आजच्या जगामध्ये पवित्र शास्त्राचे महत्त्व
१ पुष्कळ जण पवित्र शास्त्राला अप्रचलित आणि काल्पनिक अशा दृष्टिकोनातून पाहतात. ते सर्वात मोठ्या प्रमाणावर वितरीत झालेले आणि इतिहासातील सर्वात अधिक भाषांतर केलेले पुस्तक असले तरी, सापेक्षतः फारच कमी लोक त्याचे वाचन करतात, आणि त्याहूनही कमी जण त्याच्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात.
२ परंतु त्याउलट, आम्ही पवित्र शास्त्राला देवाचे वचन या नात्याने महत्त्व देतो. वास्तविकता दर्शवतात की, ते ऐतिहासिकरित्या सत्य आहे. त्याहून अधिक म्हणजे, त्याची उल्लेखनीय सुसंगतता, त्याचे भविष्यवाद, त्याची सुज्ञता, आणि लोकांच्या जीवनात लाभदायक परिणाम घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती, या सर्व गोष्टी पवित्र शास्त्र “परमेश्वरप्रेरित” असल्याचे दर्शवतात. (२ तीम. ३:१६) आमच्या वैयक्तिक अनुभवाने आणि या सुंदर दानाबद्दल आपल्या कृतज्ञतेने, इतरांनी याच्या खऱ्या मूल्याचे परीक्षण करावे म्हणून उत्तेजन देण्यासाठी, आपणाला प्रवृत्त केले पाहिजे.
३ एक प्रस्ताव असा असू शकतो:
▪“मानवजाती पुढे असलेल्या गंभीर समस्यांकडे पाहता, पुष्कळ लोकांना देवावर विश्वास ठेवणे कठीण होते, किंवा आम्ही सामना करीत असलेल्या समस्यांना सोडवण्यास देवाच्या क्षमतेबद्दल ते शंका करतात. तुम्हाला त्याविषयी काय वाटते? [उत्तरास वाव द्या.] तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता या पत्रिकेच्या शिर्षकाकडे लक्ष द्या.” मुखपृष्ठावरील चित्राकडे लक्ष केंद्रित करा, मग पान २ वरील पहिला आणि दुसरा परिच्छेद वाचा. घरमालकाने आस्था प्रदर्शित केल्यास, तुम्ही दुसऱ्या परिच्छेदात उल्लेखलेल्या शास्त्रवचनांना वाचू शकता आणि त्यावर चर्चा करू शकता. आस्था चेतवण्यासाठी, प्रश्नाच्या रुपात कदाचित, एखाद्या उपशिर्षकाचा उपयोग करून— पत्रिकेवर पुढे आणखी विचार करण्यासाठी पुन्हा येण्याची व्यवस्था करा.
४ आणखी दुसरा प्रस्ताव काहीसा असा असू शकतो:
▪“जीवनातील समस्यांना तोंड देत असताना, मनुष्याला मार्गदर्शनाची गरज आहे याबद्दल तुम्ही सहमती दाखवत नाही का? [उत्तरासाठी वाव द्या.] प्राचीन काळी, लोकांनी बहुधा पवित्र शास्त्राकडे मार्गदर्शनासाठी पाहिले, परंतु आता काळ बदलला आहे. पवित्र शास्त्राचे व्यावहारिक महत्त्व आहे असा विचार तुम्ही करता का? [उत्तरासाठी वाव द्या.] दुसरे तीमथ्य ३:१६ मध्ये काय म्हटले आहे त्याकडे लक्ष द्या. [वाचा.] देवाचे लिखित वचन केवळ सुज्ञ निर्णय घेण्यासाठीच मदत करीत नाही तर भविष्यासाठी एक विश्वसनीय आशा देखील पुरवते.” योहान १७:३ वाचा. घरमालकाने अनुकूलतेने प्रतिसाद दिल्यास, पवित्र शास्त्राचे व्यावहारिक महत्त्व दर्शवण्यासाठी, तुम्ही द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? या पुस्तकातून आधीच निवडलेल्या एक किंवा दोन विशिष्ट मुद्यांकडे अंगुली दर्शवू शकता.
५ रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ १० वर “पवित्र शास्त्र/देव” या उपशिर्षकाखाली दिलेल्या काही प्रस्तावनांचा उपयोग करणे तुम्हाला मदतदायी वाटेल. अधिक माहिती पृष्ठ ५८-६८ वर सादर करण्यात आली आहे जी, घरमालकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात किंवा त्यांच्या आक्षेपांवर मात करण्यास मदतदायी ठरतील.
६ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन सादर करणे: प्राथमिक भेटीत किंवा पुनर्भेटीच्या वेळी पुरेशा आस्थेला चालना देण्यात आली असेल तर, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे दिले जाऊ शकते. घरमालकाकडे पवित्र शास्त्राची एखादी प्रत आहे का आणि ते वाचण्यात त्याला सोपे जाते का याबद्दल तुम्ही विचारणा करू शकता. उत्तराला अनुसरून, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या काही मदतदायी वैशिष्ट्यांकडे लक्ष केंद्रित करा. रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठ २७६-८० वरील एक किंवा दोन मुद्यांना तुम्ही दाखवू शकता.
७ पवित्र शास्त्र वाचण्यासाठी लोकांना उत्तेजन देण्याच्या, संधींबद्दल दक्ष असा. देवाच्या लिखित वचनाबद्दल आदर आणि प्रेम उभारण्यास आस्थेवाईक लोकांची मदत करा. व्यक्तिगत जीवनात त्याच्या तत्त्वांचे अवलंब केल्याने आणि सत्याबद्दलचे अचूक ज्ञान मिळवल्याने, त्यांना आता तसेच भवितव्यात पुष्कळ आशीर्वाद प्राप्त होतील.—स्तोत्र. ११९:१०५.