वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९६ पृ. ८
  • सूक्ष्मदृष्टीने प्रचार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सूक्ष्मदृष्टीने प्रचार करा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • देवाकडील ज्ञान अनेक प्रश्‍नांची उत्तरे देते
    आमची राज्य सेवा—१९९७
  • खरी शांती व सुरक्षितता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • बायबल काय शिकवते पुस्तक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००६
  • जगव्याप्त निर्भयता जवळ आली आहे हे सर्वांना कळू द्या
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km १/९६ पृ. ८

सूक्ष्मदृष्टीने प्रचार करा

१ सूक्ष्मदृष्टी असण्यासाठी आपण ज्या लोकांना प्रचार करतो त्यांच्याविषयी काही समजून घेण्याची गरज आहे. का बरे? कारण लोकांना अपीलकारक वाटेल अशा पद्धतीने राज्य संदेश सादर करण्याच्या आपल्या क्षमतेवर त्यांच्या अंतःकरणांप्रत पोहंचण्यामधील यश अवलंबून आहे. जानेवारी महिन्यात, मंडळीजवळ अद्याप साठा असलेली विविध बायबल अभ्यासाची पुस्तके आपण सादर करणार आहोत. नाहीतर, प्रचारक तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक तेलगू भाषेशिवाय खास दरात सादर करावयाचे नसले, तरी त्याचा उपयोग करू शकतात. पुढील सूचना मदतदायक असतील.

२ “तुम्हास आनंदी बनवील अशी सुवार्ता” हे पुस्तक सादर करण्यास तुम्ही निवडले, तर पृष्ठ ४ वरील चित्राचा संदर्भ देऊन असे म्हणू शकता:

▪ “बायबल, पृथ्वीबद्दल देवाच्या उद्देशाविषयी काय शिकवते याबाबत कलाकाराच्या कल्पनेचे हे एक चित्र आहे. परादीसमय पृथ्वीवर राहण्यासाठी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कशाची आवश्‍यकता असेल असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] खरी शांती व सुरक्षितता लवकरच सबंध जगभरात एक वास्तविकता होईल व परादीसचे पुनर्स्थापन केले जाईल हे बायबल दाखवते. [स्तोत्र ३७:१०, ११ वाचा.] देव जे काही करील त्यातून लाभ मिळवण्याकरता तुम्ही काय केले पाहिजे ते तुम्हाला हे पुस्तक दाखवील. तुम्हाला एक प्रत देण्यास मला आवडेल.” त्यानंतर, खास दरात सादर केल्या जाणाऱ्‍या इतर पुस्तकासोबत ते पुस्तक सादर करा.

३ “सद्य जीवन हेच सर्वकाही आहे का?” हे पुस्तक तुम्ही सादर केल्यास, असे काही म्हणू शकता:

▪ “जगभरात, लाखो लोक आनंदासाठी आसुसलेले आहेत, व त्यास प्राप्त करण्याच्या त्यांच्या सर्वंकश प्रयत्नांनंतरही तो त्यांना जणू चकवत आहे. केवळ काही वर्षे जगणे, मुलांचे संगोपन करणे आणि मृत्यू ओढवूपर्यंत सर्वात उत्तम गोष्टींची अपेक्षा करत राहणे या दृष्टीने अनेकजण जीवनाकडे पाहतात.” मग, पृष्ठ १४५ वरील २ ते ५ परिच्छेदांमधील काही विचारांची सहभागिता करा, स्तोत्र ३७:११ वाचा, आणि पृष्ठ १४२ वर वर्णिल्याप्रमाणे नवीन जग, परादीस निर्माण करण्याचा देवाचा उद्देश आहे हे संक्षिप्त रूपात दाखवा. “त्या भवितव्याविषयी तुम्हाला कसे वाटते?” असा प्रश्‍न विचारून घरमालकाला त्याची विवेचने विचारा. प्रतिसादासाठी वाव द्या आणि ८.०० रुपयांसाठी केवळ तेच पुस्तक किंवा दुसऱ्‍या जुन्या पुस्तकांसह त्यास १६.०० रुपयांच्या अनुदानात सादर करा.

४ घरमालकाला बायबल ज्ञानाची पार्श्‍वभूमी असल्यास, तुम्ही “तुझे राज्य येवो,” हे पुस्तक वापरू शकता व सुरवातीला निरसन न झालेल्या एखाद्या सामाजिक समस्येच्या चालू वृत्ताविषयी सांगून नंतर असे विचारू शकता:

▪ “जगातील नेते एखाद्या दिवशी ही समस्या सोडवू शकतील असे तुम्हाला वाटते का? [घरमालकाच्या प्रतिसादासाठी वाव द्या आणि त्याबद्दल मान्यता दाखवा.] ही समस्या अस्तित्वात नसेल अशा जगात राहण्यास आपल्यापैकी सर्वांना आवडेल. आपण ज्यासाठी प्रार्थना करतो त्या देवाच्या सरकाराच्या अधिपत्याखाली ती एक वास्तविकता असेल.” शेवटी शांती व सुरक्षिततेची पूर्तता कशा प्रकारे होईल हे दाखवण्यासाठी यशया ३२:१७, १८ वाचा. तसेच पृष्ठ ५ वर सुरू होणारा पहिला परिच्छेद वाचा, आणि देव पृथ्वीसंबंधी जे अभिवचन देतो ते नजीकच्या भवितव्यात पूर्ण केले जाईल यासाठी हे पुस्तक शास्त्रवचनीय पुरावा देते हे समजावून सांगा. केवळ हे पुस्तक किंवा उचित असल्यास, इतर पुस्तकासोबत ते सादर करा.

५ “तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे” हे पुस्तक वापरून तुम्हाला एक संक्षिप्त प्रस्तावना करावयास आवडली, तर पृष्ठ ४ काढून तुम्ही विचारू शकता:

▪ “आज कुटुंबाच्या मूल्यांवर जो हल्ला केला जात आहे त्यातून कौटुंबिक व्यवस्था बचावू शकते का?” घरमालकाचा प्रतिसाद मान्य करा, आणि नंतर पृष्ठ ५ वरील पहिला परिच्छेद वाचा. ते पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर करा. (तेलगू आवृत्ती ८.०० रुपयांच्या खास दरात सादर केली जाऊ शकते.)

६ चांगली सूक्ष्मदृष्टी, आपल्याला भेटणाऱ्‍या लोकांच्या गरजा आणि आवडी जाणून घेण्यास मदत करील. नीतिसूत्रे १६:२३ असे म्हणून याची खात्री पुरवते, “ज्ञानाच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा