तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोंचा
१ तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याने, तो शिकत असलेल्या गोष्टींप्रमाणे कार्य करावे, असे तुम्हाला वाटते का? प्राप्त करत असलेल्या ज्ञानाचा लाभ करून घ्यावयाचा असल्यास, त्याने तसे करावे. तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, तुम्हाला त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोंचण्याची गरज आहे. इ.स. ३३च्या पेंटेकॉस्ट रोजी, प्रेषित पेत्राच्या उत्तेजक भाषणामुळे “ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला,” अशा जवळजवळ ३,००० व्यक्तींच्या “अंतःकरणास चुटपुट लागली” आणि त्या दिवशी त्यांचा बाप्तिस्मा झाला. (प्रे. कृत्ये २:३७, ४१) तुमच्या, पवित्र शास्त्र विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत तुम्ही कसे पोहोंचू शकाल?
२ सूक्ष्म तयारी: विद्यार्थ्यासोबत माहितीबद्दल युक्तिवाद करण्यासाठी अल्प वेळ राहील, एवढे साहित्य हाताळू नका. तुम्ही ठळकपणे सांगणाऱ्या मुद्यांना आधीच ठरवून ठेवा, आणि तुम्ही समजू शकता तसेच शास्त्रवचने प्रभावीपणे लागू करू शकाल, याबद्दल निश्चित असा. विद्यार्थ्याच्या पार्श्वभूमीमुळे त्याच्या मनात येणाऱ्या प्रश्नांवर आधीच विचार करा. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याशी चांगल्यारितीने परिचित असाल तर, त्याच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या माहितीच्या तयारीत असण्यासाठी, हे ज्ञान तुम्हाला मदत करील.
३ येशूच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीचे अनुकरण करा: कठीण मुद्यांना सोपे बनवण्यासाठी आणि परिस्थितीचा अर्थ समजण्यासाठी व भावनेची जाणीव होण्यासाठी, येशूने दाखल्यांचा उपयोग केला. (लूक १०:२९-३७) त्याचप्रमाणे, जीवनातील सामान्य गोष्टींचे दाखले घेऊन, आहेत तसेच सोपे ठेवून आणि खासकरून विद्यार्थ्याच्या परिस्थितीशी त्यांना लागू करून, तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याच्या अंतःकरणावर उत्तम शिक्षणाची छाप पाडू शकता.
४ येशूने अनेकदा दर्शवल्याप्रमाणे, ही प्रश्ने, पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोंचण्यासाठी विशेषकरून मदतदायी आहेत. (लूक १०:३६) परंतु, विद्यार्थी केवळ पुस्तकातून उत्तर वाचून दाखवत असेल, तर तेवढ्यावरच समाधान करून घेऊ नका. त्याने आधी विचारात घेतले नसेल अशा, निर्णयावर त्याचे मन केंद्रीत करण्यासाठी सूचक प्रश्ने विचारा. ही पद्धत विद्यार्थ्याची विचार क्षमता वाढवण्यास देखील मदत करते. एका विषयाबद्दल व्यक्तिगतपणे त्याचा काय विश्वास आहे, हे जाणून घेण्यासाठी दृष्टिकोनात्मक प्रश्ने विचारा. यामुळे, मदतीची आवश्यकता असणाऱ्या क्षेत्रांना तुम्ही ओळखाल आणि त्याप्रमाणे खास साहाय्य देऊ शकाल.
५ एखादा पवित्र शास्त्र विद्यार्थी प्रगती करत नसेल, तर तुम्हाला त्याची कारणे काढून घेणे आवश्यक आहे. यामध्ये, नियमित अभ्यासाच्या वेळेऐवजी, दुसऱ्या वेळेला भेट देणे गोवलेले असेल. कार्य करण्यास तो कां कूं का करतो? त्याला न समजणारा एखादा शास्त्रीय मुद्दा आहे का? त्याच्या जीवन पद्धतीत काही बदल करण्यास तो इच्छित नाही का? एखादा पवित्र शास्त्र विद्यार्थी ‘दोहो मतांमध्ये लटपटत’ असेल तर, तसे करण्याच्या धोक्याबद्दल जाणीव करून घेण्यास त्याला साहाय्य करा.—१ राजे १८:२१.
६ आस्थेवाईक व्यक्तींना पवित्र शास्त्र सत्य शिकवणे एक जीवन वाचवणारे कार्य आहे, हे प्रेषित पौलाने ओळखले. यास्तव, त्याने सर्व ख्रिश्चनांना ‘त्यांच्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवण्यास’ सल्ला दिला. (१ तीम. ४:१६) तुम्ही ज्यांच्यासोबत पवित्र शास्त्राभ्यास करत आहात, त्यांनी केवळ पवित्र शास्त्राविषयी आणि जगिक घटनांच्या वास्तविकता जाणून घेण्याव्यतिरिक्त अधिक जाणून घेतले पाहिजे. त्यांनी यहोवा आणि येशू यांच्याविषयी अचूक ज्ञान मिळवले पाहिजे आणि त्याद्वारे त्यांच्यासोबत ऊबदार व्यक्तिगत नातेसंबंध वाढवण्यात मदत मिळवली पाहिजे. असे केल्यानेच कार्यांद्वारे ते त्यांचा विश्वास दाखवण्यासाठी प्रवृत्त होतील. (याको. २:१७, २१, २२) विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोंचल्यावर, तो यहोवाला सन्मानित करणाऱ्या मार्गाचा अवलंब करण्यास प्रवृत्त होईल आणि त्याचे स्वतःचे जीवन वाचवेल.—नीती. २:२०-२२.