे स्पष्टीकरण तिने दिले. अशाप्रकारचे अविचल धैर्य तुम्हामध्ये आहे का? की सैतानाच्या जगाला, त्याच्या विचार करण्याच्या आणि वर्तनाच्या पद्धतीनुसार आकार देण्यास तुम्ही अनुमती देता? तुम्हापैकी पुष्कळ तरुणांना, यहोवाच्या शिकवणी ऐकताना आणि या जगाच्या गबाळ्या शैली, छंद, मूर्त्या आणि शिकवणी नाकारलेले पाहणे किती आनंददायक आहे. खरेच, यहोवाच्या संघटनेने आम्हाला सांगितले त्याप्रमाणे, या गोष्टी जगापासून आहेत आणि दुष्ट आत्म्यांचा प्रभाव त्यांच्यावर आहे हे आम्ही ओळखले पाहिजे!—१ तीम. ४:१.
६ करमणूक आणि मनोरंजनाच्या निवडीद्वारे: मुलांना सुज्ञपणे योग्य करमणूक आणि मनोरंजनाची निवड करण्यात मदत करण्याच्या गरजेला पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. एका बांधवाने त्याला आवडणाऱ्या एका उत्तम कुटुंबाबद्दल खूप प्रशंसा केली. आध्यात्मिक मनोवृत्ती असल्याने, कौटुंबिक मनोरंजनाला देखील लागू होणारे मार्गदर्शन पालकांनी पुरवले. त्या बांधवाने असे निरिक्षिले: “कोणतीही गोष्ट एकत्र मिळून करण्याच्या त्यांच्या पद्धतीची मी प्रशंसा करतो. पालक मुलांना केवळ सेवेसाठी तयार होण्यातच मदत करत नाहीत परंतु, मनोरंजनाची वेळ येते तेव्हा, रपेटीवर जाण्यात, वस्तु-संग्रहालयांना भेटी देण्यात, किंवा घरगुती खेळ खेळण्यात वा कौटुंबिक प्रकल्पांवर काम करण्यात त्यांना मजा येत असे. त्यांचे एकमेकांमधील आणि इतरांसाठीचे प्रेम पाहून, भवितव्यात काहीही झाले तरी ते, सत्यात राहतील असा आत्मविश्वास तुम्हाला मिळतो.”
७ अर्थात, संपूर्ण कुटुंबाला मनोरंजन आणि करमणूकीत सहभाग घेण्यासाठी शक्य नसेल, अशी वेळ असते. तुम्ही युवकांनी याबद्दल आणि तुमचा रिकामा वेळ घालवण्याची निवड कशी करावी याच्या गांभीर्याबद्दल दक्ष राहिले पाहिजे. सैतानाचा, होईल तितक्या लोकांना मार्गभ्रष्ट करण्याचा निश्चय आहे. विशेषतः, तरुण आणि अननुभवी लोक त्याच्या कावेबाज कृत्यांना आणि मन वळवणाऱ्या फसव्या मार्गांना भेद्य आहेत. (२ करिं. ११:३; इफि. ६:११) यासाठी, आज तुम्हाला परावृत्त करण्यासाठी आणि सुखविलास मिळवणाऱ्या आणि अधार्मिकतेच्या स्वार्थी जीवनाचा पिच्छा करण्यास सैतानाकडे तुमचे मन वळवण्यासाठी विविध मार्ग आहेत.
८ दूरदर्शन फूस लावण्यात पटाईत आहे तसेच ते भौतिक व अनैतिक जीवन-शैलीला चेतवते. चित्रपट व व्हिडिओमध्ये बहुधा हिंसा आणि उघड लैंगिकता दाखवली जाते. लोकप्रिय संगीत अधिकाधिक हिणकस आणि बीभत्स झाले आहे. सैतानाचे मोहपाश निरुपद्रवी दिसतात, पण तरीसुद्धा, त्यांनी हजारो ख्रिस्ती युवकांना चुकीच्या विचार पद्धती आणि वर्तणूकीच्या पाशात पाडले आहे. अशा दबावांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला नीतीमत्वतेचा पाठलाग करावयास हवा. (२ तीम. २:२२) करमणूक आणि मनोरंजनाच्या बाबतीत तुमच्या विचार पद्धती आणि वर्तणूकीमध्ये तडजोड करण्याची गरज असल्यास, ती कशी केली जाऊ शकते? स्तोत्रकर्ता त्याचे उत्तर देतो: “अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको.”—स्तोत्र. ११९:१०.
९ खेळातील किंवा करमणूकीच्या प्रख्यात लोकांना पूज्य मानणे सामान्य गोष्ट झाली आहे. यहोवाचे भय, तुम्हाला अपूर्ण मानवांना पूज्य मानण्यापासून दूर राहण्यास मदत करील. आज, पुष्कळजण अनैतिकतेला देखील पूज्य मानतात. बीभत्स चित्रे किंवा भ्रष्ट संगीताला टाळल्याने या प्रवृत्तीपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. आपल्या अलिकडील मंडळीच्या पुस्तक अभ्यासामध्ये अभ्यासलेल्या टेहळणी बुरुजचे लेख या माहितीपत्रकाने, संगीताबाबत असे निरिक्षिले: “संगीत ईश्वराची देणगी आहे. पण बहुतांसाठी ते हितकारक नसलेल्या उद्योगात बदलले आहे. . . . यास्तव, संगीताला आपल्या स्थानी ठेवण्याचा तुमचा मनोदय दृढ ठेवा व यहोवाची कृत्ये तुमच्या काळजीचा अग्रगामी भाग राहू द्या. तुम्ही निवडणाऱ्या संगीताच्या बाबतीत निवडक असा व काळजी घ्या. त्यामुळे तुम्ही ईश्वरी देणगीचा अवमान नव्हे तर योग्य वापर कराल.”
१० वाईट गोष्टींचा संपूर्णतः तिटकारा करा. (स्तोत्र. ९७:१०) वाईट करण्याचा मोह झाला तर, यहोवा त्या गोष्टीला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ते पाहा, व नको असलेल्या गर्भधारणा, लैंगिकरित्या संक्रमित झालेले रोग, भावनात्मक हानी, स्व-आदर गमावणे, आणि मंडळीतील विशेषाधिकारांना गमावणे या परिणामांचा विचार करा. दुष्टाईला प्रोत्साहन देणारे दूरदर्शन कार्यक्रम, चित्रपट, व्हिडिओ, गीते किंवा संभाषण या गोष्टी टाळा. पवित्र शास्त्र ज्यांना ‘मूर्ख’ म्हणते अशांबरोबर संबंध ठेवण्याचे टाळा. (नीती. १३:१९) निवडक असा; यहोवा आणि त्याच्या नीतीमान दर्जांवर प्रेम करणाऱ्या मंडळीतील लोकांबरोबर जवळचा संबंध ठेवण्याची निवड करा.
११ होय, खरोखरच यहोवाचे हृदय आनंदित करू इच्छिणारे युवक, इफिसकर ५:१५, १६ मधील चांगला सल्ला ऐकतील: “म्हणून अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” या शेवटल्या काळी तुमच्या प्रगतीवर “नजर” ठेवण्यास कोणती गोष्ट मदत करील?
१२ आध्यात्मिक गरजांची काळजी घेणे: मत्तय ५:३ येथे येशूने असे म्हटले: “जे आध्यात्मिक गरजेविषयी जागृत आहेत, ते धन्य.” [न्यू.व.] तुमच्या आध्यात्मिक गरजांविषयी जागृत राहून तुम्ही देखील धन्य असू शकता. त्या गरजेला भागवण्यासाठी, सुवार्तेचा प्रचार करण्यात आवेशीपणाने सहभाग घेणे गोवलेले आहे कारण, त्यामुळे आम्ही शिकत असलेल्या गोष्टींमध्ये ते आमचा विश्वास बळकट करते.—रोम. १०:१७.
१३ व्यक्तिगत अनुभवावरुन तुम्हाला हे माहीत आहे की, सेवेमध्ये नियमितपणे भाग घेणे नेहमीच सोपे नसते. हे पुष्कळदा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे असू शकते. यासाठी, तुमच्या बाजूने खंबीर निश्चयाची गरज आहे. सेवेत नियमितपणे भाग घेऊन तुम्ही, तुमची साक्ष देण्याची कुशलता अधिक वाढवाल आणि प्रचार करण्याच्या तुमच्या क्षमतेमध्ये आणखी आत्मविश्वास निर्माण कराल.
१४ मंडळीतील नियमित पायनियर आणि वडिलांसारख्या अनुभवी प्रचारकांसोबत काम करण्याची योजना करा. त्यांच्या सादरतेकडे आणि दारावर आक्षेप घेतल्यास ते ज्याप्रकारे हाताळतात हे नीट लक्ष देऊन ऐका. रिझनिंग पुस्तक आणि आमची राज्य सेवा यामध्ये दिलेल्या सल्ल्यांचा चांगला उपयोग करा. थोड्याच काळात, तुम्हाला सेवेतून अधिक आनंद प्राप्त होईल कारण तुम्ही तुमचे सर्व काही यहोवाला देत आहात.—प्रे. कृत्ये २०:३५.
१५ शाळांमध्ये साक्ष देण्याच्या संधींचा काहीजण फायदा घेऊ शकले आहेत आणि शिष्य बनवण्यात अधिक यशस्वी झाले आहेत. (मत्त. २८:१९, २०) एक ख्रिस्ती युवक म्हणतो: “रिकाम्या तासांच्या वेळी व विशेषकरून सुट्टीच्या वेळी, मला साक्ष देण्यासाठी पुष्कळ संधी होत्या. इतर जण पाहू शकतील अशा ठिकाणी माझ्या मेजावर मी पवित्र शास्त्राची प्रकाशने ठेवत असे, तेव्हा पुष्कळ आस्थेवाईक विद्यार्थी माझ्याकडे येत होते.” कालांतराने, पुष्कळ विद्यार्थी आणि एक शिक्षिका देखील ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागली. खरे म्हणजे, शिक्षिकेने समर्पित साक्षीदार होण्यापर्यंत प्रगती केली. तुमच्या सारख्या तरुण उपासकांच्यामुळे यहोवाच्या नावाची स्तुती होते तेव्हा तो खूप आनंदित होतो.
१६ तुमची आध्यात्मिक गरज भागवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, व्यक्तिगत अभ्यास, होय. यहोवाचे हृदय आनंदित करण्यासाठी, आम्हाला त्याचे, त्याच्या उद्देशांचे आणि त्याच्या गरजांचे ज्ञान करून घ्यायला हवे. तुम्ही व्यक्तिगत अभ्यासासाठी वेळ काढता का? नियमितपणे जेवण्यासाठी जसा वेळ काढता त्याचप्रमाणे नियमितपणे अभ्यास करण्यासाठी तुम्ही वेळ काढता का? (योहान १७:३) ईश्वरशासित सेवा प्रशालेसाठी असलेल्या, पवित्र शास्त्र वाचनाच्या आराखड्यासोबत राहण्याव्यतिरिक्त, पवित्र शास्त्राचे व्यक्तिगतपणे वाचन करण्यास तुमचा आराखडा आहे का? तुम्ही सर्व सभांसाठी चांगली तयारी करता का? वॉचटावर तसेच अवेक! या मासिकांना तुम्ही नियमितपणे वाचता का? विशेषकरुन, “तरुण लोक विचारतात . . . ” यातील प्रत्येक लेख वाचण्यासाठी व दिलेले प्रत्येक वचन पाहण्यासाठी तुम्ही वेळ काढता का? आणि संस्थेने खास तुमच्या आध्यात्मिक गरजांसाठी बनवलेले क्वशन्स् यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क या पुस्तकाला विसरून जाऊ नका. या पुस्तकाने, यहोवाच्या निकट येण्यासाठी कशी मदत केली ते सांगण्यासाठी, जगभरातील ख्रिस्ती युवकांनी आणि त्यांच्या पालकांनी, लिहून पाठवले आहे.
१७ तुम्ही पवित्र शास्त्र तसेच ईश्वरशासित पवित्र शास्त्राची साधने वाचता तेव्हा, ती तुम्हाला यहोवा, त्याचे विचार आणि त्याचे उद्देश याबद्दल सांगतात. ही माहिती तुम्हाला कशी मदतदायी ठरू शकेल त्यावर विचार करा. तुम्ही जे वाचत आहात, त्याचा संबंध आधी वाचलेल्या गोष्टींशी जोडा. यामध्ये मनन करणे गोवलेले आहे. मनन केल्यामुळे ती माहिती तुमच्या हृदयाप्रत पोहोंचेल आणि तुम्हाला प्रवृत्त करील.—स्तोत्र. ७७:१२.
१८ मंडळीतील सभांना उपस्थित राहणारे युवक त्यांच्या आध्यात्मिक गरजेबाबत जागृत आहेत हे पाहण्यासाठी आम्हाला आनंद होतो. सभांमध्ये नियमितपणे अर्थपूर्ण विवेचन मांडून तुम्ही ख्रिस्ती युवक, इतरांना प्रोत्साहन देऊ शकता. प्रत्येक सभेमध्ये निदान एक तरी उत्तर देण्याचे ध्येय ठेवा. मंडळीतील सर्व वयोगटातील लोकांबरोबर सभांच्या आधी व नंतर उभारणीकारक सहवास ठेवून, ऊबदार नातेसंबंध उत्पन्न करा. (इब्री. १०:२४, २५) एका तरुण बांधवाने सांगितले की, त्याच्या पालकांनी, सभेमध्ये किमान एका वृद्ध बांधवाबरोबर किंवा बहिणीबरोबर संभाषण करण्यास उत्तेजन दिले. मंडळीतील वृद्ध सदस्यांबरोबर संगती ठेवल्याने, प्राप्त झालेल्या अनुभवाला तो आज महत्त्वपूर्ण समजतो.
१९ आध्यात्मिक ध्येयांचा पाठलाग करा: पुष्कळ युवकांच्या जीवनाला उद्देश आणि मार्गदर्शन नसलेले पाहून दुःख वाटते. परंतु, ईश्वरशासित ध्येये ठेवून त्यांना यशस्वीपणे मिळवल्याची भावना अनुभवयास चांगले वाटत नाही का? ईश्वरी शिक्षणाच्या प्रज्वलितपणामुळे या ध्येयांचा पाठलाग करणे आतासाठी व्यक्तिगतपणे समाधानकारक असेल आणि शेवटी अनंतकाळच्या तारणाकडे निरवील.—उप. १२:१, १३.
२० ध्येय ठेवताना त्याला प्रार्थनेची एक बाब बनवा. तुमच्या पालकांसोबत तसेच वडिलांसोबत बोला. तुमचे व तुमच्या क्षमतांचे परीक्षण करा, इतरांशी तुलना न करता, तुम्हाला जमेल त्याप्रमाणे व्यावहारिक ध्येये ठेवा. शारीरिकरित्या, मानसिकरित्या, भावनिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या—प्रत्येकजणांची घडण वेगळी आहे. या कारणास्तव, इतर साध्य करतात ते सर्व साध्य करण्यासाठी तुम्ही पाहू नका.
२१ तुम्ही ठेवू शकाल अशी कोणती ध्येये आहेत? तुम्ही अद्याप प्रचारक किंवा बाप्तिस्मा प्राप्त न झालेले असाल तर हेच तुमचे ध्येय का नाही बनवत. तुम्ही प्रचारक असल्यास, प्रत्येक आठवडी एक विशिष्ट वेळ सेवेत घालवण्याचे ध्येय ठेवू शकता. पुनर्भेट करण्यात कार्यक्षम शिक्षक असण्याचा प्रयत्न करा, आणि एक पवित्र शास्त्र अभ्यास चालवण्याचे ध्येय ठेवा. तुम्ही शाळेत जाणारे बाप्तिस्मा प्राप्त युवक आहात तर, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये साहाय्यक पायनियरींग करण्याचे ध्येय का ठेवू नये? “प्रभूच्या कामात अधिकाधिक” करावयास आहे.—१ करिं. १५:५८.
२२ पालकांची मदत महत्त्वाची: मंडळीतील युवकांनी, जीवन मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये ते एकटेच आहेत, असा विचार कधीही करू नये. यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे, या तरुणांना, दररोजचे निर्णय घेण्यासाठी आणि जीवनातील अडखळणांवर मात करण्यासाठी मदतीचा सल्ला पुरवला आहे. निश्चितच, समर्पित पालकांची, योग्य निर्णय घेण्यात त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी सर्वप्रथम जबाबदारी आहे. पवित्र शास्त्र, १ करिंथकर ११:३ मध्ये, पतीला घराचे मस्तकपद देते. या कारणास्तव, ख्रिस्ती कुटुंबामध्ये, पत्नी त्याच्या एकमतात काम करत असताना, देवाच्या आज्ञांबद्दल मुलांना शिकवण्यात पिता पुढाकार घेतो. (इफि. ६:४) बालपणी सुरू झालेल्या योग्य शिक्षणाद्वारे हे केले जाते. बाळाचा मेंदू त्याच्या जीवनाच्या पहिल्या वर्षात तीन पट वाढतो, यामुळे पालकांनी त्याच्या शिकण्याच्या क्षमतेला कमी लेखता कामा नये. (२ तीम. ३:१५) मुले वाढत जातात तशी, यहोवावर प्रेम करण्यासाठी आणि त्याच्याशी चांगला नातेसंबंध उत्पन्न करण्यासाठी पालकांनी प्रगतीशीलपणे त्यांना शिकवले पाहिजे.
२३ मुलांना मदत करण्याचे व्यावहारिक मार्ग पालकांना नेहमीच दाखवण्यात आले आहेत. उत्तम पालकीय उदाहरणापासून सुरवात करणे चांगले असेल. हे, तुमच्या मुलांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सांगण्यात वेळ घालवण्याऐवजी त्यांना आध्यात्मिकतेत वाढवण्यास अधिक मदत करील. योग्य पालकीय उदाहरण ठेवण्यात, घरामध्ये, तुमच्या सोबतीसाठी आणि मुलांसाठी आत्म्याच्या फळांना प्रदर्शित करणे गोवलेले आहे. (गल. ५:२२, २३) पुष्कळांनी अनुभवाद्वारे हे पाहिले आहे की, देवाचा आत्मा चांगल्यासाठी एक शक्तीशाली प्रभाव आहे. तुमच्या मुलांच्या मनाला आणि हृदयांना आकार देण्यासाठी ते मदत करते.
२४ पालकांना, व्यक्तिगत अभ्यासाच्या सवयींबाबत, सभांच्या उपस्थितीबद्दल आणि क्षेत्र सेवेत नियमित सहभाग घेण्याबाबत चांगले उदाहरण राखण्याची देखील आवश्यकता आहे. तुम्ही घरात सत्याबद्दल उत्साहाने बोलत असला, सेवेत आवेशी पुढाकार घेत असला आणि व्यक्तिगत अभ्यासाबाबत सकारात्मक असला तर, आध्यात्मिक बाबींमध्ये प्रामाणिकपणे आवड निर्माण करण्यासाठी तुमच्या मुलांना उत्तेजित केले जाईल.
२५ मनःपूर्वकतेने तयार केल्यास, नियमित, अर्थपूर्ण कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यासाची वेळ, आस्था निर्माण करणारी, आवडेल अशी व कौटुंबिक ऐक्याला धीर देणारी असेल. तुमच्या मुलांच्या हृदयापर्यंत जाण्यासाठी वेळ काढा. (नीती. २३:१५) पुष्कळ कुटुंबे, या प्रसंगाचा उपयोग, साप्ताहिक टेहळीबुरुजच्या अभ्यासाची तयारी करण्यासाठी करत असले तरी, वेळोवेळी कुटुंबाच्या एखाद्या विशिष्ट गरजेला विचारात घेणे प्रोत्साहनदायक ठरेल. दृष्टिकोनात्मक प्रश्ने विचारणे तसेच प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याचा अभिप्राय ऐकणे, प्रज्वलित करणारी तसेच तजेला देणारी गोष्ट असेल. कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला फायदा होईल असा अभ्यास चालवणे हे कुटुंब प्रमुखासाठी खरोखरीच एक आव्हान असेल. परंतु, सर्वजण आध्यात्मिकतेत वाढतात तेव्हा ते किती समाधानकारक असेल! सर्वांना गोवल्यामुळे, एक आनंदी आत्मा वास करील.
२६ तुमच्या आपत्यांचे जीव वाचवण्यासाठी तुमचे प्रेमळ, खास प्रशिक्षण आता महत्त्वपूर्ण आहे. (नीती. २२:६) हे ध्यानात घेतल्यावर, तुमच्या आयुष्यातली ही सर्वात महत्त्वपूर्ण शिकवण असेल, हे समजणे सोपे असेल. या खास महत्त्वपूर्ण कामात तुम्ही एकटेच आहात असा विचार कधीही करू नका. तुमच्या कुटुंबाच्या जबाबदारीची काळजी घेताना, मार्गदर्शनासाठी संपूर्णतः यहोवावर अवलंबून राहण्यास शिका. तेवढेच पुरेसे नाही. मदतदायी ठरतील असे इतरजन देखील आहेत.
२७ मदत करण्यासाठी इतरजन काय करू शकतात: राज्य सभागृहाची सफाई करण्यात, वडिलांनी मुलांना, त्यांच्या पालकांसोबत सहभागी करावयास दक्ष असावे. मंडळीच्या सभेतील मुलांना उत्तेजन द्या. प्रेक्षकांची सहभागिता असलेला भाग असल्यास, सेवा सभेच्या भागांना नेमून दिलेल्या वडिलांनी तसेच सेवा सेवकांनी, उत्तरासाठी मुलांनी उठवलेल्या त्यांच्या हातांकडे लक्ष द्यावे. उदाहरणशील युवकांना त्यांच्या पालकांसोबत प्रात्यक्षिक करावयास मिळावे यासाठी संधी शोधा. काहींची मुलाखत घेऊन थोडक्यात विवेचन देण्यास सांगा.
२८ त्यांच्या प्रयत्नात ते यशस्वी होतील असे गृहीत धरू नका. तरुण लोक मंडळीसाठी खरोखरच एक ठेवा आहेत. त्यांच्या उत्तम वर्तणूकीद्वारे, पुष्कळांनी ‘आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणली’ आहे. (तीत २:६-१०) अल्प सहभाग घेणाऱ्या युवकांची देखील प्रशंसा करण्याच्या गरजेविषयी जागृत असा. हे त्यांना भविष्यात त्या गोष्टीसाठी तयारी करण्यास आणि परत करण्याची इच्छा बाळगण्यास उत्तेजन देते. अशा आस्थेचे मूल्यमापन केले जाऊ शकत नाही; ते विनामूल्य आहे. सभेमध्ये, भाषणासाठी किंवा प्रात्यक्षिकासाठी तुम्ही वडील किंवा सेवा सेवक या नात्याने मंडळीच्या तरुण सदस्यांची भेटून, कितीदा प्रशंसा केली आहे?
२९ पायनियरांनो, तुम्ही मदत करण्यासाठी काय करू शकता? दुपारच्या आणि सप्ताहांताच्या योजनांमध्ये, शाळकरी मुलांना समाविष्ट करता येईल का, ते पाहण्यासाठी तुमच्या आराखड्यावर पुनर्विचार का करू नये? पूर्ण-वेळ सेवेच्या तुमच्या निर्णयाबद्दल तुम्ही सकारात्मकपणे बोलता का? चेहऱ्याच्या भावावरून आणि वर्तणूकीद्वारे तुम्ही तुमच्या सेवेत आनंदी आहात हे दर्शवता का? इतरांनी, खासकरुन तरुणांनी ते करावे, यासाठी तुम्ही शिफारस करता का? घरोघरच्या कामात भाग घेताना, तुमची भाषा उभारणीकारक आणि सकारात्मक आहे का? असे असेल तर, पायनियर या नात्याने, तुम्ही देखील या सर्वात महत्त्वपूर्ण प्रशिक्षणात सहभाग घेत आहात.
३० या तरुण लोकांना प्रशिक्षण देण्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण कामाबद्दल मंडळीतील सर्वांनी जागृत असावयास हवे. त्यांच्यासोबत क्षेत्र सेवेत काम करण्यास तुम्ही निश्चित योजना करता का? घरोघरच्या कार्याच्या तयारीसाठी त्यांच्यासोबत एखाद्या सादरतेचा सराव तुम्ही करता का? सेवेत एकत्र काम करताना, भावी आध्यात्मिक कार्यांबद्दल उत्तेजन देण्याच्या सधींबद्दल तुम्ही जागृत असता का? प्रत्येक प्रचारकाने हे लक्षात ठेवावे की, एक छोटेसे विवेचन देखील सर्वदा टिकणाऱ्या आध्यात्मिक ध्येयांबद्दल सकारात्मक विचार निर्माण करू शकते. ते तरुण व्यक्तीच्या अनंतकाळाच्या लाभाचे ठरेल.
३१ तरुण लोक स्वतःला मदत करू शकतात: युवकांनो, यहोवाच्या शिकवणींचे अनुसरण करून जगातील गोष्टींना नकार देण्यासाठी, आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो. तुमच्या वर्तणूकीचे आणि अंतर्भावनांचे परीक्षण करून स्वतःची नियमितपणे परीक्षा करा. यहोवाबद्दल आणि तुमच्या दररोजच्या जीवनातून तो काय अपेक्षितो याबद्दल तुमची मनोवृत्ती काय आहे? सैतानाच्या कल्पनांच्या प्रभावाविरुद्ध तुम्ही अधिक परीश्रम घेऊन लढा देत आहात का? (१ तीम. ६:१२) मानवांना, खासकरुन तरुणांना, त्यांच्या सोबत्यांची स्वीकृती मिळवण्याची स्वाभाविक इच्छा असते, तेव्हा वाईट करण्यात इतर लोकांना अनुसरण्यासाठी तुम्ही भुलवले जाता का? (निर्ग. २३:२) जगाच्या मार्गांच्या अनुरुप होण्यात मोठा दबाव आहे हे प्रेषित पौलाला समजले होते.—रोमकर ७:२१-२३.
३२ जगाच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यात, जगिक सोबत्यांना सोडून वेगळा मार्ग अनुसरण्यासाठी आणि देवाच्या शिकवणींना ऐकण्यासाठी धैर्याची गरज आहे. प्राचीन काळातील लोकांनी ते, बऱ्याच यशस्वीपणे केले. नोहाच्या धिटाईचा विचार करा. त्याच्या विश्वासाद्वारे आणि त्याच्या काळातील दुष्टांपासून वेगळे राहून त्याने संपूर्ण जगाचा धिक्कार केला. (इब्री. ११:७) परिश्रम घेऊन लढा द्या, कारण त्या प्रयत्नांचे मोल आहे. सैतानाच्या गटाला अनुसरणाऱ्या दुर्बळ, भेकड व भिणाऱ्यांचे अनुकरण करू नका. त्याउलट, यहोवाला आवडणाऱ्यांच्या संगतीचा शोध घ्या. (फिली. ३:१७) देवाच्या अभिवचन दिलेल्या नवीन जगात तुमच्या सोबत चालतील, अशांशी सहवास ठेवा. (फिली. १:२७) सार्वकालिक जीवनाप्रत निरवणारा एकच मार्ग आहे हे लक्षात ठेवा.—मत्त. ७:१३, १४.
३३ देवाला स्तुती व सन्मान आणणाऱ्या युवकांना पाहताना आम्हाला आनंद होतो, तेव्हा त्याला याचा किती आनंद होत असेल! यहोवाच्या भव्य उद्देशांबद्दल सांगण्यात तरुण लोकांचा पूर्ण भाग आहे हे पाहताना तो उल्लासतो, यात काही शंका नाही. ते त्याची “संतती” आहेत, आणि त्यांच्यासाठी तो केवळ उत्तम ते इच्छितो. (स्तोत्र. १२७:३-५; १२८:३-६) पित्याची आवड प्रतिबिंबित करून ख्रिस्त येशूला, तरुण मुलांशी संगती ठेवण्यात पुष्कळ आनंद मिळाला आणि यहोवाला भक्ती देण्यात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याने वेळ काढला. त्याने त्यांच्यासाठी स्नेहभाव दाखवला. (मार्क ९:३६, ३७; १०:१३-१६) यहोवा आणि खिस्त येशू ज्याप्रमाणे पाहतात त्याचप्रमाणे आम्ही आमच्या तरुणांकडे पाहतो का? त्यांच्या निष्ठेबद्दल आणि चांगल्या उदाहरणाबद्दल यहोवा आणि देवदूत कोणता दृष्टिकोन ठेवतात याबद्दल आपल्या तरुण लोकांना माहीत आहे का? आध्यात्मिक ध्येयांना गाठण्याद्वारे यहोवाला आनंदित केल्याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा केली पाहिजे आणि उत्तेजन दिले पाहिजे. युवकांनो, तुम्हाला आता आणि भवितव्यात आशीर्वादीत करतील अशा ध्येयांचा पाठलाग करा.