मासिकांच्या उल्लेखनीय विषयांची प्रस्तुति
१ आनंदी भवितव्याचा लाभ हवासा वाटणाऱ्या सर्वांसाठी द वॉचटावर आणि अवेक! मासिकांच्या एप्रिल व मेच्या अंकात खास लेख देण्यात येतील. उदाहरणार्थ, द वॉचटावरच्या एप्रिल १ व एप्रिल १५ च्या अंकात “हु वील लिड मॅनकाइण्ड टू पीस?” व “वर्ल्ड पीस—व्हॉट वील इट रिअली मीन?” हे लेख असतील. (प्रांतिय भाषेतील मासिकात एप्रिल व मे अंकात “नवे जग जवळ आले आहे,” “नवीन जगातील नंदनवनाची पुनर्प्राप्ती” व “तुम्ही नवीन विचारांसाठी मोकळेपणा दर्शविता का?” हे विषय प्रकाशित होतील.)
२ अवेक! मासिकाच्या एप्रिल व मे अंकात “व्हॉट प्रॉस्पेक्ट्स् फॉर लाँगर लाईफ?,” “ए क्लीन अर्थ्—वील यू लिव टू सी इट?,” आणि “ए वर्ल्ड विदाऊट गन्स—इज इट पॉसिबल?” हे विषय असतील. (प्रांतिय भाषेत, “मूल्यांचे काय होत आहे?” व “पूर्ण नाश—तुम्ही का चिंता करावी?” हे विषय प्रसिद्ध होतील.) या अंकाचे वाचन तुमच्या क्षेत्रातील लोकांनी केले पाहिजे याविषयी तुमचे सहमत नाही का?
अधिक सहभाग
३ एप्रिल व मे मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या या खास अंकाचे वितरण करण्यात पूर्णपणे सहभागी होण्याची योजना आम्ही आत्ताच आखली पाहिजे. मग, मासिक वितरणात नेहमीपेक्षा अधिक वेळ खर्च करण्याची आयोजना आखण्यात सुरवात का करू नये? अशा समयोचित व विचारप्रवर्तक विषयांच्या मासिकांना आम्ही अधिक आत्मविश्वासाने व इर्षेने सादर करू शकतो.
४ आमच्या मासिकांचे वितरण करण्यात वाढ होण्यासाठी काय आमचे साहाय्य करील? याची सुरवात अशी की, ते मासिक हाती येताच आपण ते लक्षपूर्वक वाचावे. कारण मासिकांची जितकी अधिक ओळख आम्हाला होईल तितक्या अधिक इर्षेने ते आम्हाला सादर करता येईल. वाचन करताना, लोकांसमोर मांडता येतील असे चांगले मुद्दे आम्ही वेगवेगळ्या लेखातून हेरून ठेवावेत. प्रत्येक लेखात असे काय आहे जे कोणा विशिष्ट गटाच्या लोकांना अपील करणारे ठरेल? आम्ही स्वतःला विचारावेः ‘हे लेख खासपणे कोणत्या प्रकारच्या लोकांना आवडतील? आमच्या शेजाऱ्यांना, परिचितांना, व्यापाऱ्यांना, शाळकरी मुलांना आणि इतरांना काय आवडेल?’ यात खरेच कार्यक्षम असण्यासाठी आम्ही स्वतः या समयसूचक लेखांद्वारे प्राप्त झालेले ज्ञान व मिळालेला आनंद यावर आधारीत मासिकांची व्याक्तीगत शिफारस करण्यास हवी.
व्यक्तीगत ध्येय ठेवा
५ काही तर, एप्रिल व मे मध्ये मासिक वितरणाविषयीचे ध्येय ठेवू इच्छितील. तुमची तशी इच्छा आहे तर तुमची मासिकांची वाढीव मागणी आधीच करण्याची खात्री असू द्या. तुम्ही या दोन महिन्यात जर साहाय्यक पायनियरींग करण्याचे ध्येय ठेवले आहे तर हे आत्ताच निकडीने करा.
६ अर्थात, घरोघरच्या कार्याविरहित इतरही अनेक मार्गाने आम्ही मासिकांचे वितरण करू शकतो. आम्ही रस्त्यावरील साक्षीकार्यात तसेच व्यापार पेठेत ती सादर करू शकतो. अनेक बंधूंनी तर मासिक मार्ग सुरु केले आहेत. आस्थेवाईकांची परत भेट घेतेवेळी ताजा अंक तेथे देऊ शकता. अनौपचारिक साक्ष देणे हा एक साक्ष व मासिके देण्याचा उत्तम मार्ग आहे. काहीवेळा तर मासिकांचे लक्षवेधक मुखपृष्ठ दाखविणे हेच संभाषण सुरु करून त्यांचे वितरण करण्याचा मार्ग मोकळा करते.
७ आमची मासिके जगावेगळी आहेत हे नेहमी आठवणीत ठेवावे. ते शांती, सौख्यानंद व सार्वकालिक जीवनाच्या मार्गाकडे अंगुली दर्शवितात. (योहान १७:३) या कारणास्तव, द वॉचटावर तसेच अवेक! मासिकात एप्रिल व मे महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या विशेष व चटकन लक्ष आकर्षित करणाऱ्या लेखासोबत अधिक कार्य करुन आनंद मिळविण्यासाठी आत्ताच योजना तयार करा.