ईश्वरशासित वृत्त
◆ बारबाडोस्ने सप्टेंबरमध्ये १,८०० प्रचारकांचे नवे शिखर गाठले.
◆ कोट डी लवोरिने सप्टेंबरमध्ये नव्या सेवा वर्षाची सुरवात ३,४६५ प्रचारकांनी केली, हा त्यांचा १२ वा सलग उच्चांक आहे. युद्धाने ग्रस्त असणाऱ्या लायबेरियातील कठीण परिस्थितीमुळे जे बांधव या देशात निर्वासित म्हणून आले आहेत त्यांची येथील बांधव काळजी घेत आहेत.
◆ जपानचा सप्टेंबरसाठी नवा प्रचारकांचा उच्चांक १,४८,४५२ होता. सप्टेंबरमध्ये सुरवातीला ३,५८२ नव्या नियमित पायनियरांनी आपली नावे दिली. सप्टेंबरमध्ये १११ विभागात एकंदर पायनियरांचे १६५ वर्ग घेण्यात आले व ३,९२० नियमित पायनियरांनी याचा लाभ मिळविला.
◆ केनयाने सप्टेंबरमध्ये ५,६१० प्रचारकांचे नवे शिखर गाठले. खास संमेलन दिवसाची मालिका एकंदर ११,०२७ ची उपस्थिती व १७२ च्या बाप्तिस्म्याने संपली.
◆ लेसोथोने देखील सप्टेंबरमध्ये १,३४७ प्रचारकांचे नवे शिखर गाठले. मंडळ प्रचारकांची १३.१ तासांची सरासरी दाखविते की, ते यहोवाच्या सेवेत पुढे जात आहेत.
◆ मॉरिशसने सप्टेंबरमध्ये ९०७ प्रचारकांचे नवे शिखर गाठले.
◆ सप्टेंबरमध्ये नायजेरियाचे १,४६,७०३ नवे प्रचारकांचे शिखर होते. ही गेल्या ऑगस्टच्या उच्चांकापेक्षा ४,६०० पेक्षा अधिकाची वाढ होती.
◆ रियुनियनने सप्टेंबरमध्ये १,८५४ प्रचारकांचे नवे शिखर गाठले. त्यांच्या अधिवेशनाला ३,५९१ ची उपस्थिती होती व ११४ लोकांचा बाप्तिस्मा झाला.
◆ सेंट विन्सेंटचे सप्टेंबरमध्ये २०८ नवे प्रचारकांचे शिखर होते. ही १४ टक्क्यांची वाढ आहे. मंडळ प्रचारकांनी १४.२ तासांच्या सरासरीचा अहवाल दिला.