वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९३ पृ. ८
  • खरे मार्गदर्शन पुरवणारे पुस्तक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरे मार्गदर्शन पुरवणारे पुस्तक
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या पहिल्या भेटीतच पाया घालणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आजच्या जगामध्ये पवित्र शास्त्राचे महत्त्व
    आमची राज्य सेवा—१९९३
  • बायबल—सर्व लोकांसाठी देवाचे मार्गदर्शक
    आमची राज्य सेवा—१९९७
  • अगाध संपत्तीची ओळख होण्यास इतरांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ११/९३ पृ. ८

खरे मार्गदर्शन पुरवणारे पुस्तक

१ गेल्या शतकात जग, नाट्यमयरितीने बदलले आहे. दळणवळण, औषध आणि वाहतुकीच्या क्षेत्रांमध्ये पुष्कळ प्रगती झाली असली तरी, कौटुंबिक जीवनाचा दर्जा सातत्याने खालावला आहे. मानवांच्या सतत बदलत्या तत्त्वज्ञानाने स्वतःस मार्गदर्शित होण्यासाठी लाखोंनी अनुमती दिली आहे.

२ या जगाचे बाह्‍य स्वरुप अधिककरुन लयास जात असताना, यहोवाच्या वचनाचे पालन केल्याने त्याच्या लोकांना मोठा फायदा प्राप्त झाला आहे. पवित्र शास्त्र हजारो वर्षांपासून बदललेले नाही, आणि आज सामना कराव्या लागणाऱ्‍या समस्यांशी यशस्वीपणे लढा देण्यासाठी, त्याचा सल्ला आतासुद्धा अधिक व्यावहारिक आहे. आमच्या आधुनिक दिवसासाठी, पवित्र शास्त्र खरे मार्गदर्शन पुरवते याची आस्थेवाईक लोकांनी गुणग्राहकता बाळगावी म्हणून, आपण त्यांना कशाप्रकारे मदत देऊ शकतो?

३ प्राथमिक भेटीत, “तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता” ही पत्रिका सोडून गेल्यास, तुम्ही परत येऊन असे म्हणू शकता:

▪“पवित्र शास्त्र स्पष्टपणे म्हणते की ते स्वतः देवाकडील एक संदेश आहे आणि आम्ही पवित्र शास्त्र जे सांगते त्यावर विश्‍वास ठेवला व त्याप्रमाणे राहिलो तर ते आम्हासाठी अनंत जीवन सादर करते, तेव्हा या विधानांबद्दल अधिक माहिती घेणे फायदेकारक असेल असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी वाव द्या.] पवित्र शास्त्र सध्याच्या व्यवस्थीकरणाबद्दल काय भविष्यवाद करते त्याकडे लक्ष द्या. [पत्रिकेच्या पृष्ठ ५ वरून थेटपणे २ तीमथ्य ३:१-५ वाचा.] हे वर्णन आजच्या जगाशी बरोबर जुळते असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी वाव द्या.] भविष्यामध्ये चांगल्या परिस्थितीबद्दल अपेक्षा करण्यासाठी योग्य कारण आहे का?” यानंतर, पत्रिकेतील शेवटल्या दोन परिच्छेदांची चर्चा करुन किंवा द बायबल—गॉड्‌स वर्ड ऑर मॅन्स्‌? या पुस्तकाच्या पृष्ठ १६१ चा उपयोग करुन मनुष्यजातीसाठी पवित्र शास्त्र जी सुंदर आशा देते ती दाखवून, तुम्ही आणखी एका भेटीसाठी पाया घालू शकता.

४ घरमालकाला पवित्र शास्त्राच्या व्यावहारिक महत्त्वामध्ये आस्था वाटली आणि “द बायबल—गॉड्‌स वर्ड ऑर मन्स्‌? पुस्तकाच्या १२ व्या अध्यायातील विशिष्ट तत्त्वांकडे निर्देश केला तर, तुम्ही असे म्हणू शकता:

▪“आज आमच्यासाठी व्यावहारिक असणाऱ्‍या गोष्टींमध्ये आम्ही आस्था दाखवतो, नाही का? युद्धाचा अंत करणे एक व्यावहारिक गोष्ट आहे याच्याशी तुम्ही सहमत आहात का? [उत्तरासाठी वाव द्या.] इतर राष्ट्रांशी शांतीने एकत्र राहण्यासाठी लोकांनी शिकले, तर ती एक चांगली सुरवात असेल, नाही का? [उत्तरासाठी वाव द्या.] पवित्र शास्त्राने अगदी तेच भाकीत केले आहे. [यशया २:२, ३ वाचा.] हे कधी आणि कसे होईल याबद्दल तुम्ही कधी विचार केलात का?” घरमालकाच्या सोईच्या वेळी तुम्ही या प्रश्‍नाबद्दल त्याच्यासोबत अधिक चर्चा करू इच्छिता याचे स्पष्टीकरण द्या.

५ तुम्ही “न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन” दिले असल्यास, पुन्हा भेट देऊन तुम्ही असे म्हणू शकता:

▪“तुम्हाला दिलेले पवित्र शास्त्र वाचत असताना, देवाच्या व्यक्‍तिगत नावाचा ते वापर करते हे तुमच्या लक्षात आले असेल. पुष्कळ इतर पवित्र शास्त्राच्या भाषांतरांपेक्षा ही एक महत्त्वपूर्ण सुधारणूक आहे. काहीजण, यहोवाच्या व्यक्‍तिगत नावाचा उपयोग करण्यात टाळाटाळ करीत असले तरी, त्याने त्याचे नाव बऱ्‍याच आधी प्रकट केले होते आणि तो खरा व जिवंत देव आहे हे ओळखण्यासाठी त्याचा उपयोग करावा म्हणून त्याच्या सेवकांना उत्तेजन दिले होते हे आम्ही लक्षात ठेवावे. स्तोत्रकर्त्याने स्तोत्रसंहिता ८३:१८ मध्ये काय लिहिले होते याकडे लक्ष द्या.” शास्त्रवचन वाचा आणि घरमालकाला विवेचन मांडण्यास वाव द्या. दाखवलेल्या आस्थेप्रमाणे, रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठ १९१ च्या सुरवातीला “यहोवा,” या उपशिर्षकाखाली मिळालेल्या अधिक माहितीचा तुम्ही उपयोग करू शकता.

६ मनुष्याला आवश्‍यक ते मार्गदर्शन केवळ पवित्र शास्त्र पुरवू शकते. (यिर्म. १०:२३) देवाच्या उद्देशांबद्दल शिकण्यासाठी आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी त्याच्या वचनाचा अभ्यास करणे हाच एकमेव मार्ग आहे. यास्तव, त्याच्या सुज्ञ उपदेशातून आणि व्यावहारिक सल्ल्यामधून लाभ मिळवण्यासाठी आपण इतरांना उत्सुकतेने आमंत्रण देऊ या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा