प्रभावी प्रस्तावना
१ घरोघरच्या कार्यात सहभागी असताना आम्हासमोर सतत हा प्रश्न असतो की, “मी प्रथम काय बोलणार?” क्षेत्रकार्यात अनुभवी व वाकबगार प्रचारक अनेक साहाय्यक सूचना प्रस्तुत करतात. यापैकीच्या काही कोणत्या आहेत?
२ प्रथम, हे तितकेच महत्त्वाचे आहे की, ज्या लोकांशी आम्ही बोलणी करतो त्यांची खरी आपुलकी बाळगून असावे. ही आपुलकी आमच्या शब्दात व कृतीत दोहोत व्यक्त व्हावी. घरमालकाचा दृष्टीकोण विचारात घेणे हे महत्त्वाचे आहे. उचित प्रश्न विचारा व त्यांचे उत्तर काळजीपूर्वक ऐकून घ्या. आम्ही जो विषय संभाषणास घेतला आहे त्या योगे घरमालकास व्यक्तीगत फायदा कसा मिळतो आहे हे त्याला दाखवून देणे हा आमचा सर्वतोपरी प्रयत्न असावा. त्यांचा दृष्टीकोण विचारात घ्या
३ सुखार नामे नगराच्या विहीरीपाशी येशू एका शोमरोनी स्त्रीला साक्ष देत असता त्याने उद्गारलेले शब्द तिला अपरिचित वाटले. ते तिच्या विचारसरणीतील किंवा तिच्या भक्तीभावातील नव्हते. पण, येशूने तिचे लक्षपूर्वक ऐकून घेतले व उत्तर देताना तिने जे काही म्हटले होते त्याविषयीची विचारशीलता राखली. तो तिचे साहाय्य करू इच्छित होता. (योहान ४:१३, १४, १९-२६) आम्ही साक्षीकार्यात सहभागी होतो तेव्हा येशूच्या या उदाहरणाचा कित्ता गिरवतो का?
४ तुमच्या क्षेत्रभागावरील लोकांनी तुमचे प्रास्ताविक ऐकून घेतल्यावर असे म्हटले की, “मला माझा धर्म आहे,” तर अशावेळी तुम्ही काय कराल? पवित्र शास्त्र लेखकाने म्हटलेः “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.” तुम्ही तसे करता का? या वचनातील तत्त्व लक्षात ठेवून रिझनिंग पुस्तकातील १८-१९ पानांवर दिलेली माहिती तुम्ही कधी विचारात घेतली का? तुम्ही कदाचित अशा एखाद्या प्रचारकाच्या सोबतीत सेवा करू शकता, ज्याच्यापासून तुम्ही प्रस्तावना अधिक प्रभावी करण्यास शिकाल.
५ काही भागात जेथील लोक या आक्षेपाचा नेहमी उपयोग करतात व म्हणतात की, आम्हाला आमचा धर्म आहे, तेथे तुम्ही त्यांच्या म्हणण्याची जाण राखली व तोच विषय प्रथम सामोरा आणला तर कदाचित तुमचा फायदा होईल. उदाहरणार्थ, सुरवातीचे अभिवादन केल्यावर तुम्ही असे म्हणू शकताः ‘तुम्हाला स्वतःचा धर्म असेलच. [त्यांच्या उत्तराकडे लक्ष द्या.] मला वाटलेच की, या भागातील इतर लोकांप्रमाणे तुम्हालाही असेलच. तथापि, आज सकाळी आपली भेट घेण्यामागील कारण हे होते की, . . . ” मग ज्या विषयाची तुम्ही चर्चा करू इच्छिता ते सुरु करा.
६ “मी कामात आहे,” असे घरमालक तुम्हाला म्हणत असेल तर तुम्ही रिझनिंग पुस्तकाच्या पान १९-२० व सूचित केलेल्या कल्पनांपैकी एखादी वा कोणतीही निवडून तिला तुमच्या क्षेत्रभागात गरजेनुरुप जुळवून घेऊ शकता. यातील विविधता, साधारणपणे ज्या आक्षेपांची अपेक्षा असते त्याकरता वापरता येते.
रिझनिंग पुस्तकातील ओळख-प्रस्ताव वापरणे
७ रिझनिंग पुस्तकाच्या पान ९-१५ वर दिलेले ओळख-प्रस्ताव उपयोगात आणल्याने अनेकांना चांगले यश प्राप्त झाले आहे. आपल्या लक्षात येईल की, हे असे विषय आहेत ज्यांच्याबद्दल लोक सर्वसाधारणपणे विवंचनेत असतात; जसे की, अलिकडील घटना, व्यक्तीगत सुरक्षितता, नोकरी, घरे, कौटुंबिक जीवन आणि भवितव्य. याशिवाय याकडेही लक्ष द्या की, रिझनिंग पुस्तकाची शब्दरचना अशी आहे की, जी घरमालकास सुरवातीपासूनच बोलके करील. जो विषय दिलेला आहे त्याचे महत्त्व व तो त्याच्यावर व्यक्तीगत परिणाम करणारा आहे हे पाहण्यात साहाय्य करणारा दिसतो. या सर्व प्रस्तावनांचा आम्ही परिणामकारकपणे उपयोग केल्यास जे सर्वसाधारण आक्षेप आहेत ते घरमालक प्रस्तुत करण्याचे सहसा टाळील.
८ तुमच्या क्षेत्रभागात प्रभावी ठरतील असे तुम्हास वाटणाऱ्या प्रस्तावनांविषयी बारकाईने लक्ष द्या. रिझनिंग पुस्तकातील प्रस्तावना वापरात आणण्याचे शिका. इतर प्रचारकांच्या अनुभवांचे फायदे मिळवा. तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद यावेत म्हणून यहोवाकडे प्रार्थना करा. चांगले प्रयत्न आणि यहोवाचे आशीर्वाद यामुळेच कदाचित तुमच्या क्षेत्र भागातील अधिक लोक आपुलकीने तारणाच्या सुवार्तकडे लक्ष देतील.