वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९१ पृ. ४
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सूक्ष्मदृष्टीने
  • संभाषण थांबविणाऱ्‍यांना हाताळणे
  • लोकांच्या प्रतिक्रियेचा सामना करणे
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—संभाषण मधेच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांशी कसे बोलाल?
    आमची राज्य सेवा—२०१४
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • आपले अंतःकरण समजबुद्धीकडे लाव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ८/९१ पृ. ४

सुवार्ता सादरता

सूक्ष्मदृष्टीने

१ “जो सूक्ष्मदृष्टी राखतो त्याचे कल्याण होते,” असे एक प्रेरित नीतीसूत्र म्हणते. (नीती. १९:८) या वचनातील सूज्ञता आमच्या प्रचारकार्य हालचालींच्या बाबतीत वेळोवेळी दिसून आली आहे. उदाहरणार्थ, सूक्ष्मदृष्टी तसेच चतुरपणा राखल्यामुळे पुष्कळ प्रचारकांना संभाषणास थांबवणाऱ्‍या लोकांना पुढील साक्ष देण्यापर्यंत वळवता आले. किंवा त्यांना निदान त्यावेळी पुढे नंतर साक्ष देता येण्यासाठी एक पाया रोवता आला. हे कसे करता येणे शक्य आहे?

संभाषण थांबविणाऱ्‍यांना हाताळणे

२ “आम्ही कामात आहोत,” असे म्हणणारे बरेच लोक आपल्याला आढळतात. हे लोक खरेच कामात असतात की, आपण प्रदीर्घ संभाषणात गोवले जाऊ नये म्हणून तसे सांगत असतात? यासाठी सूक्ष्मदृष्टी हवी असते. घरमालक खराच कामात नाही तर मग आपल्याला या संभाषण तोडणाऱ्‍यावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला असे म्हणता येईलः “मग, मी माझं म्हणणं थोडक्यातच सांगू इच्छितो.” यानंतर आम्ही जे सांगणार होतो ते सारांशरुपाने सांगू शकतो पण हे संभाषण त्रोटक राहील याचे स्मरण ठेवले पाहिजे. आपण दाखविलेल्या विचाराबद्दल तसेच आस्था जागृत करणाऱ्‍या विवेचनांनी प्रलोभित होऊन कदाचित घरमालक तेव्हाच आणखी चर्चा करण्यास तयार होईल.

३ कदाचित घरमालक खराच कामात असेल. जरी आमची तेथून सहजपणे जाण्याची इच्छा नसली तरीपण आम्ही घरमालकाकडे नेट लावला किंवा त्याला संभाषणात ओढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याविषयी त्याचे मत प्रतिकूल होऊ शकेल. घरातील स्त्री आपल्या हातात स्वयंपाकाचे सामानच घेऊन दारात येते आणि घरातून जेवण तयार होण्याचा वास दरवळत येत असेल तर ती नक्कीच कामात आहे हे दिसते. तेव्हा सूक्ष्मदृष्टी तसेच सारासार विचाराची गरज आहे. त्यावेळी संभाषण पुढे नेणे उचित दिसणार नाही. तर उपलब्ध असलेल्या वेळेत घरमालकाला एखादे मासिक किंवा हस्तपत्रिका सादर करणे व नंतर येऊन भेटू हे सांगणे बरे दिसेल. यामुळे घरमालकास आपल्याविषयी चांगले वाटेल, व मग जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा सुंदर साक्ष देता येईल.

लोकांच्या प्रतिक्रियेचा सामना करणे

४ घरोघरच्या सेवकपणात आपल्याला काही संभाषण मध्येच तोडणारी उद्धट माणसे देखील भेटतात. तेव्हा काय करावे? नीतीसूत्रे १७:२७ सल्ला देतेः “जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते.” केवढा उपयुक्‍त सल्ला! काळजी व्यक्‍त करणारा सौम्य सूर लगेच माणसाला शांत करतो. तसेच आपण त्याला वाटणाऱ्‍या काळजीविषयी बोलायला चतुराईने प्रोत्साहन दिल्यास तो तितका उद्धट राहणार नाही. त्याने जरी कमी संभाषण केले तरी आम्ही दाखविलेला सौम्य प्रतिसाद त्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाविषयी चांगली मनोवृत्ती राखण्याची स्थिती देईल. हे चांगलेच असणार. घरमालक उद्विग्न व रागीट बनला तर तेथून शांतपणे निघून जाणे व कदाचित त्याला दुसऱ्‍या कधीतरी वेळेला साक्ष देणे हे उचित ठरेल.

५ शिवाय असेही काही लोक असतात की, जे वादविवाद करतात पण प्रांजळ असतात. अशा प्रसंगी यांच्याशी संभाषण पुढे नेण्यात आमच्या सहनशीलतेला मोठे आव्हान मिळते. पण आम्ही सूक्ष्मदृष्टी राखल्यास, घरमालक जोरजोराने आपली वेगळीच मते सांगत आहे म्हणून तो आस्थेवाईक नाही असा निश्‍कर्ष आपण घेणार नाही. अशावेळेला आपण चतुराईने काही प्रश्‍न विचारून तो ते तसे का मानतो ते काढू शकतो व मग त्या विषयावर पवित्र शास्त्र काय म्हणते ते त्याला दाखवू शकतो. (नीती. २०:५) यानंतर दाखविल्या जाणाऱ्‍या प्रतिक्रियेवर मग, आपण आपले संभाषण पुढे चालू ठेवावे की बंद करावे हे ठरविता येईल.

६ सूक्ष्मदृष्टी राखणारा प्रचारक हे जाणतो की, वेळ व परिस्थिती ही घरमालकास राज्य संदेशाविषयी वाटणारी प्रवृत्ती बदलवीत असते. पुढल्या वेळी आपण भेट घेऊ तेव्हा त्याची प्रतिक्रिया वेगळीच असल्याची दिसेल. मागील वेळी आपण घरमालकाची भेट घेतली तेव्हा त्याने नकारात्मक प्रतिक्रिया दाखवली होती म्हणून आताही तो तीच प्रदर्शित करील असे आपण समजू नये.

७ आपण आपले संभाषण पुढे न्यावे की नेऊ नये हे ठरविणे तितके सोपे नाही. तरीही शिकवण्याची कला वाढविल्यामुळे आपल्याला सुवार्ता सूक्ष्मदृष्टीने सादर करण्यामध्ये अधिक प्रभावी होता येईल. अर्थातच, आमच्या प्रयत्नांना आशीर्वादित करण्यासाठी आपण यहोवाकडेच बघत राहू.—१ करिंथ ३:६; तीत १:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा