ईश्वरशासित वृत्त
अमेरिकेन सॅमोआ: ऑगस्टमध्ये २०३ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठण्यात आला; ही १३ टक्क्यांची वाढ होती.
जमैका: ९,४३० प्रचारकांचा नवा उच्चांक ऑगस्टमध्ये गाठला गेला. त्यांच्या प्रांतिय अधिवेशनांना १९,२७४ इतकी उपस्थिती होती व २९४ लोकांचा बाप्तिस्मा झाला.
मादागास्कर: ऑगस्टमध्ये ४,००५ प्रचारकांचे शिखर कळविण्यात आले, आणि मंडळ प्रचारकांची क्षेत्रकार्यातील तासांची सरासरी १४ इतकी होती.
बरबाडोझ: चार प्रांतिय अधिवेशनांना ५,५३८ उपस्थिती होती व ८३ जणांचा बाप्तिस्मा झाला. एकंदर २,९८७ प्रचारकांनी ऑगस्टमध्ये अहवाल दिला.
सायप्रस: प्रांतिय अधिवेशनाला १,८५० ची उपस्थिती होती व ३८ लोकांचा बाप्तिस्मा झाला.
हाईती: ऑगस्टमध्ये १७ टक्के वाढीने ७,२१७ प्रचारकांचे नवे शिखर गाठले. त्यांनी १३,१९६ अभ्यास चालविले.
ताईवान: दोन प्रांतिय अधिवेशनांची एकंदर उपस्थिती ३,८१७ होती व ६७ लोकांचा बाप्तिस्मा झाला. ऑगस्टमध्ये १,९०० प्रचारकांनी अहवाल दिला.