सुवार्ता सादरता
लोकांसोबत संभाषण करण्याद्वारे
१ संभाषण याचा एका शब्दकोशात असा अर्थ दिला आहे की, “भावना, निरिक्षण, मत किंवा कल्पना याविषयीची तोंडी देवाणघेवाण.” पण जेथे लोकांचा धार्मिक विरोध आहे किंवा ते आपल्याच कामात गढून आहेत अशा ठिकाणी तुम्हाला पवित्र शास्त्रावर आधारीत संभाषण कसे सुरु करता येईल? आपल्या श्रोत्यांना संभाषणात सामील करून घेण्यासाठी येशूने प्रश्न विचारले.—योहान ४:९-१५, ४१, ४२.
२ प्रांजळ लोक आढळावेत व त्यांच्याशी संभाषणाचा मार्ग खुला व्हावा यासाठी आम्ही देवापाशी प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रत्येक घरमालकाचा संभाव्य यहोवाचा सेवक या दृष्टीने विचार राखला तर आमचे साक्षीकार्य अधिक सोपे होते. अशी ही मनोवृत्ती आम्हाला घरमालकास सत्य उबदार व प्रांजळपणाने सादर करण्यास व त्याद्वारे आस्थेवाईक लोकांना आकर्षित करण्यास साहाय्यक ठरू शकेल.
आम्हापाशी जे आहे त्याचा उपयोग करा
३ रिझनिंग पुस्तकाच्या ९-१५ पानांवर खूप उत्कृष्ट प्रस्तावना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रभावी प्रश्न विचारण्यात आले आहेत. जेव्हा घरमालक प्रश्नाचे उत्तर देत असतो तेव्हा त्याचे आदरपूर्वक ऐकून घ्या व मग अशा पद्धतीने उत्तर द्या की ज्यामुळे तुम्ही त्याचे विचार लक्षात घेतले आहेत हे दिसू शकेल.—कलस्सै. ४:६.
४ हे खरे की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा घरमालकाचे काय उत्तर येईल हे तुम्हाला माहीत नसते. तेव्हा तुमची चर्चाही त्याच्या उत्तरानुरुप घेण्यासाठी जुळती असू द्या. हे संभाषण घरमालकाची आस्था लक्षात ठेवून त्यानुरुप पवित्र शास्त्रात असणारे संदर्भ दाखवून व तसेच आणखी काही विचारी प्रश्न मांडून पुढे चालू ठेवा.
आगाऊ तयारी करा
५ तुमच्या क्षेत्रातील लोक सर्वसाधारणपणे काय विचार करतात ते तुम्हाला माहीत असलेच. तर मग, तुमच्या विशिष्ट क्षेत्रात अत्यंत प्रभावकारी ठरू शकेल अशी प्रस्तावना रिझनिंग पुस्तकातून निवडा. सध्याच्या संभाषणाच्या विषयाशी जुळणारी यापैकीची एक प्रस्तावना याचीच येथे गरज असणार. घरमालकाला ज्या विषयासंबंधाने काळजी वाटते अशा विषयावर तुम्ही आपले संभाषण सुरु करा, थोडक्यात समस्या सांगा, व मग त्यावरील पवित्र शास्त्राचा काय उपाय आहे ते सांगा. जेव्हा तो याविषयी काही म्हणेल तेव्हा टीकात्मकपणे नव्हे तर सरळपणे आपले विचार व्यक्त करा. घरमालकाचे विचार व भावना याविषयीच्या तुमच्या आस्थेने त्याला तुम्हासोबत अधिक संभाषण करण्यात चालना दिली गेली पाहिजे. सहमत होता येईल असे मुद्दे लक्षात घ्या व त्यावर विचार व्यक्त करा. मानवाच्या समस्येवर पवित्र शास्त्राचा तोडगा या नात्याने राज्य आशीर्वादांवर जोर देऊन आपले संभाषण सरळ रुपाचे ठेवा.
६ भिन्न दृष्टीकोणांचा विचार देखील संभाषण चालू राखण्यात करता येईल. जर घरमालकाची वाद घालण्याची इच्छा आहे तर तुम्हाला हे विचारता येईलः “हे तुम्ही या दृष्टीकोणातून विचारात घेतले होते का?” मग, त्या विषयावर देवाचे वचन काय म्हणते त्याकडे निर्देश करा. ती व्यक्ती सहमत होत नाही असे दिसते तेव्हा आपली मते त्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. उलट, मित्रभावाने समारोप करा व दुसऱ्या प्रसंगी तेथे सुवार्तेची सादरता होण्याची संधि मोकळी ठेवा.—नीती. १२:८, १८.
७ लोकांना तुम्ही अनौपचारिकरित्या भेटता तेव्हा त्यांची तुम्हासोबत अधिक बोलण्याची इच्छा असते. तुम्हाला लोक रस्त्यावर, काम करताना किंवा आपल्या अंगणात असताना भेटतात तेव्हा त्यांच्याशी बोलण्यामध्ये हयगय करु नका. तुम्ही त्यांच्यासंबंधाने व्यक्त करीत असलेली आस्था त्यांना आवडेल आणि मग तुम्हाला, ही पृथ्वी लवकरच नंदनवन बनेल या पवित्र शास्त्राच्या अभिवचनाकडे आपले संभाषण वळवता येईल. संभाषण सुरु झाल्यावर ते घरमालकाला प्रसन्न करणारे ठरेल हे पहा. होता होईल तितक्या अधिकपणे त्या माणसाची मनोवृत्ती देव, त्याचे वचन आणि त्याच्या सेवकांच्या बाबतीत चांगली होईल असा प्रभाव आणा. असे केल्यामुळे जरी पहिल्या भेटीला तुम्हाला त्याच्या अंतःकरणाचा ठाव घेता आला नाही तरी जेव्हा दुसरा कोणी साक्षीदार नंतर त्याची भेट घेण्यासाठी येईल त्यावेळी तो अधिक चांगली मनोवृत्ती प्रदर्शित करण्याच्या तयारीत राहील.