स्मारक विधीसाठी त्यांचे स्वागत आहे असे त्यांना वाटू द्या
१ मागील काही वर्षात, स्मारक विधीच्या उपस्थितीतील ३ पैकी केवळ एकच जण सुवार्तेचा प्रचारक होता. त्याचप्रमाणे, हेच ह्या वर्षी देखील खरे असेल. काही जण, एखाद्या नातलगाने किंवा दुसऱ्या शहरात राहणाऱ्या परिचित व्यक्तीने गळ घातल्यामुळे उपस्थित राहतील, तर इतरांना स्थानिक प्रचारकांकडून आमंत्रण मिळाले असेल. त्याशिवाय उपस्थित राहणाऱ्यातील इतर, बाप्तिस्मा घेतलेले असले तरी, आता सेवाकार्यात सक्रिय नसतील. “माझ्या स्मरणार्थ हे करा,” या येशूने दिलेल्या आज्ञेचा आदर करणाऱ्या सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो.—१ करिं. ११:२४; रोम. १५:७.
२ नेमलेल्या सेवकांनी राज्य सभागृहात येणाऱ्या सर्वांचे, विशेषकरून नवोदितांचे स्वागत करण्यास दक्ष असावे. तथापि, आम्ही सर्वजण, स्मारक विधीच्या वेळी, आदरातिथ्य करण्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. (रोम. १२:१३) ते कसे बरे?
३ त्या सायंकाळी, काही प्रचारक आस्थेवाईक लोकांची जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यामध्ये खूपच मग्न असतील. इतरांना, लवकर येण्यास आणि स्वतःहून आलेल्या नवोदितांचे स्वागत करण्यास शक्य असेल. एखादा अनोळखी राज्य सभागृहात प्रवेश करतो तेव्हा, त्याला स्नेहपूर्णतेने अभिवादन करा आणि संभाषण सुरू करा. तो कोणा स्थानिक बांधवांना जाणतो का ते विचारा. तसे असल्यास, तो बांधव येईपर्यंत त्याची काळजी घ्या. (पडताळा लूक १०:३५.) तो व्यक्तिगतपणे कोणास जाणत नसेल तर, सभेमध्ये त्याला तुम्हासोबत बसण्यास आमंत्रण का देऊ नये? द्राक्षारस आणि भाकर यांचा कार्यक्रमात कसा उपयोग केला जाईल हे समजावून सांगा. वक्त्याने अवतरीत केलेली शास्त्रवचने काढून पाहण्यास त्याला तुमच्या मदतीची गरज असेल.
४ स्मारक विधी संपल्यावर, तो आल्याबद्दल तुम्हाला आनंद झाला हे त्यास सांगा. त्याला आमच्या कार्याविषयी काही प्रश्न असतील, ज्यांची उत्तरे तुम्ही देऊ शकता. तुम्ही वैयक्तिक आस्था दाखवल्यामुळे, राज्य सभागृहातच किंवा इतर ठिकाणी, एखाद्या पवित्र शास्त्रीय विषयाची चर्चा करण्याकडे ते निरवू शकेल. असा स्तुत्य पुढाकार घेणाऱ्या दक्ष बांधवांनी, काही उत्तम अभ्यास सुरू केले आहेत. ती अनोळखी व्यक्ती, राज्य सभागृह सोडून जाण्याआधी, इतरांशी तिचा परिचय करून द्या, आणि तिला पुन्हा येण्याचे स्नेहपूर्ण आमंत्रण द्या.
५ आम्ही, सभांना नियमितपणे उपस्थित न राहणाऱ्या किंवा सेवाकार्यात काही काळासाठी निष्क्रिय झालेल्या आमच्या प्रिय बंधू व बहिणींचे स्वागत करण्यास किती आनंदित आहोत! ते सभांना का उपस्थित राहात नाहीत असे प्रश्न विचारण्यापेक्षा, ते उपस्थित असल्यामुळे तुम्हाला जो आनंद झाला आहे तो व्यक्त करा. कदाचित, स्मारक विधीच्या भाषणात ऐकलेली एखादी गोष्ट, त्यांना यहोवाबरोबरच्या त्यांच्या समर्पित नातेसंबंधाचे मूल्य पुन्हा ओळखण्यास प्रवृत्त करील. आम्ही केलेले स्नेहपूर्ण स्वागत आणि दाखवलेली खरी चिंता त्यांच्या हृदयास भिडेल. त्यांना हे जाणवू द्या की, त्यांना पुन्हा पाहण्याची तुम्ही आनंदाने वाट बघत आहात.—रोम. १:११, १२.
६ पुष्कळ मंडळ्यांमध्ये एप्रिल १० रोजी, एक खास जाहीर भाषण देण्यात येईल ज्याचा विषय, “खरा धर्म मानवी समाजाच्या गरजा पूर्ण करतो,” हा असेल. स्मारक विधीच्या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना, आमंत्रण दिल्याची आणि उपस्थित राहण्यास मदत देण्याची खात्री करा. आमची ही आशा आहे की, या खास सभांच्या उपस्थितांना स्वागत केल्यासारखे वाटेल आणि यहोवाच्या लोकांमधील संगतीच्या उबदार आत्म्याचा अनुभव येईल.—स्तोत्र. १३३:१.