क्षेत्रकार्याची तयारी करण्यासाठी व्यावहारिक पवित्रा
१ क्षेत्रकार्यात कसे बोलावे हे ठाऊक नसल्यामुळे तुम्ही कधी कधी सेवेच्या एखाद्या प्रकारात सहभागी होण्यास मागेपुढे बघता का? तसे आहे तर, आमची राज्य सेवा यामध्ये जो पवित्रा देण्यात आला आहे तो तुम्हास नक्कीच आवडेल अशी आमची खात्री आहे.
२ आमची राज्य सेवा याच्या या अंकापासून राज्याचा संदेश सादर करण्यासाठी विविध प्रस्तावांची अधिक माहिती आम्ही देणार आहोत. तो घरोघरच्या कार्यासंबंधाने, पुनर्भेटीबद्दल व पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याबाबतीत आहे. यामुळे तुमच्या विचारांना, तुम्ही सेवेमध्ये जे काही बोलणार त्याबद्दल चालना देईल. क्षेत्रसेवेसाठी तयारी करताना अशाप्रकारची सादरता निवडा जी, क्षेत्राला अनुरुप असेल. यानंतर हे ठरवा की, तुम्ही लेखात देण्यात आलेले शब्द वापरुन बोलणार की, तुमच्या स्थानिक परिस्थितींना जुळवून घेण्यात शब्दांमध्ये फेरफार करणार की, तुमच्या व्यक्तीत्वाला अनुलक्षून असणारे बोल निवडाल. तुम्ही स्वतःच्या शब्दात स्वाभाविकपणे बोलल्यास तुमचे प्रस्तुतीकरण हे संभाषणयुक्त असेल. तुम्ही क्षेत्रसेवेच्या काही प्रकारात पहिल्यांदाच सहभागी होऊन आपल्या उपाध्यपणात वाढ करू इच्छिता का? येथे सविस्तरपणे सुचविण्यात आलेले प्रस्ताव संभाषणाला सुरु करण्यास तुम्हाला चालना देण्यास पुरेसे ठरतील.
३ तुम्ही क्षेत्रसेवेकरता मंडळीची सभा चालविणारे असाल तर आमची राज्य सेवा यात प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्याशी तुम्ही चांगले परिचित असले पाहिजे. तुमची राज्य सेवा चांगली अभ्यासा आणि जे स्थानिकरित्या परिणामकारक होऊ शकतील अशा प्रस्तावांकडे लक्ष वेधवा.
४ आम्हाला आमचे काम चांगले झाल्यास त्यात आनंद वाटतो. नव्या तसेच अधिक अनुभवी प्रचारकांना त्यांच्या राज्य सेवेत अधिक प्रभावी व आनंदी होण्यासाठी हा व्यावहारिक पवित्रा तुम्हाला साहाय्यक ठरेल अशी आम्ही आशा करतो.