सुवार्ता सादरता
प्रकाशनांचा सूज्ञतेने उपयोग करण्याद्वारे
१ १९९१ या सेवा वर्षातील खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमात “आमचे सेवकपण—साधारण नव्हे, तर पवित्र आहे” या विषयावर चर्चासत्र होते. त्यात या गोष्टीवर भर देण्यात आला की, आमचे कार्य पवित्र स्वरुपाचे असल्यामुळे त्याबद्दल आमचा दृष्टीकोण सहजासहजी असू नये. वस्तुतः प्रकाशने ही आमच्या सेवेतील अंतर्गत भाग असल्यामुळे यांनाही मानाने वागवण्यास हवे. या कारणास्तव, आमच्या प्रकाशनांचा सूज्ञतेने उपयोग करण्याद्वारे आम्हा प्रत्येकाला त्यांच्याबद्दल वाटणारा खोल आदर व्यक्त करता येईल.
२ गेल्या १९९० या कार्यवर्षात संस्थेने ६७ कोटी ८० लाख मासिकांचे आणि ५ कोटी १० लक्षांपेक्षा अधिक प्रकाशनांचे उत्पादन जगभरातील क्षेत्राच्या वापरासाठी केले. हे वेळ, शक्ती आणि पैसा ज्या समर्पित पद्धतीने लावला गेला त्याचे प्रचंड प्रदर्शन घडवते. पुष्कळ स्वयंसेवकाच्या एकाग्र प्रयत्नांमुळे व्यक्तीगत वापरासाठी तसेच क्षेत्र कार्यात वितरणासाठी दर्जेदार प्रकाशनांचे उत्पादन करण्यात आले. तर मग, आम्ही राज्याचा संदेश प्रामाणिक लोकांच्या अंतःकरणाप्रत नेत असता आपल्या प्रकाशनांच्या बाबतीत आपली हृदयनिष्ठा कशी दाखवू शकतो?
३ व्यक्तीगत व कौटुंबिक अभ्यास: रोमकरांस पत्राच्या २:२१ मध्ये प्रेषित पौल म्हणतोः “जो तू दुसऱ्यास शिकवतोस तो तूच स्वतःला शिकवीत नाहीस काय?” आपण आपल्या पवित्र शास्त्र आधारीत प्रकाशनांचे वाचन, अभ्यास व प्रार्थनाशील वृत्तीने मनन करतो तेव्हा यहोवाने आपल्या दास वर्गाद्वारे आम्हाला जे समयोचित अन्न दिले आहे त्याविषयी आपल्याला केवढी कदर वाटत असते ते व्यक्तीशः दाखवितो. (लूक १२:४२) आपला व्यक्तीगत किंवा कौटुंबिक अभ्यास याकरवी, प्रसिद्ध झालेल्या सत्याशी परिचित होण्याद्वारे, आम्ही यहोवाने आम्हास सोपवून दिलेल्या गोष्टींची निगा करण्यात आम्हामध्ये अधिक आवड वाढवतो. मुलांनाही आपल्या प्रकाशनांची चांगली कदर करण्यासाठी शिकवले पाहिजे. त्यांनी त्यावर कोठेही खाणाखुणा करून ते विद्रुप करू नये. याशिवाय आमची प्रकाशने व्यवस्थित जागी स्वच्छ रुपात ठेवली पाहिजे की, ज्यामुळे ती क्षेत्रावर नीटनेटकी सादर करता येतील.
४ अपव्यय टाळा: खऱ्या लाभासाठी आमची प्रकाशने सत्य शोधकांच्या म्हणजे जे प्रांजळपणे आमचे काम व आम्ही देत असलेल्या संदेशात आस्था राखून आहेत अशांच्या हाती जाण्यास हवी. (मत्तय १०:११) यासाठी आम्ही आमची प्रकाशने विशिष्ट परिस्थितींचा अपवाद वगळता कशीही देण्याचे टाळावे. आम्ही मासिके, पुस्तके व इतर प्रकाशनांना आमच्या घरी ढिगाऱ्यात पडू दिली तर त्यामुळे त्यांचे नुकसान होते.
५ मासिकांच्या तारखा असल्यामुळे त्यांना ताजे अंक या नात्याने सादर करण्याचा विशिष्ट काळ असतो. यासाठी आम्ही क्षेत्रकार्याला बाहेर पडण्याचा एकाग्र प्रयत्न करुन आमची मासिके आस्थेवाईक लोकांना उपलब्ध करण्यास हवी. आमची मासिके साचत आहेत असे दिसत असल्यास मासिक कार्यासाठी अधिक वेळ देण्याची योजना करावी. तसे होत नसल्यास आमच्या मासिकाच्या साठ्यात आम्ही फेरबदल करावा. या सूचनांचा अवलंब करण्यामुळे आम्ही यहोवाच्या विपुल दयेचे विश्वासू कारभारी असल्याचे दाखवीत असतो.—१ करिंथ ४:२; १ पेत्र ४:१०, ११; पडताळा लूक १६:१, १०.
६ यहोवाने आपल्या समर्पित लोकांवर एक गहन जबाबदारी आणि काम यांची “ठेव” सोपवली आहे. यामध्येच विश्वासू “कारभारी” ज्यावर आपला अधिकार राखून आहेत ते “सर्वस्व” देखील आहे. (२ तीम. १:१२; लूक १२:४२-४४, ४८ब; १ तीम. ६:२०) मग, देवाच्या सेवेतील आमच्या हक्काची विशेष कदर राखून इतरांना सुवार्ता सादर करतेवेळी आपण आपल्या प्रकाशनांचा सूज्ञपणे वापर करीत राहू या.