पुनर्भेट घेण्याची खात्री बाळगा
१ सुवार्तेचे सेवक या अर्थी आम्हाला शिष्य बनविण्याची आज्ञा आहे. (मत्तय २८:१९, २०) पुनर्भेटी घेणे हे आमच्या शिष्य बनविण्याच्या कामातील महत्त्वपूर्ण भाग आहे. जीवनांचा समावेश आहे याची आम्हाला कल्पना आहे, यासाठीच आरंभाला जी आस्था प्रकट केली जाते ती वाढवीत राहण्यासाठी आपण प्रत्येक प्रयत्न करण्यास हवा.
२ आम्ही ज्यांना प्रकाशने वितरीत केली आहे त्या प्रत्येकांना आपण पुनर्भेट घेण्याच्या पात्रतेचे आहोत असे समजले पाहिजे. तथापि, प्रकाशने वितरीत करणे एवढाच पुनर्भेट घेण्यास संपूर्ण आधार नसावा. कित्येक जणांना पवित्र शास्त्रीय संदेशाची चर्चा करणे आवडत असते; असे लोक कधीकधी प्रकाशने स्वीकारीत नाहीत. यास्तव, आस्था न्याहाळल्यास आपण ती वाढविण्यासाठी सर्वतोपरि पुनर्भेट घेण्यास हवी.
३ दिलेल्या प्रकाशनांचा मागोवा घेणे: वस्तुतः पुनर्भेटीपेक्षा प्रकाशनांच्या वितरणांची संख्या अधिक असल्यामुळे यात अधिक सुधारणा करण्याची संभाव्यता आहे. एका पायनियराने एक पुस्तक वितरीत केले पण त्याला त्या घरमालकाठायी खूपच कमी आस्था दिसली. एके दिवशी दुपारी इतर सर्व भेटीनंतर या गृहस्थाला भेट द्यावी असे त्याने ठरविले. याचा परिणाम पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यात दिसला.
४ एका बंधूने एका घरमालकाला दोन मासिके दिली, पण तो त्याला विसरला. त्याला वाटले की, घरमालक एवढा आस्थेवाईक नाही. काही दिवसांनी त्या गृहस्थाने स्थानिक मंडळीला पत्र पाठवून मला बाप्तिस्मा हवा अशी विचारणा केली. जिने ७४ लोकांना प्रचारक बनण्यात मदत दिली त्या एका मिशनरी भगिनीला विचारण्यात आले की, तिला यामध्ये कोणता महत्त्वपूर्ण भाग वाटला, तेव्हा तिने म्हटले की, “आम्ही खूप मासिक कार्य केले, आणि ज्यांनी मासिके स्वीकारली अशा सर्व लोकांकडे शास्त्राभ्यास सुरु करीपर्यंत पुनर्भेटी घेत राहिले.”
५ कधीकधी आम्ही घरमालकाकडे कदाचित एक छोटीशी हस्तपत्रिकाच देऊ. पण याचाच उपयोग पुनर्भेटीत करून पवित्र शास्त्र अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवता येते. एका प्रचारक भगिनीसोबत काम करणाऱ्या विभागीय देखरेख्याने एका स्त्रीला हस्तपत्रिका दिली. ती खूपच अल्पशी भेट होती, पण त्याने भगिनीला पुनर्भेट घेण्याचे उत्तेजन दिले. भगिनीने पुनर्भेट घेऊन लगेच शास्त्राभ्यास सुरु केला.
६ जेव्हा आस्था दाखविली जाते: पहिल्या भेटीत कोणी घरमालक प्रकाशने स्वीकारीत नसला तरी याचा अर्थ, तो आस्थेवाईक नाही, असा नेहमी होत नसतो. एका तरुण जोडप्याची पुनर्भेट घेतल्यावर एका प्रचारकाला आढळले की त्या जोडप्याने आपली चार प्रकाशने आधीच घेतलेली आहेत व पूर्वी अभ्यास देखील केला होता. त्यांनी अभ्यास पुन्हा सुरु करण्याची तत्परता दाखवली. एका खास पायनियरने, सतत मासिके नाकारणाऱ्या एका स्त्रीमध्ये गुप्त आस्था निरिक्षिली. पायनियरने मासिके बाजूला ठेवली. त्या स्त्रीला एका पुस्तिकेतील काही परिच्छेदांची चर्चा त्या पायनियरसोबत करण्यात आनंद वाटला. आणखी काही भेटीनंतर तिने आठवड्यातून दोन पवित्र शास्त्र अभ्यास मिळावा अशी विचारणा केली.
७ ज्या प्रत्येकाने यहोवाला आपले समर्पण केले आहे त्यांनी शिष्य बनविण्याच्या कार्यातील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आस्था दाखविणाऱ्या सर्वांच्या भेटी आपण सातत्याने घेतल्यास, आम्हाला तसेच ‘आमचे ऐकणाऱ्यांस’ समृद्ध आशीवार्द मिळवून देण्याची कापणी आपल्या हाती पडेल.—१ तीमथ्य ४:१६.