प्रश्न पेटी
▪ प्रकाशन व मासिक खात्यात काम करणाऱ्या उपाध्य सेवकांच्या कामावर सेवा देखरेखे कशी देखरेख करू शकतात?
सेवा देखरेख्यांच्या आस्थेचे क्षेत्र दर महिन्याला पुस्तक अभ्यास गटाला भेटी देणे आणि क्षेत्रकार्यासाठी नियमित सभांची व्यवस्था आखणे एवढ्या पुरते मर्यादित नाही. तर, मंडळीच्या नियुक्त क्षेत्रातील प्रचारकार्याच्या प्रगतिवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीसोबत हे आवेशी वडील अत्यंत सूक्ष्म रस बाळगून असतात.
या कारणास्तव, दर महिन्याला मोहीम प्रकाशनांचा पुरेसा साठा व मासिके उपलब्ध असून ती चांगल्या स्थितीत आहे याची खात्री ते करतील. हे करण्यासाठी ते प्रकाशन व मासिक खाते संभाळणाऱ्या उपाध्य सेवकांच्या विविध जबाबदाऱ्यांकडे लक्ष देतात.
आमची राज्य सेवा यात पुढील महिन्यांसाठी प्रकाशन मोहीमेविषयक ज्या घोषणा असतात त्याकडे सेवा देखरेख्यांचे सूक्ष्म लक्ष राहाते. ते व प्रकाशन खाते संभाळणारा बंधू एकत्र मिळून पुरेसा प्रकाशन साठा त्या त्या वेळी उपलब्ध राहील याची खात्री करतात; पण त्यांनी भरपूर प्रमाणात मागणी न करण्याची दक्षता राखावी. संस्थेला एखाद्या प्रकाशनाबद्दलची मागणी कळविताना एखादे प्रकाशन पहिल्यांदाच क्षेत्रावर उपयोगात आणले जाणार आहे, तसेच ते मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला लवकरच घेतले जाणार आहे की काय याचा विचार त्यांनी केला पाहिजे. प्रकाशनाची मागणी मागे केली असल्यास मागील मोहीमेचा मंडळीचा क्षेत्र कार्य अहवाल, मागे उरलेला साठा पुढे पुरेसा राहील की नाही हे दाखवून देऊ शकेल. अर्थात याचा विचार करताना त्या महिन्यात कोणी साहाय्यक पायनियरींग करणार आहेत का, तसेच मागे हे प्रकाशन सादर केल्यानंतर मंडळीत प्रचारकांच्या व नियमित पायनियरांच्या संख्येत झालेली वाढ याही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. प्रकाशने ही मंडळीच्या सभा सुरु होण्याआधी तसेच सभा संपल्यावर देखील उपलब्ध असू द्यावीत. प्रकाशनाची खोकी ही स्वच्छ तसेच कोरड्या जागी व नीट ठेवलेली असावीत म्हणजे ती खराब होणार नाहीत.
सेवा देखरेखे मासिकांचे खाते हाताळणाऱ्या बंधूला देखील सहकार्य करतील. अधूनमधून सेवा देखरेखे व मासिके हाताळणारा बंधू यांनी एकत्र बसून दर महिन्याला जितकी मासिके मागविली जातात आणि किती मासिके खरेपणाने क्षेत्रावर दिली जातात याची तुलना करुन बघितली पाहिजे. कदाचित असे दिसत असेल की काही प्रचारकांच्या घरी मासिके पडून राहात आहेत तर त्यांनी आपला मासिकांचा साठी कमी केला पाहिजे. मासिकांना व्यर्थ जाऊ देऊ नये.
याच तत्त्वानुरुप सेवा देखरेख्यांनी, मंडळी लिटरेचर ऑर्डर फॉर्म (एस-१४) वर जी मोहीम-प्रकाशने मागवीत आहे त्याची एकंदर किंमत व्यक्तिशः तपासून बघितली पाहिजे. यानंतर ते तो फॉर्म मंडळीच्या सचिवांना देतील आणि हे सचिव फॉर्मवरील बाकीच्या माहितीची तपासणी करतील आणि कंट्रोल्ड स्टॉक आयटम्स्ची जी मागणी करण्यात आली आहे त्याकडे खास लक्ष देतील.
प्रकाशन तसेच मासिक खात्याची योग्य काळजी घेण्यासाठी काही प्रमाणात कागदपत्राची हाताळणी करावी लागेल हे खरे. नेमणूक मिळालेल्या बांधवांना फॉर्म्सचा वापर, अहवाल कसा ठेवावा याबद्दल काही प्रश्न अथवा अधिक माहिती हवी असल्यास मंडळीतील सचिव याबाबतीत त्यांना आनंदाने मदत करतील.