तुम्ही एप्रिलमध्ये यहोवाची स्तुती अधिक वाढवू शकता का?
१ स्तोत्रकर्त्या दाविदाला स्वीकृतपणे यहोवाची स्तुती करण्याची मनःपूर्वक इच्छा होती, आणि म्हणून त्याने घोषित केले: “मी आपल्या तोंडाने परमेश्वराचे [यहोवा, NW] पुष्कळ उपकारस्मरण करीन, लोकसमुदायात त्याला स्तवीन.” (स्तोत्र. १०९:३०) क्षेत्र सेवेत आमचा सहभाग वाढवून ‘त्याचे स्तवन अधिकाधिक’ करण्यासाठी एप्रिल हा उत्तम समय आहे. (स्तोत्र. ७१:१४) तुम्ही साहाय्यक पायनियरींग करून, असे करणाऱ्या पुष्कळांपैकी एक होण्याची योजना करत आहात का?
२ आता योजना करा: “उद्योगाचे विचार समृद्धी करणारे असतात,” अशी आम्हाला नीतीसूत्रे २१:५ मध्ये आठवण करून देण्यात येते. यासाठी ही बाब प्रार्थनेत यहोवासमोर मांडण्याची व त्याला तुमच्या योजनांमध्ये प्रथम ठेवण्याची गरज आहे. (नीती. ३:५, ६) पुढे, तुमच्या चालू आराखड्याची छाननी करा, की जेणेकरून, सेवाकार्यात दिवसा सरासरीने दोन तास खर्च करण्यासाठी कोठे बदल करता येतील हे ठरवले जाऊ शकते. तुम्ही इतर कार्यातून वेळ ‘साधल्यामुळे’ प्रचार कार्याला अधिक वेळ देण्यासाठी तुम्हाला वाव मिळेल.—इफि. ५:१६, पं. रमाबाई भाषांतर.
३ दळणवळण ठेवा आणि सहकार्य द्या: प्रेषित पौलाने अशा काही विशिष्ट जणांबद्दल भाष्य केले जे त्याला त्याची सेवा पूर्ण करण्यास “सांत्वन” देणारे असे होते. (कलस्सै. ४:११) एप्रिलमध्ये साहाय्यक पायनियर म्हणून नाव नोंदवणाऱ्या इतरांशी तुमच्या योजनांची चर्चा करा. त्यांच्या सहकार्यामुळे व सोबतीमुळे एकमेकांसाठी आध्यात्मिक लाभ मिळतील. तुम्हाला सेवेच्या व्यवस्थेबद्दल किंवा कार्य करणाऱ्या क्षेत्राविषयी काही प्रश्न असतील तर, सेवा पर्यवेक्षक तुमची मदत करू शकतील.
४ कुटुंबाकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याने वैयक्तिक सदस्यांना साहाय्यक पायनियरींग करण्यास मदत मिळेल. घरातील कामांची पुन्हा तात्पुरती वाटणी करावी लागेल. ही कामे हाताळण्यासाठी जो आराखडा आहे त्यात देखील बदल करण्याची गरज भासेल. या गरजांची चर्चा करण्यासाठी कौटुंबिक बैठक तुमचा हेतू साध्य करण्यास मदतदायी ठरेल. चांगले दळणवळण आणि सहकार्य हे यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
५ सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: काही असमाधानकारक परिस्थितींमुळे साहाय्यक पायनियरींग करणे शक्य नसल्याचा घाईघाईने विचार करू नका. शाळेतील तरुण लोक, सेवानिवृत्त झालेले लोक, मुले असलेले पालक, पूर्ण-वेळ काम करणारे कुटुंब प्रमुख, अशा सर्वांना एप्रिलमध्ये साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी त्याग करावयास शक्य झाले आहे व तो त्यांनी अगदी आनंदाने पत्करला. ते स्तोत्रकर्त्याशी सहमत आहेत की, “सरळ माणसांना स्तुतीगान शोभते,” आणि त्यांनी सेवाकार्यात ६० तास खर्च करण्यास लागणाऱ्या जादा परिश्रमाला, खूपच महाग असल्याचे समजले नाही. (स्तोत्र. ३३:१) तुम्हाला नाव नोंदवण्यास अशक्य असेल तर मग, मंडळीचा प्रचारक या नात्याने तुमचे कार्य अधिक वाढवण्याच्या आनंदात सहभाग का घेऊ नये बरे?
६ पुष्कळांसाठी, एप्रिलमधील साहाय्यक पायनियरींग ही नियमित पायनियरींगकरता प्रगतीची पायरी बनली आहे. त्यांचे कार्य अधिक वाढवल्याने, नियमित पायनियरींग कार्यात केलेले स्थित्यंतर जास्त सोपे असल्याचे त्यांना वाटले आहे.
७ होय, हा हंगामच एप्रिलमध्ये अधिक ईश्वरशासित कार्य करण्यासाठी अनुकूल आहे. दिवस मोठा असल्यामुळे, सकाळी तसेच संध्याकाळी अधिक साक्षकार्य करण्यासाठी मुभा मिळते. आम्ही आमचा देव यहोवा याच्या स्तुतीसाठी होईल ते सर्व करण्यास इच्छितो. एप्रिलमध्ये साहाय्यक पायनियरींग केल्याने, त्याच्या अपात्रित कृपेद्वारे आम्हासाठी केलेल्या पुष्कळ कृतींबद्दल गुणग्राहकता दाखवण्यास आम्हाला उत्तम मार्ग आहे.