इतरांच्या मनांत सार्वकालिक जीवनाची आशा रुजवा
१. वार्धक्य लांबणीवर टाकण्यासाठी आणि आपल्या आयुष्याची दोरी वाढविण्यासाठी मनुष्याने अनेकविध मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असला तरीही वार्धक्य आणि मृत्यू या दोन गोष्टी अद्यापही अटळ आहेत. मानव वृद्ध होतात आणि मरतात ते का तसेच कशाप्रकारे वार्धक्याचे दुष्परिणाम उलथून टाकली जातील आणि मृत्यू नाहीसा केला जाईल, या विषयांचे स्पष्टीकरण बायबल देत असल्यामुळे आपण किती आभारी आहोत! सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकात हे सत्य खात्रीलायकपणे सादर केलेले आहे. हे पुस्तक, जीवन-मृत्यूसंबंधी गुंतागुंतीच्या प्रश्नांची अगदी सुस्पष्ट उत्तरे देते आणि परादीसची पुनर्स्थापना केली जाईल त्या काळाकडे वाचकांचे लक्ष वेधते.
२ मार्चमध्ये आपण गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयानिशी ज्ञान पुस्तक सादर करणार आहोत. (मत्त. २८:१९, २०) मग राज्य संदेशाविषयी आस्था दाखवलेल्या सर्वांची आपण पुनर्भेट करू. अशा प्रकारे, आपण इतरांच्या मनांत सार्वकालिक जीवनाची आशा रुजवू. (तीत १:२) हे साध्य करण्यासाठी तुम्हाला पुढील सूचना उपयुक्त ठरतील.
३ पहिल्यांदाच भेट देताना तुम्ही कदाचित असा प्रश्न विचारू शकता:
◼ “लोक दीर्घायुष्याची आस का धरतात याचा तुम्ही कधी विचार केलात का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बौद्ध, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्वांनाच मृत्यूनंतरच्या जीवनाची आशा आहे.” ज्ञान पुस्तकातील अध्याय ६ उघडा जे म्हणते, “आपण वृद्ध होतो व मरतो ते का?” आणि मग परिच्छेद ३ वाचा. तेथे उल्लेखिलेल्या शास्त्रवचनांवर तर्क करा. परिच्छेदाच्या शेवटी दिलेल्या दोन प्रश्नांचा उल्लेख करताना घरमालकाला आपणहून त्याची उत्तरे शोधण्यास आवडेल का याविषयी त्याला विचारा. त्याची तशी इच्छा असल्यास पुढील काही परिच्छेदांवर चर्चा करणे जारी ठेवा. नकळत अभ्यासही सुरू झालाय! नाहीतर मग, स्वतःच वाचण्यासाठी त्याला पुस्तक सादर करा आणि शक्यतो एकदोन दिवसांतच उत्तरांची चर्चा करण्यासाठी पुन्हा भेट देण्याच्या योजना आखा.
४ जेथे “ज्ञान” पुस्तक दिले आहे तेथे पुन्हा भेट देताना तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “मागच्या वेळी मृत्यूविषयी आपण उपस्थित केलेल्या दोन प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मी पुन्हा आलो आहे.” घरमालकाला त्या प्रश्नांची आठवण करून द्या. मग अध्याय ६ मध्ये, “एक अनिष्टसूचक कट” या उपशीर्षकाखालील माहितीची चर्चा करा. परिस्थिती लक्षात घेऊन एकतर अभ्यास चालू ठेवा किंवा परिच्छेद ७ च्या शेवटास दिलेला प्रश्न विचारून पुढील सत्रासाठी एक पाया घाला. पुन्हा भेट देण्याच्या निश्चित योजना आखा. घरमालकाला एक हस्तपत्रिका द्या आणि मंडळीच्या सभा कशा हाताळल्या जातात याचे संक्षिप्त वर्णन करा. उपस्थित राहण्याचे हार्दिक आमंत्रण त्याला द्या.
५ घरोघरच्या किंवा अनौपचारिक साक्षीकार्यात तुम्ही कदाचित असे म्हणून आपले संभाषण सुरू करू शकता:
◼ “आपले आणि या पृथ्वीचे भविष्य काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] परादीस!—या एका शब्दात बायबल याचं उत्तर देतं. ते असं स्पष्टीकरण देतं, की सुरवातीला देवानं पृथ्वीच्या एका भागात एक नयनरम्य परादीस बनवलं जिथं त्यानं स्वतः निर्माण केलेल्या मानवी जोडप्याला ठेवलं. त्यांनी सबंध पृथ्वी व्यापून सरतेशेवटी परादीसमध्ये तिचं रूपांतर करायचं होतं. तेव्हाचं ते परादीस कसं असेल याविषयीचं हे वर्णन पाहा.” ज्ञान पुस्तकात पृष्ठ ८ उघडा आणि “परादीसमधील जीवन” या उपशीर्षकाखालील परिच्छेद ९ वाचा. मग परिच्छेद १० मध्ये दिलेल्या मुद्द्यांची चर्चा करून यशया ५५:१०, ११ हे उल्लेखिलेले शास्त्रवचन वाचा. पुनर्स्थापित परादीसमधील जीवन कसं असेल यावर चर्चा चालू ठेवण्याचा आणि परिच्छेद ११-१६ विचारात घेण्याचा प्रस्ताव मांडा. किंवा मग, त्या व्यक्तीला स्वतःच ते वाचण्याचे उत्तेजन द्या आणि पुन्हा भेट घेऊन त्यावर चर्चा करण्याची योजना आखा.
६ पहिल्याच भेटीत अभ्यास सुरू झाला नसल्यास पुढील भेटीत तो सुरू करण्याकरता तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
◼ “आपण मागच्या वेळी पाहिलं होतं त्याप्रमाणं देवाचा असा उद्देश आहे, की सबंध पृथ्वीचं रूपांतर परादीसमध्ये व्हावं. पण त्यामुळे आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की, ते परादीस कसं असेल?” ज्ञान पुस्तकात अध्याय १ उघडा आणि “पुनर्स्थापित परादीसमधील जीवन” या शीर्षकाखाली परिच्छेद ११-१६ चा अभ्यास करा. त्यानंतर, पृष्ठे ४-५ वरील चित्र दाखवा आणि अशा नयनरम्य परिसरांत राहण्यास त्याला आवडेल का याविषयी त्या व्यक्तीला विचारा. मग पृष्ठ १० वरील परिच्छेद १७ चे पहिले वाक्य वाचा. परिस्थिती विचारात घेऊन एकतर अभ्यास चालू ठेवा किंवा मग एखाद्या व्यक्तीला पुनर्स्थापित परादीसमध्ये राहायचे असल्यास तिने काय केले पाहिजे याचे स्पष्टीकरण देण्यास तुम्ही पुन्हा याल असे सांगा. सभांची माहिती देऊन एक हस्तपत्रिका द्या आणि राज्य सभागृहात उपस्थित राहण्याचे त्या व्यक्तीला हार्दिक आमंत्रण द्या.
७ देवाने प्रतिज्ञा केलेले “युगानुयुगाचे जीवन” इतरांना विदित करण्यात ज्ञान पुस्तक एक उत्कृष्ट साधन आहे. लोकांसोबत गृह बायबल अभ्यास संचालित केल्याने “सत्यप्रतिज्ञ देवाने” प्रेरित केलेली ही भव्य आशा तुम्ही त्यांच्या मनांत रुजवू शकाल.